उन्हाचे चांदणे होते

Submitted by निशिकांत on 27 March, 2022 - 09:37

तुझ्या तर आठवानेही उन्हाचे चांदणे होते
अबोल्याशी तुझ्या तेंव्हा जरासे बोलणे होते

अधूरे राहिलेले स्वप्नही रोमांचते पण मी
बघावे ते कसे? जर रात्र सारी जागणे होते

कुठे हरवून साखर झोप गेली गोड स्वप्नांची?
रोग अन् औषधी हो तूच सखये मागणे होते

अता स्वप्ने विचारू लागली "झोपेत येऊ का?"
"कशाला आत येऊ का" रितीचे पाळणे होते?

उसाला लागणे कोल्हा जगी या शक्य असताना
कवीच्या सांगण्याने काळजीने वागणे होते

कधी नव्हताच जो शाळेत तो झाला महत्वाचा
हिजाबी देशद्रोह्यांचे गरळ ते ओकणे होते

जसा गज चालतो, तुम्ही चलावे राज्यकर्त्यांनो
विरोधक भुंकती नुसते, अधीही भुंकणे होते

उगाचच "लोक म्हणती काय" याची काळजी केली
मनाला मारुनी आले नशीबी नांदणे होते

कशी "निशिकांत" नाही लागली चाहूलही तुजला?
किती जोरात तिचिया पैंजणाचे वाजणे होते!

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--वियदगंगा
लगावली--लगागागा X ४

Group content visibility: 
Public - accessible to all site users