आठवणी

Submitted by सामो on 26 March, 2022 - 23:37

बालपणीचे पर्‍यांच्या कथा कहाण्या ऐकायचे दिवस हां हां म्हणता मागे पडतात. तारुण्याच्या उंबरठ्यावर पाउल पडतं आणि एक मदहोश करणारा, 'छलकत्या पैमान्यांचा'मधुमास आपल्या अवती भवती बहरु लागतो. जगाचे निश्वास निव्वळ सुगंधी असतात त्या काळात. अनामिक सुगंध, चैतन्य, ताजेपणा यांची लयलूट होत असते. 'झीलोंके होठोंपर, मेघोंका राग है, फूलोंके सीनेमे ठंडी ठंडी आग है" वाल्या हृदयात पेटलेल्या शीतळ ज्वाळेचे दिवस. कोणत्याही लग्नकार्यात एक ना एक वात्रट तरुण मुलगा, हस्तरेखातज्ञ म्हणुन सोंग वठवत असतोच का तर त्याच्याभोवती असतो तरुण मुलींचा गराडा. माझं भविष्य सांग, माझा हात बघ म्हणणार्‍या. मुलींचा हात बिनदिक्कत , चारचौघात हातात घ्यायची नामी संधी असते ती. Happy
आपणही हात दाखवतो अंहं करीअर , मुले असे गौण प्रश्न असतात पण मुख्य उत्सवमूर्ती प्रश्न असतो - वि-वा-ह!!! माझा भावी नवरा कसा असेल? कसा असेल? प्रचंड उत्सुकतेचे दिवस. 'आजा आयी बहार , दिल है बेकारार. ओ मेरे राजकुमार, तेरे बिन रहा न जाये' वाले गुलाबी, गुलजार दिवस. प्रत्येक मुलगी या वयात परी असते. सुनीता रावचं गाणं ऐकलय का? 'परी हूं मै, मुझे ना छूना काय सुरेख किणकिणाटी म्युझिक पिस आहे त्यात. एथिरीअल निव्वळ आऊट ऑफ धिस वर्ल्ड. सुनीताने अगदी अचूक त्या काळातले, तारुण्याच्या नव्हाळीतले 'फुलपाखरी गोसामर विंग्ज' या गाण्यात बंदिस्त केलेले आहेत. बंदिस्त शब्द नाही आवडला मला. 'गीतोमे ढाये है' म्हणजे मराठीत कसे सांगायचे. तिने अचूक संगीतबद्ध केले आहेत.
जबाबदार्‍यांचे, वास्तवाचे चटके बसण्या आधीचे हे दिवस किती लडीवाळ, किती मोहक. आय विश मी सिद्धहस्त,लेखिका असते तर मस्त वर्णन करु शकले असते या दिवसांचे. कोल्डकॉफी पित, सोडवलेली, गणिते, तासन तास घालवून समजून घेत गेलेली प्रमेये-उपप्रमेये. वेडे दिवस होते. आणि मग एकदा पापण्या मिटल्या व उघडल्या तर एकदम दाराशी पन्नाशी आलेली. Happy असं कसं झालं. कधी सरला वसंत कधी आला शिशीर? एवढ्यात? इतक्यात? Happy
आजकाल काय होतं माहीत नाही. खूप व्हिव्हिड, रंगीत , टेक्नोकलरमध्ये आठवणी येतात. म्हणजे डोळे मिटले की आठवणींच्या राज्यात जाता येते. असे वाटते एक धूसर सीमारेषा आहे फक्त इथल पाऊल, त्या रेषेच्या पलिकडे टाकायचा अवकाश आपण भूतकाळात पोचू. खूपदा एकदम त्या काळातला प्रकाश, हवेचा सुगंध जाणवतो. ती भावना टिकते मात्र १-२ सेकंद पण इतका जिवंत अनुभव देउन जाते की चुटपुट लागते. ऑलमोस्ट त्या काळाला स्पर्श करुन परतते मी. परवा तर स्वप्नात इतकी सुंदर घरे पाहीली. मिस्टी, पावसाळी हवा व सुंदर घरे. function at() { [native code] }इ function at() { [native code] }इ सुंदर वातावरण. अजुनही आठवते ते स्वप्न. हे काय आहे? इतके टोकदार, ठळक अनुभव का येताहेत याचे कारण सापडत नाही.
आय होप धिस इझन्ट अ‍ॅन ऑनसेट ऑफ डिमेन्शिआ. असं काहीतरी अमंगळ नसणार. पण काहीतरी बदल घडताहेत मेंदूत. कोणाला सांगावे? कसे शोधावे?काही कळत नाही. फार सुंदर आठवणींचे क्षण निसर्ग मुक्तहस्ते बहाल करतो आहे. काहीतरी बदल घडतो आहे. कदाचित सर्वांना असे अनुभव येत असतीलही. काही का असेना, जे काही घडते आहे ते, फार मस्त आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहीलयस सामो. मी कोरियन सिरीयल च्या धाग्यावर तुझी आठवण काढली, बहुतेक काल कि परवा. एक सिरीयल ( Nevertheless) बघताना मला तुझ्या गोष्टी आठवतात लिहीलेल्या. मस्त तरल लिहीतेस तू.

सामो, तुमचे काही लेख फार आवडले होते, या लेखाशी नाही रिलेट झालं. पण छान लिहिलं आहे.

सुनीताने अगदी अचूक त्या काळातले, तारुण्याच्या नव्हाळीतले 'फुलपाखरी गोसामर विंग्ज' या गाण्यात बंदिस्त केलेले आहेत. >>>>
तुमच्या मनातील कोमल गुलाबी भावनांचा चुराडा करण्यासाठी माफी मागते, पण हे गाणं अजिबात नाजुक भावनांबद्दल नाही. जर व्हिडिओ पाहिलात आणि गाणं ऐकलं तर कळेल की हे अगदी तुमच्या नाजुक गुलाबी भावनांविरुद्ध आहे. हे child abuse बद्दल आहे. छोटी मुलगी आणि sexually abuse करणारा पुरुष (परी हूं मैं, मुझे न छुना)

Happy छान छोटासा लेख आहे. मीरा.. ला +१. "परी हूँ मैं" गाणे कहाणी २ मधल्यासारखे अगदी लहान मुलीचे नाही पण १५-१६ वर्षाची शाळकरी मुलगी दाखवली आहे. कंसेंट देण्याच्या वयातली वाटत नाही ती.
हे गाणे चालतंय का बघ - Lol

हे गाणे चालतंय का बघ - Lol >>>> सीमंतिनी, हे गाणं माहित नव्हतं. भारीच आहे हे सुद्धा Proud तेव्हा लहान असताना ही इंडी पॉप्स फार आवडायची.

सामो, मी 'परी हुं मै' बद्दल सांगुन तुमचा विरस केला, म्हणुन सुनीता रावचं हे दुसरं गाणं सुचवते. हे मात्र नक्की तारुण्याच्या भावनेबाबतीतच आहे. ' अब के बरस वो हाल है, लगा गजब का साल है'
https://youtu.be/p4LRyIiNNaU
सु. राव गोड दिसली आहे.

>>>>>>सामो, मी 'परी हुं मै' बद्दल सांगुन तुमचा विरस केला, म्हणुन सुनीता रावचं हे दुसरं गाणं सुचवते. हे मात्र नक्की तारुण्याच्या भावनेबाबतीतच आहे. ' अब के बरस वो हाल है, लगा गजब का साल है'
Happy विरस वगैरे नाही . जे आहे ते आहे. गाण्याबद्दल, धन्यवाद

धनुडी, सीमंतिनी आणि दीपक पवार - धन्यवाद.

छान लिहिले आहे सामो Happy

गाणं ऐकलं तर कळेल की हे अगदी तुमच्या नाजुक गुलाबी भावनांविरुद्ध आहे. हे child abuse बद्दल आहे. छोटी मुलगी आणि sexually abuse करणारा पुरुष (परी हूं मैं, मुझे न छुना)
>>>>>
आई ग्ग.. हे मलाही कधी कळले नाही. अर्थात जेव्हा याचा विडिओ पाहिला तेव्हा फारच लहान होतो. त्यामुळे कळले नसावे. आता पुन्हा मुद्दाम हि पोस्ट लिहिण्याआधी गाणे पाहिले, खरेच कसे कळले नाही त्या वयात.. गाणे तर आजही ईतके आवडीचे, आणि तीच नाजूक गुलाबी भावना असणारे वाटायचे, किंबहुना लेकीचे नाव परी ठेवल्याने घरी आजही हे गुणगुणले, गायले जाते.. पण तरी आता हे कळल्यावर गुलाबी भावनांचा चुराडा वगैरे झाला नाही, तर गाण्याची डेप्थ आणखी जाणवतेय असे वाटतेय, कदाचित आता जास्त आवडेल..

सामो... छान लिहीलंय. कुठेतरी रिलेट झाले..मलाही सेम अशाच फीलींग्ज येतात कधी कधी....
जसे तू लिहीलेस..की ..आणि मग एकदा पापण्या मिटल्या व उघडल्या तर एकदम दाराशी पन्नाशी आलेली.
आता असे वाटते.. की आनंदाने जगून घ्यावे.... किती दिवस मन मारुन जगत राहायचे. एकच तर आयुष्य आहे मिळालेले.
अर्थात अशी उभारी वाटायला बाकी इतर ही कारणं आहेत...... Happy पण ही फुलपाखरी भावना मात्र निश्चित आहे. मलाही अगदी जाणवते आहे.
संगीत, रंग, पाऊस, गंध ...सगळे नवीन, असोशीचे वाटतात...नवीन अर्थ कळतात त्यातून. नवा आनंद मिळतो.

लेट अस एम्ब्रेस इट. Happy