आई कुठे काय करते!-२

Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00

आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण आज अरुंधती खूप छान दिसत होती..आणि मुख्य म्हणजे छान हासत होती. अजिबात अवघडलेपण नव्हते!!!
आशुतोष मात्र तसाच खुळचटासारखा का वागतोय कोण जाणे!
चांगुलपणा म्हणजे बावळट पणा नव्हे!!!

नववधूने पहाटे भजन गाऊन सगळ्यांना जागं आणि इम्प्रेस करणं - सो क्लिशेड.
आई लोकांना त्यांची आवड कोणी विचारतच नाही हे दाखवलं . ते बरोबर. पण नंतर आशुतोष आज तुझ्या आवडीचं होईल म्हणतो, ते तीच करणार आहे ना?
अभिषेक अनघाच्या खोलीत भिंतीवर हाडांच्या सापळ्याची आणि मेंदूची चित्रे आहेत.

भरत... Lol
तो अभिषेक डॉ आहे ना....!!
पण छकुली घाबरेल ना..असली चित्रे पाहून!!!
मला आशु च्या चेहर्‍यावरचे वेडसर भाव अगदी पाहवत नाहीत!!!!

अरु ची सा डी व मेक अप छान होता. आमसुली रंगाची साडी. पण इस्त्री नव्हती. आशू फारच डू गुड मोड मध्ये आहे. बायकोला पायाला लागले की लगेच बसून पाय धुतले. ते देवुळ म्हण़जेच इशाचे कॉलेज च्या पायर्‍या. केटरर चे टेबल असते तसे फुलांचे दुकान ठेवले की झाले. कोणता देव ते दाखवलेच नाही. सासरी ( १) जाउन लगेच चिवडा द्या असा खादाड भुके पणा करणे. मग अरे जेवायला परत येउ म्हणून लगेच खाली बसून ताटॅ
वाढायला घेणे!! आज्जीने फक्त शिराच केलेला आहे. ह्याला काय करू काय नको असे झाले आहे बिचार्‍याला. ते आई व भाउ कायम हात जोडुन दया असावी महाराज मोड मध्ये असतात

उलट कांची व घरचे कायम ताठ्यात. अरु ला बघून अन्या चमकतो. कारण ती फारच क्ष्क्ष दिसते त्याला. त्याच्या समोरच ते कंकण सोडणॅ जरा function at() { [native code] } जास्तच आहे. पण अरु ला कळत नाही व आशू बाळास बिचार्‍यास अनुभव नाही.
आता तरी ही सलग १५ दिवस एका घरी राहील का. का इकडे पोळ्या की तिकडे पोळ्या इकडे भाजी कि तिक डे भजी.

मला असं वाटतं की समृद्धी बंगला, इशाच काॅलेज आणि मागे अनघा अरु आणि अप्पा जायचे तो पार्क हे एकाच आवारात आहेत. तिघांचीही कंपाऊंड वॉल आणि स्लाईडिंग डोअर्स एकसारखे आहेत. तसंच आधी संजनाच घर होते तेच नंतर अरुचे होते. लोकेशन बजेट कमी आहे मालिकेचं.आता त्या काॅलेज गेटलाच देऊळ करुन टाकले. देवळाच्या आवारात भेटलेल्या त्या सो कॉल्ड फॅन कहर होत्या.

पायात खडा किंवा काटा गेल्याने रक्त आलं म्हणून पाण्याने धुवायचे? ते ही न उकळलेल्या, अशाने सेप्टिक होइल जखमेत पाण्यातले जंतु शिरुन. आशु ला बेसिक फर्स्ट एड पण येत नाही असं दिसतंय. मग त्याला नक्की काय येत? बिझनेस नितीन ला येतो, गाणं अरु ला येत आणि चॅरिटेबल ट्रस्ट चालवणं सुलेखा ताईंना येत!

बाय द वे मागे प्राजक्ता_शिरिन ने म्हंटले होते ना की समृद्धी मध्ये माणसे वाढली की खोल्या पण आपोआपच वाढतात तेच आता आशुतोष च्या घरी पण सुरू झालंय. आधी दोनच बेडरुम च छोटं घर आहे म्हणून सांगितले त्यामुळे अनिश आणि आशुतोष एकाच खोलीत झोपायचे आणि अरु ला प्रपोज करण्यासाठी अनिश आशु चे बौद्धिक घ्यायचा. आता अरु आल्यामुळे आपोआपच त्याच्यासाठी एक खोली तयार झाली आहे.

जसं मध्यंतरी अरु टीम आणि अन्या टीम मध्ये त्याच त्याच शाब्दिक चकमकी व्हायच्या तसं आता यश आणि गौरी मध्ये होतात. यश च्या बाजुने कांचन ची टॅंट्रम ट्वीन इशा तोंड वाकडी करते. त्या गौरी आणि यश च एकतर लग्न लावा नाही तर गौरीला कायमची अमेरिकेत परत पाठवा. तेच तेच काय दाखवत बसलेत हे लोक.

गौरीला अचानक साक्षात्कार झालाय कि आपण लग्न करून इकडे राहिलो तर तिकडे आई-वडिल एकटे पडतील. पण तिचे अनघाशी बोलणे झाल्यावर वाटते कि देशमूखांच्या घरात आल्यावर तिची अरू किंवा अनघा होण्याची भिती तिला वाटत असावी.

तसंच आधी संजनाच घर होते तेच नंतर अरुचे होते. >> संजनाचे वेगळे घर नव्हतेच. वरची खोली ते संजनाचे घर म्हणून दाखवत होते.

देशमुखांच्या घरात शिरताना, बाहेर पडताना प्रत्येक वेळी अरुंधतीला ते सगळं आठवणार का?

जोगळेकरांकडे गेल्यावर आशुतोषच्या अंगात नितीन संचारला.

गौरीला रिअल लाइफ अपघात झाल्याची बातमी आहे.

आज कालचीच आमसुली साडी गळ्यातला खोटा नेकलेस रिपीट होता. डोके जड झाले म्हणून झोप काढली मॅम नी. खाली आल्या तर अहो स्वयंपाक करत होते. मग अरे तुम्ही कशाला क्शाला म्हणून गिल्टी वाटून झाले. मग त्यावर आशू बाळाने पाच मिनिटे पुस्तकी ज्ञान दिले. तिकडे
सासु पारंपारिक ज्ञान द्यायची इकडे पती पुस्तकी ज्ञान वाटत फिरत असतो. दोघांचे छान पैकी केंडल लाइट डिन्नर झाले. खीर बनवलेली असावी बहुतेक ती गार झाली ती आज्ञा धारक पतीने परत गरम करुन आणली. ह्यांचा पाडवा कधी व्हायचा? काल तर अंग्रेजी मूड मध्ये होते दोघे.
डायनिन्ग टेबल असतानाही दुसरे नवे डेकोरेटॅड टेबल आणलेले. अनीशची आयड्या म्हणे.

आशू आता सांसरिक गृहस्थ झाल्यने जरा बरे शर्ट प्यांट व जुते घालावे ही नम्र विनिंती ते च ते ट्यान शूज. व शिळे कपडे का बरे. जरा ऐटबाज दिसता येइल. अरुला काहीच माहिती नसल्याने आशूला रोमान्स करायला खूपच स्कोप आहे. हातात चहा दिला की ती अर्धातास थरथरत बसते.
उद्या अभी रडत माफी मा गणार आहे. ढसा ढ्सा व अनिरुद्ध अजून वैतागणार आहे.

वेळात वेळ काढून अरुने इशा अनिईश रोमान्सला ब्रेक घातले आहेत. लिम्मीट क्रॉस कर्नेका नै.

हिने ती दिवसभराची आमसूली साडी का बदलली नाही... ?
निदान संध्याकाळी झोपेतून उठल्यावर तरी फ्रेश होऊन, कपडे बदलून यायचे ना?
आशु ला चालत असेल असेच पारोसे... पण प्रेक्षकांचा काही विचार?
किती लो बजेट असावे !!
एकेका साडीवर तीन तीन एपिसोड काढतात !!! तेही नायिकेचे नुकतेच लग्न झाल्याचे एपिसोड चालू असताना!!!!
हो..बहुतेक सूप केले होते..आणि कढईत काय परतत होता?
नूडल्स?

सासु पारंपारिक ज्ञान द्यायची इकडे पती पुस्तकी ज्ञान वाटत फिरत असतो. दोघांचे छान पैकी केंडल लाइट डिन्नर झाले. >>>>>> मी चुकून 'सासू' (एक्स) आणि पतीचे केंडल लाइट डिन्नर ' वाचले.

अविनाश काल अनुष्काकडे एकटक बघत होता.

हो ना..अविनाश अत्यंत नाटकीपणाने त्या अनुष्का कडे टक लावून बघत होता. ...

आजचा भाग बघितल्यावर असं वाटलं की चॅनेल कडुन 'आई...' टीम ला आवरत घेण्यासाठी सुचवण्यात आलय. देशमुख कुटुंबातील समस्या निवारणाचा वेग अचानक वाढलाय. काहीही न घडता अभि ला अचानक पश्चात्ताप झालाय, गौरी ला तिच्या प्रेमाची जाणीव होईल असे संकेत आहेत. मोघे काकांचं एकटेपण‌ दुर करण्यासाठी अत्यंत आवडीच प्रदेशातील काम सोडून ते समृद्धी त ठाण मांडून बसलेत. अरु चार भाऊ, धूमकेतू मैत्रीण आणि वीणा हे देशमुख कुटुंबाचा डायरेक्ट भाग नसल्याने त्यांच्या नशिबात 'स्टॅटस को' आहे शेवटापर्यंत असं दिसतंय. आता फक्त अनघाने अभिला अधिकृत माफी द्यायची फक्त बाकी आहे.

आजचा भाग बघितल्यावर असं वाटलं की चॅनेल कडुन 'आई...' टीम ला आवरत घेण्यासाठी सुचवण्यात आलय. >>>>>>> अनिश- ईशाचा इशू राहिलाय ना अजून?

वेळात वेळ काढून अरुने इशा अनिईश रोमान्सला ब्रेक घातले आहेत. लिम्मीट क्रॉस कर्नेका नै. >>>>>> आता इतके महिने ती अनिशला ओळखतेय. तिला तो 'तसला मुलगा' वाटतोय? हल्ली कुठलीही मुलगी मनावरचे. शरीरावरचे घाव कुरवाळत बसत नाही. इझीली मुव्ह ऑन होतात.

काहीही न घडता अभि ला अचानक पश्चात्ताप झालाय, >>>>>>> अगदी अगदी. नक्की चाललय काय ह्याच्या मनात? नवीन गर्लफ्रेण्ड तर नाही ना पटवली ह्याने?

आकाशात पूर्णचंद्र.
कांचन सून आणि नातसुनेला सांगते उद्या गुढीपाडवा आहे.

अरुंधती आशुतोषला आपल्या पहिल्या संसाराची सगळी कथा थोडी थोडी करून ऐकवणार.

अरुंधती आशुतोषला आपल्या पहिल्या संसाराची सगळी कथा थोडी थोडी करून ऐकवणार. >>>>त्याचा संसार कधी करणार ?

आकाशात पूर्णचंद्र.
कांचन सून आणि नातसुनेला सांगते उद्या गुढीपाडवा आहे
Rofl

अरुंधती आशुतोषला आपल्या पहिल्या संसाराची सगळी कथा थोडी थोडी करून ऐकवणार. नो नो ..!! प्लीज!
प्रेक्षकांना असे दावणीला बांधू नका हो ! आम्हाला नाही पुन्हा सगळे ते ऐकायचे- पहायचे! इनफ ऑफ अरुंधतीज ड्रामा.
त्यापेक्षा आता गाशा गुंडाळा ... तशीही अनघा संजनाला 'रहा रहा' म्हणतेय, म्हातारीला तर दोघीन्नी सोडून जाणार नाही असे प्रॉमीस केले आहे!
बाय द वे, कालच्या भागात कांची म्हणत होती..की पुढच्या वर्षी संजना असेल की नाही...अनघा असेल की नाही .. माहिती नाही!
अगं बाई... तू स्वतः असशील की नाही मुळात...? हाऊ कॅन यू बी सो शुअर..की तू असशीलच?

काही...!!!!

Happy

अरुंधती आशुतोष च्या देखत चारचारदा म्हणतेय..मला तुम्हा तिघांइतकं आयुष्यात काहीही महत्त्वाचे नाही!! तुम्ही तिघं (मुलं) माझं सर्वस्व आहात..हे अन ते....

मला तर राग आला असता आशुतोष च्या जागी मी असते तर...
सदा न कदा..हिचा चेहेरा आपला आक्रसलेला, विदीर्ण! जरा म्हणून प्रेम आनंद, खळाळ नाही!!!

आज गुढी उभारली पण काढली पण मग लगेच जुन्या सासरी गेले तिथून बाहेर जेवायला. पण अरुला बाहेरचे पचत नाही. घरीच खिचडी खाणार. हिला किचन लेस होम ची गरज आहे नक्की. इतका श्रीमंत नवरा आहे पण घरी मोलकरीन नाही. अरुच करते सर्व हौसेने.

इशा अनीश प्रेम प्रकरण आता " मला आईची खूप आ ठवण येते ह्या बहाण्याने अनीशच्या गळ्यात पडून मिठी मारणे परेन्त गेले " त्यात घरी कोणी नाही. क्या होता क्याकी. इशा छानच दिसत होती.

इक्डे अनघाची साडी मस्त. पीच कलरची.

मला आईची खूप आ ठवण येते ह्या बहाण्याने अनीशच्या गळ्यात पडून मिठी मारणे परेन्त गेले " त्यात घरी कोणी नाही. क्या होता क्याकी>>> Lol आता नेमके तेच अरू बघणारे आणि त्यांच्यावर डाफरणार आहे. त्यात तिचा काही दोष नाही कारण लग्नाला ४ दिवस झाले तरी अशूने फोटो काढण्यापुरता तिच्या खांद्यावर हात ठेवला कि ही घाबरते.

हो ना...किती अवघडले पण आहे त्यांच्यात!!
त्या मानाने अनुज अनुपमा खूपच छान जेल झाले!!
ह्यांना शक्य नाही!.. अरुंधती सोडा..आशुतोष ही कमालीचा awkward असतो!!

आज अरु अ‍ॅक्टिन्ग लाइक हे बरोबर नाही. अगं बाई तू काय कर्तेस तुझा एक्स काय कर्तो. मग मुलगी तर वयात आहे. लगन करुन च येणार हे दोघे व तिला लगेच मुलगा पण होणार त्याचे नाव इशीन.

Lol अमा
आणि मुलगी झाली तर...निशा!!

Pages