Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00
आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरूने जे काही इशाला सांगितले
अरूने जे काही इशाला सांगितले त्यातले तिच्यामते थोडेही सूनेला लागू होत नसावे. सूनेला नेहमी जो काही निर्णय घ्यायचा तो नीट विचार करून घे, घाई करू नकोस, अभिचे अजूनही तूझ्यावर प्रेम आहे हेच ती सांगते. तसे अनघालाही नवरा नको असला तरी सासरचे सोडवत नाहीत.. अरूसारखेच.
अनिशचे बाबा का येणार नाहीत
अनिशचे बाबा का येणार नाहीत लग्नाला ते कळलं. जिगर-वर्षा न येण्याचं कारण शोधणं चालू आहे :ड
अविनाशचा मेकोव्हर. विगपण
अविनाशचा मेकोव्हर. विगपण बदलला. पण ओव्हर अॅक्टिंग तशीच.
शी ss !! काय विचित्र दिसत
शी ss !! काय विचित्र दिसत होता तो अविनाश.
चकचकीत प्लास्टीकी चेहेरा, ओव्हरअॅक्टींग , कृत्रिम संवादफेक!!
अरुंधती ला..ऑफ ऑल पिपल..त्याच्याशी विचारविनिमय करायचा होता म्हणे लग्नाबद्दल!!
आणि आशुतोष चे केस पांढरे दिसत होते खूप..जवळ जवळ ५० % !!
हो अविनाश काहीतरी वेगळा दिसत
हो अविनाश काहीतरी वेगळा दिसत आहे. इंग्लंडात राहून का? आशूचे केस आधीच पांढरे झाले? आज धनश्री ज्वेलरस चा प्लग होता. तन्मणी व बांगड्या घातलेली अरु बघून आशू मंत्र मुग्ध झालेला आहे. अरु ला गप बसून भर्पूर दागिने गिफ्टा मिळत आहेत तरीही तिचे मला कशाला मला कशाला चालू आहे. जुन्या सास वेने पण घसघशीत चार पाटल्या ओटीत टाकल्या आहेत गपचुप. नवी तर संधी शोधत असते सुनेचे लाड करयाचे.
आता तुम्ही खूप सुखी राहा मजेत संसार करा हे इतक्या लोकांनी इतक्या वेळेला म्हटले आहे की जाम वैताग. आज केदार पण दिसला. हे लग्न सुरू झाले आहे. मला वाटले होते बाहेर मांडव टाकणार पण तसे काही दिसत नाही. त्याच हॉल मध्ये सर्व हे खरेतर जाम ऑकवर्ड आहे. जिथे जुन्या संसारातील अर्ध्या ब बाबी घडल्या हाकलून देणॅ. सर्व भांडणे तिथेच नव्या लग्नाचा होम हवन हे बरोबर वाटत नाही. आता लग्नाचे विधी सुरू झालेत तर दुसृया लग्नात गायब व्हायचा देशमुखा कडचा खास विधी अरु पार पाडत आहे. जुन्या सासवे पुढे पदर पसरला असणार नक्की. कल मालूम पडेंगा.
अमा..
अमा..

हो ना...निदान मांडव तरी घालायचा.
अरुच्या मधल्या लग्नाच्यावेळी घातलेला की...
(२५ वर्षे झाली म्हणून दोबारा केले होते ना)
मजा मंजे आशू अरु गायब आहे हे
मजा मंजे आशू अरु गायब आहे हे कळताच हार मुंडावळ्यां टोपी सकट एकदम उठुन उभा राहतो व तिच्या शोधात निघणार असतो. ही नक्की गच्चीत असेल ह्यांचे सर्व हरवलेले लोक तिथे असतात. इशा घाबरली अनघा घाबरली आहे. अरु टेन्शन मध्ये उडी तर मारणार नाही ना
ती कसली पळून जाते! परसाकडे
ती कसली पळून जाते! परसाकडे गेली असेल.
लेखिकेला उगाच ड्रामा दाखवायची सवय आहे.
पर्वा अप्पा म्हणले आज मेंदी
पर्वा अप्पा म्हणले आज मेंदी झाली ,उद्या ग्रहमख आणि पर्वा लग्न.
दोनच मिनिटात अरु विचारते इशाला उद्या काय कार्यक्रम आहे तर इशा म्हणते उद्या आराम म्हणजे परवा लग्न enjoy करायला एनर्जी राहिल. प्रत्यक्षात ही ग्रहमखाचा उल्लेख ही झाला नाही विसरले सगळे ग्रहमख होत ते.
नवा प्रोमो. कांचन अरुंधतीचं
नवा प्रोमो. कांचन अरुंधतीचं कन्यादान करायला तयार. १३ तारीख.
आणखी आठ दिवस तरी लग्नसमाऱंभ चालेल
इतके थंड मठ्ठ रिअॅक्शन कसे
इतके थंड मठ्ठ रिअॅक्शन कसे काय देउ शकतात थियेटर आर्टिस्ट.
कोणत्या reactions म्हणतेस
कोणत्या reactions म्हणतेस श्यामली?
दोनच मिनिटात अरु विचारते
दोनच मिनिटात अरु विचारते इशाला उद्या काय कार्यक्रम आहे तर इशा म्हणते उद्या आराम म्हणजे परवा लग्न enjoy करायला एनर्जी राहिल. >>>>>>हे बोलून आरु व इशा झोपायच्या तयारीत म्हणजे आरु बेडवर बसते व इशा तिच्या मांडीवर डोकं टेकते (इथे शेवटची अंगाई व रटाळ सवांद वैग्रे नशीब टाळले) आणि केळकरांकडे याच्या उलट होते श्रीखंड आज्जी आशूला उद्या लग्न आणि अजूनही तू काम करत राहिला आहेस करते सोबत गणगणे अनिश आणि तितक्यात ती घारू अनुष्का व पडेल मित्र नितीन कपड्यांच्या ट्रायल साठी न्यायला येतात। नेमके कोणत्या युनिव्हर्समध्ये राहतात हे लोक कि एकीकडे रात्री झोपेच्या तयारीत तर दुसरीकडे अजूनही बाहेर जाऊन कपड्यांच्या ट्रायली चालल्यात ? शिवाय एकीकडे परवा लग्न तर दुसरीकडे उद्या लग्न ???
मला पण हा प्रश्न पडला होता.
मला पण हा प्रश्न पडला होता. मग केळकरा़ंकडचा सीन दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे असं समजून घेतलं.
काही मालिकांत दुसरा दिवस सुरू झाला हे दाखवायला सूर्योदयाच्या सीन दाखवतात.
श्रीखंड आजी तोंडांत रसगुल्ला ठेवून बोलतात.
कांची फायनली मानणार का? मग
कांची फायनली मानणार का? मग काय अर्थ राहीला?
लग्न लागलं पण. मोजून १५ च्या
लग्न लागलं पण. मोजून १५ च्या खाली लोक उपस्थित. वर्षाचा उल्लेखही नाही. झटपट उरकलं लग्न.
मज्जा म्हणजे एका सीनमधे सगळे पाहुणे गायब. आता लग्न लागल्यावर अरु गायब का होईल ? कांचीचे पाय धरायला बहुतेक.
आमचं लग्न पण असंच करायला हवं
आमचं लग्न पण असंच करायला हवं होतं. बराच खर्च वाचला असता.
एवढा मोठा बिल्डर, बिझनेसमन खर्च वाचवतोय तर आम्ही किस खेत की मूली!
अरू शेवटपर्यंत कांचीचे पाय सोडणार नाही. कांचीने जरी कन्यादान वगैरे केलं तरी शेपूट सरळ होणार नाही. दुसर्या दिवसापासून पून्हा टोमणे सत्र सुरू होणार.
अन्याने आज इतके प्रामाणिक कन्फेशन्स केलेत पण त्यातही पुरूषी अहंकार ओतप्रोत भरलेलाच आहे. अभीची अक्कल तळ्यात-मळ्यात खेळतेच आहे.
मानबा चं बरं व्हर्जन म्हणता
मानबा चं बरं व्हर्जन म्हणता म्हणता दर्जा घसरत चालला आहे. महाल आहे का २०-२५ खोल्यांचा की अरु दिसली नाही.
आशु नक्की कुठे जाणार होता शोधायला तिला ? त्याला संवाद असा आहे - कळायला तर हवं कुठे गेल्ये - कळलं असतं तर आणलचं असतं ना. बागेतून बाप-लेक लग्नात का आले ?
शेखरने पत्र पाठवल तिच्यासाठी
शेखरने पत्र पाठवल तिच्यासाठी ते वाचायला गेली असेल गच्चीवर.
(No subject)
एक्स-सासूला मनवायला अरु
एक्स-सासूला मनवायला अरु देवळात लग्न सोडून आणि मग माफी मागते. किती तो फाल्तुपणा.
अंघाचं बाळही गायब आहे.
हो ना..लग्न अर्धवट सोडून
हो ना..लग्न अर्धवट सोडून म्हातारीला मनवायला गेली!!
रीडीक्युलस !! आणि त्या आशु कडील लोकांना वर एक खोली दिलेली..वरपक्ष म्हणून!!! एव्हढा मोठा बिझनेसमन....लग्न थाटात करावे ना जरातरी!!!
आता किमान रिसेप्शन तरी द्या म्हणा.. आम्हा सर्व प्रेक्षकांना!!!!
ओन्ली विमल च्या सासू ची
ओन्ली विमल च्या सासू ची तब्येत बिघडवलीय..
एक्स-सासूला मनवायला अरु
एक्स-सासूला मनवायला अरु देवळात लग्न सोडून आणि मग माफी मागते. किती तो फाल्तुपणा. >>>>>>>> हि घरातून गेली तेव्हा कोणीच हिला बघितल नाही का जाताना?
हे म्हणजे ' आठशे खिडक्या नउशे दार, कुणा वाटेन गेली ही नार' अस झाल.
परसाकडे गेली असेल
परसाकडे गेली असेल


गच्चीवर पत्र वाचायला
आठशे खिडक्या नौशे दारं
हे म्हणजे ' आठशे खिडक्या नउशे
हे म्हणजे ' आठशे खिडक्या नउशे दार, कुणा वाटेन गेली ही नार' अस झाल. >>>>> फुटले मी
लग्न हॉल मध्येच चाललं होतं ना
लग्न हॉल मध्येच चाललं होतं ना.. मग ही अरु कुठून गेली बाहेर? की फिल्मी पद्धतीने टेरेस मधून साडी/ओढणी/शिडीने खाली गेली!!??
आणि कांचन अरुची सख्खी मैत्रीण म्हणे...ही असली मैत्रीण असण्यापेक्षा नसलेली परवडली!
आहे आहे, समृद्धीमधे जो जिना
आहे आहे, समृद्धीमधे जो जिना आहे तिथून डायरेक्ट बाहेर जाता येतं. वरपक्ष खोलीत टीपी चालू असताना सटकली असेल अरु.
बाळंतपणात तिची स्वच्छता केली
बाळंतपणात तिची स्वच्छता केली आणि भरवलं , ते ओझं आहे.
पुढचा जोक gross आहे. न वाचता पुढे जाता यावं यासाठी वॉर्निंग.
.
.
.
.
आशुतोषच्या गळ्यात हार घालताना अरुंधतीच्या चेहर्यावर एरंडेल पिऊनही काही उपयोग होत नाही असे भाव. आणि आशुतोषला नाक दाबून घ्यायचंय पण घेता येत नाही. चेहरा हसरा ठेवायचाय असे.
विवाहविधी सुरू झाल्यापासून अरुंधतीच्या चेहर्यावर पहिल्यांदा हसू येईल ते कांचन मी कन्यादानासाठी आले म्हणते तेव्हा.
अरूंधती लोटांगण घालायची बाकी
अरूंधती लोटांगण घालायची बाकी होती.
Pages