रंगपंचमी

Submitted by दत्तात्रय साळुंके on 18 March, 2022 - 07:14

मिसळले रंगात रंग
त्यागीले आपापले ढंग
झाहले उत्सवात दंग
सा-यांचा एक अजोड रंग

चढे झींग जगण्याला
ओठी मस्तीचा प्याला

एक दिवस तरी
माझ्यातला मी जगला
रंगूनी रंगात सा-या
ओरपला आनंद काला

तसे आपण आयुष्यभर
रंगपचमीच खेळतो
आवडते रंग स्विकारतो
नाआवडता नाईलाजाने
जवळ करतो अथवा
संधी‌ मिळाल्यास नाकारतो

रंग मिश्रणात जेव्हा नसतो
आपलाच रंग
तेव्हा होतो का आपला
जगण्याशी संग?

रंग नेहमी निरागसच असतात
बरे, वाईट ते कधीच नसतात
रंगवणं हाच त्यांचा गुणधर्म
आपल्यालाच कळत नाही वर्म
रंगहीन आयुष्य नच आयुष्यधर्म

वाटतं आता डोळस रंगपंचमी खेळावी
प्रत्येक रंगाला त्याची स्पेस द्यावी
असतो जसा आपला रंग खास
तसाच इतरांचाही रंग हमखास
© दत्तात्रय साळुंके
१७-०३-२०२२

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

रानभुली,
रुपाली विशे-पाटील
खूप धन्यवाद