होळी, धुळवड, रंगपंचमी, भारताची उत्सवप्रियता व इतर जग!

Submitted by यक्ष on 18 March, 2022 - 00:00

सर्वप्रथम समस्त मायबोलीकरांन्ना होळी व धुलिवंदन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

सकाळच्या (वृत्तपत्र नव्हे!) बातम्या मध्ये युक्रेन युद्ध, अर्जेंटीनातील मोर्चे, श्रीलंकेतील महागाई, आफ्रिकन देशांतील खालावत चाललेली परिस्थिती व आपल्या भारतातील राजकिय धुळवडीच्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर जो शिणवटा जाणवला तो दूरदर्शन वरील चित्रहार मध्ये आजच्या दिवशी लागलेल्या रंगपंचमी विशेष गाण्यांन्नी क्षणात नाहीसा झाला!

मला प्रकर्षाने जाणवली ती आपली उत्सवप्रियता ! दुनियेत काहिही होवो (दुनिया जाये भाड मे!) पण आपण आपले उत्सव जोमाने साजरे करतो! होळीच्या एका बोंबेने आपण आयुष्यातील मरगळ एका क्षणात विसारण्याचा प्रयत्न करतो व रंगांच्या इंद्रधनुष्याने आपले आयुष्य पुनःपुन्हा रंगीत करण्याचा प्रयत्न करतो.

परदेशातील (मर्यादीत) वास्तव्यात जे काही तेथील उत्सव अनुभवायला मिळाले त्यापेक्षा मला होळी / धुळवड / रंगपंचमी (पुण्यात रंगपंचमी म्हणजे पाचव्या दिवशी पण विदर्भ / मराठवाड्यात तेवढा धीर कुठे...ते लगेच होळीने पेट घेतला की सुरु होतात...!) ज्यास्त प्रीय.
आपल्या बॉलिवूड ने ही पण त्यात एक मझा आणलीय. (मला पटकन आठवते ती हेमा मालिनी ची दे़खण्या व अवखळ अभिनयाची, जया भादुरी ची खट्याळ अभिव्यक्तीची व मुमताझ च्या श्रुंगारिक जादुची). तसेच आपल्या हास्य कवितेच्या मैफिलींची! हा एक असतो नि़खळ आनंद....कृष्णाच्या मंदिरातील सात्विक व रंगबरसे गाण्यातील श्रुंङारिक रंगपंचमी....

रंगाचे प्रकरण सुरु झाले की माणूस / (विशेषतः ) स्त्रिया लगेच वय विसरवून आयुष्याचा आनंद घेतात. हे इतर कुठे क्वचितच आढळते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाशिकला धुळवड खेळतात पण त्यादिवशी रन्ग नसतो, फक्त होळिची राख लिटरली धुळवडच, नाशिकची रन्गपन्चमी युनिक असते तिथे रहाड उघडली जाते,स्वच्छ केली जाते ,मग त्यात पाणी आणी पक्का रन्ग टाकला जातो वेगवेगळ्या चौकाचे वेगवेगळे रन्ग असतात गुलाबी,केशरी वैगरे मग त्याची पुजा करुन त्यात डूबकी मारली जाते, रन्ग ३-४ दिवस तरी अजिबात जात नाही पण तो नैसर्गिक रन्ग असतो.

उस्तव साजरे करण्याची गरज आहेच रोजच्या कंटाळा आणारणर्या जीवनशैली मध्ये एक दिवस थोडासा बदल
आयुष्य साधं च असते आता आपण उगाच त्याला complicated करून ठेवले आहे .आणि स्वतःला जुंपून घेतले आहे

पण हल्ली मला कुठल्याच सणाला कसलाच उत्साह वाटत नाही. इतकी वर्षे उत्साहाने केले पण आता काहीच करावेसे वाटत नाही. सणाच्या दिवशी सो. मीडियावर जायचीच भीती वाटते, कारण लोकांचे फोटो, मेसेजेस बघवत नाहीत. असं का व्हावं?

धमाल दिवस होता आजचा. मजा आली. गेल्यावेळीही कोरोना वगैरेला फाट्यावर बसवून ईतकीच मजा आलेली. ज्याला जिथे मजा करणे शक्य आहे त्याने ती करावी. जगात युद्ध चालू आहे म्हणून आपण ईथे दुखवटा पाळण्यात काय हशील. तसेच जगातल्या एका कोपऱ्यात कायम पाणी टंचाई असते तर एका कोपऱ्यात मुबलक पाणी. जर हे चित्र कायम राहणार असेल तर नेमके सणांच्या दिवशीच पाणी वाचवण्यात काय हशील. जिथे उपलब्ध आहे पाणी त्यांनी आपल्या पिचकाऱ्या फुल्ल भरून घ्याव्यात.

युद्धावरून आठवले. आमच्याईथे काही लोकं ज्यांचे दहा बारा दिवसांपूर्वी सोसायटी मिटींगमध्ये कडाक्याचे भांडण झालेले ते आज बुरा ना मानो होली है म्हणत एकत्र पाण्यात डुंबत होते. सण उत्सव हे चिंता मिटवतात आणि लोकांमधील वितुष्ट दूर सारत त्यांना एक आणतात. याच साठी मला जातपातधर्म वगैरे संकल्पना बिलकुल आवडत नाहीत वा देवावर चकार विश्वास नाही. पण आपली सणांची परंपरा खूप आवडते. खूप वैविध्य आहे आपल्या सणांमध्ये याचा आनंद वाटतो.

पण हल्ली मला कुठल्याच सणाला कसलाच उत्साह वाटत नाही. इतकी वर्षे उत्साहाने केले पण आता काहीच करावेसे वाटत नाही. सणाच्या दिवशी सो. मीडियावर जायचीच भीती वाटते, कारण लोकांचे फोटो, मेसेजेस बघवत नाहीत. असं का व्हावं?>>> होवु शकत की अस, सोमी सन्यास घ्यावासा वाटणे हे नॉर्मल आहे, सोमिवर काही काही वेळेस आपल्यासाठी उत्स्व की उत्सवासाठी आपण हे न कळावे अस वातावरण असते बट अगेन ते सगळ आभासी आहे दाखवतायत ते असेलच अस नाही हे क्लियर असल की झाल्. तेव्हा तुम्हाला आनद देणार्‍या दुसर्‍या गोश्टी शोधा, हायकिन्ग्, ट्रेकिन्ग, नेचर ट्रेल, बिच वैगरे व्हिजिट करा.

पण हल्ली मला कुठल्याच सणाला कसलाच उत्साह वाटत नाही.
ह्याला सणामधून डोकावणारा समाजाचा चंगळवाद कारणीभूत असू शकतो. पूर्वीचे सणांचे पावन/ पवित्र वातावरण न राहता गणपतीला डीजे, धुलीवंदनाला रस्त्यांवर दारू पिउन धिंगाणा, दिवाळीला फटाक्यांचा कानठळ्या बसवणारा आवाज ह्या कारणांमुळे सण नकोसे वाटत असावेत.

सोमी (जिथे कसल्याही गोष्टींचे फोटो/व्हिडिओ शेअर होतात, सणांच्या दिवशी लग्नात स्वरचित मंगलाष्टकं बसवण्याच्या खटपटी प्रमाणे काहीतरी वेगळे लिहुन शुभेच्छा द्यायची चढाओढ लागते, ते फेसबूक /व्हॉट्सऍप ) कमी करा / सणाच्या दिवशी त्याला सुटी द्या.
सणांच्या दिवशी टीव्ही, रेडिओ फक्त सणाचा फील येईल इतपत थोड्यावेळ लावा (नाही तर दिवसभर सणांची गाणी वाजवत बसतात) आपण सण आपले / पदार्थांचे फोटो / व्हिडिओ काढायला साजरा करणार नाही आहोत असे सणाच्या आदल्या दिवशी पासून स्वतःला बजावून सांगा.

त्याने कदाचित फरक पडेल, आणि सणांचा जास्त आनंद उपभोगता येईल.

काळ बदलला तसे सण साजरा करायच्या पद्धती बदलल्या आहेत.
याबाबतीत जुनी पिढी आणि आताची पिढी यांच्यात जनरेशन गॅपमुळे एकमत होणे अवघडच.

काय आमच्या सोसायटीत पण पार्टी होती. लॉबी लेव्हलला लहान मुले खेळली. मोठी ही असतील. काँट्री काढून जेवण होते. मी चार ला बाहेर पडले तेव्हा देखील तिथून गप्पा , खाणे, कारीओके वर कोणत री लगजा गले ए ए हे गाणे गात होती. हे गाणे फारच प्रसिद्ध आहे कारि ओके गायकांच्यात मनातली भावना व्यक्त करायला सोपे असावे. एक भला थोरला मुलांचा स्वीमिन्ग पूल पण लॉबी वर आला होता व त्यात पाणी रंग उरलेले पडले होते. मी काय प्लास्टिक पाकिटांचे फोटो काढले नाहीत. करु दे पब्लिकला मजा. उद्या हाउसकीपिन्ग करेल साफ. मी फक्त हाउस कीपिन्ग च्या मुलांनी बेल मारली म्हणून त्यांना होळी चे थोडे पैसे दिले. करु देत मजा.

फारच उकाडा होता. पाण्यात थोडे भिजले, केटरर ला त्या कर्मचार्‍यांना थोडा रोज गार मिळाला. सो मच द बेटर. ३०० रु पर प्लेट होते. बुरा न मानो होली है.

दिल्ली फूड वॉक्स वर खास होली स्पेशल ब्रज की होली म्हणून एका ब्रज मधील गावातील मंदिरातील होळी प्रशाद दाखवला. ५६ भोग थाली. ज्याचा नैवेद्य आधी बाल गोपालाला दाखव्तात . एकदम ऑसम व्हेज थाली होती. इथे तर चाळीस दिवस होळी असते. लोक जेनुइनली भाविक वाटले काजळ घातलेले वेगळ्याच प्रकारच्या कुर्त्या घातलेले बाप्ये होते. ते खूपच दोहे ओव्या म्हणत होते. फक्त इथेच बटाटा , सिंघाडेका आटा घातलेली मोठी जलेबी मिळते. प्लस देवाला मिश्र व्हेज भाजी, सुकामेवा, तळलेला सुकामेवा अनेक प्रकारची पक्वान्ने रबडी, रसमलाई चिली( कणकेचा मालपुवा) असे अनेक पदार्थ होते. ५६ भोग च्या मागील कथा पण सांगि तली. गिरीराज भगवान ह्यांनी सात दिवस गोवर्धन पर्वत उचलून धरला. जनतेला प्रोटेक्ट केले. तेव्हा एक कणही अन्न खाल्ले नाही. तर देवाला प्रत्येक दिवशी आठ वेळा नैवेद्य दाखविला जातो म्हणून ही ५६ भोग थाळी.

पुढे इस्कोन मंदिराची पण व्हिजीट दाखवली. एकदा हे ब्रज सर्किट करायला हवे. त्या सुती कुर्ती सुरेख होत्या बाकी. व काजळ घातलेला बाल भावाचा मुख्य पुजारी!!! अगदीआस्थेने सर्व सांगत होते.

छान माहिती अमा,उत्तरेत होळीला खुप धार्मिक महत्व आहे
फक्त इथेच बटाटा , सिंघाडेका आटा घातलेली मोठी जलेबी मिळते>>> आमच्या नाशिकची पण प्रसिद्ध आहे बर का , कधि नासिकला गेलात तर बुध्या हलवाइ कडे खा, नेहमीची तर आहेच पण उपवासाची खास बटाटा जिलेबी मिळते अप्रतिम असते, बुधा हलवाई जिलेबीसाठिच प्रसिद्ध आहे.

हा फक्त आणि फक्त तुमचा प्रश्न आहे>>
हो माझाच प्रश्न आहे. मी कुठे म्हटले की हा सर्वांचा प्रश्न आहे.म्हणूनच मायबोलीवर एक मत मिळावे म्हणून विचारला.

तुम्ही जंगलात जा दहा बारा वर्षासाठी कोणाला काही पडली नाही>>> कुठल्या जंगलात जावे ? तुम्ही तिथूनच आला का तर कृपया मार्गदर्शन करावे. आणि माझ्या कुटुंबाला नक्कीच फरक पडतो. बाकी ऐऱ्या गैऱ्याच्या मताला किंवा काही वाटण्याला माझ्या लेखी शून्य किंमत आहे.

ह्याला सणामधून डोकावणारा समाजाचा चंगळवाद कारणीभूत असू शकतो. पूर्वीचे सणांचे पावन/ पवित्र वातावरण न राहता गणपतीला डीजे, धुलीवंदनाला रस्त्यांवर दारू पिउन धिंगाणा, दिवाळीला फटाक्यांचा कानठळ्या बसवणारा आवाज ह्या कारणांमुळे सण नकोसे वाटत असावेत. >>>>अगदी अगदी

सोमी (जिथे कसल्याही गोष्टींचे फोटो/व्हिडिओ शेअर होतात, सणांच्या दिवशी लग्नात स्वरचित मंगलाष्टकं बसवण्याच्या खटपटी प्रमाणे काहीतरी वेगळे लिहुन शुभेच्छा द्यायची चढाओढ लागते, ते फेसबूक /व्हॉट्सऍप ) कमी करा / सणाच्या दिवशी त्याला सुटी द्या. >>
होय मानवजी शक्यतो नाहीच बघत. पण तरीही नंतर २/३ दिवस सतत ते नोटिफिकेशन येतेच. त्यामुळे वैताग येतो.
सण साजरे करताना मुले किंवा इतर कुटुंबीय बरोबर असतील तर उत्साह येतो. पण ते लांब असतील तर मात्र नाही वाटत. हेही एक कारण आहे.

मानवजी, प्राजक्ता, झंम्पू खूप धन्यवाद. अशाच संयमित प्रतिसादाची अपेक्षा होती. पण trolling मिळाले.

आरती, तुमची भावना पोचली. मलाही कधी मधी असे वाटते. सोमीवरचा धिंगाणा बघून शांतपणे सण साजरे करणे म्हणजे जगावेगळं आहे की काय असे वाटते.

मानव +१

पण हल्ली मला कुठल्याच सणाला कसलाच उत्साह वाटत नाही. इतकी वर्षे उत्साहाने...... +१.

मला रंगपंचमी आवडत नाही.लहानपणी मजा यायची.आता कंटाळा येतो.