कसे ?

Submitted by गारंबीचा शारूक on 16 March, 2022 - 12:56

डायरेक्ट मुद्द्यावर येतो.
त्याचं झालं असं की बरेच दिवस धागा काढला नाही म्हणून खूप जण अस्वस्थ होते. त्यांना नक्कीच हे वाटत असणार की याला काय झालंय ?
तर मित्रांनो मला तुम्हाला खूप सांगायचं होतं की मी एकदम व्यवस्थित आहे पण खूप बिझी आहे.
बिझी होण्याचं कारण म्हणजे म्हणजे धाकट्या गफ्रेने हट्टच धरला की तिच्या समुद्रकिनारी असलेल्या नवीन बंगल्यात रहायला जायचं.
तसा मी एकदम सभ्य म्हणून सर्व पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेच.
आजपर्यंत कधीच कुणाच्या इनबॉक्सात जाऊन जे१ झाले का असे सुद्धा विचारलेले नाही.
मी मासेखाऊ आहे हे तिला माहिती आहे.
समोर समुद्र.
त्यामुळे धर मासा कि टाक तव्यात इतका सिंपल बेत होता.
मसाला तर साधाच. तिला येत पण नाहीत वेगवेगळे मसाले. वाट्यावर पाट्याने कुटून त्यात नारळ आणि दूध घालायचे, मग मोहनरावांना कढईत टाकायचे, ते तडतडायला लागले की मासा अलगद सोडायचा.
आता यात लोच्या एक झालेला आहे. म्हणजे तिने मासे तळले आहेत. घमघमाट सुटला आहे.
तांदळाच्या भाकर्‍या, लाल ठेचा, मिरचीचा खर्डा, कोंबडीवडे आणि सर्वात शेवटी सोलकढी असा बेत आहे.

पण गंमत अशी झालीय कि येताना तिने मला कोविडचा एन ९५ मास्क घालायला सांगितला होता. तो मास्क तसाच आहे. तिने मला ताकीद दिली होती कि मास्क काढू का असे विचारायचे नाही. मी सांगेन तेव्हांच काढायचा.
आता मी वाट बघतोय की ती कधी मास्क काढ असे म्हणतेय .
समोर ताट वाढलेले आहे. नाकात वास जात आहेत. त्याने पोटात कबूतरे ओरडू लागली आहेत.
जर ही विसरली तर ?
मग जे १ कसे करायचे ?
इथे एक से एक अनुभवी आणि तज्ञ लोक आहेत.
तुम्हीच सांगा या सिच्युएशन मधे काय करायला पाहिजे ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोटात कबुतरे?
सिच्युएशन मुळे अशा ठिकाणी लक्षच जात नाही..