नवीन कार घेताना आधीच सर्व पैसे घेतात का?

Submitted by मेधावि on 11 March, 2022 - 03:30

एक माहिती हवी आहे.

एक कार बुक करतोय. पुण्यात. लोन काढणार नाहीये.
बुकींग करायच्या आधी त्या माणसाने माहिती दिली की बुकींग अमाउंट आत्ता भरा आणि उरलेले पैसे कारची डिलीव्हरी घेते वेळी द्या.

बुकींगची रक्कम देताना म्हणाला की अजून दोन लाख रु. आठवड्याभरात आणि पूर्ण रक्कम 25 पर्यंत दिलीत तर पाडव्याला म्हणजे दोन तारखेला डिलीव्हरी मिळेल. ह्यापूर्वी मी कार घेतली होती तेव्हा आधी बुकींगची रक्कम आणि मग उरलेले पैसे डिलीव्हरीच्या दिवशी दिले होते.

हे असे घर विकत घेताना स्लॅब वन, स्लॅब 2 सारखे नव्हते दिले कधी. हे हल्लीच बदलले आहे की तो गंडवतोय समजत नाही. कोणास कल्पना असल्यास अधिक माहीती दिल्यास आनंद होईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्ही पण नुकतीच कार बुक केली आहे पुण्यात..Loan काढणार नाहीये..फक्त Rs 10000 भरलेत ..बाकी actual delivery घेऊ तेव्हाच देणार..त्यांनी मागितले पण नाहीत

Ok.

आम्ही सिंघलकडून स्विफ्ट बुक केलीये. डिलर मुळे अडचण येतीये की काय?

नावाजलेला डीलर असल्यास पूर्ण पैसे भरण्यास हरकत नाही. तुम्ही कोणती गाडी घेणार आहात त्यावर पण अवलंबून आहे. सध्या किया च्या मोटारींना मागणी फार आणि उत्पादन कमी आहे. ३-४ महिने वेटिंग आहे. आशा परिस्थितीत एकाचे बुकिंग दुसऱ्याला द्यायचे प्रकार सर्रास घडतात.

आम्ही सिंघानीयाकडून सॅन्ट्रो बुक केलीये
सिंघानीया ह्युंडाई फक्त मुंबईत आहे. पुण्यात नाही

झं. दा. ,

Sorry !! सिंघलकडून स्विफ्ट बुक केलीये.
वरच्या वाक्यातही बदल केलाय.

मी इतक्या कारां घेतल्या त्या कधीच फुल पेमेंट करून नाही. फायनान्सवर व कंपनीतून त्याचे हप्ते जायचे. मला वाट्ते पाडव्याला डिलिव्हरी हवी असेल तर ही अट असेल. पहिले फक्त बुकिन्ग अमाउंटच भरली आहे. मारुती कंपनीला ट्वीट करून विचारा.

न्यानो काढली का?

मेट्रो आहे की आता. तिने जा स्वस्तात असे मी सुचवत नाही आहे.

न्यानो माझी आहे.
नवी गाडी लेकीची आहे.

मारुती कं ला ट्विट करायची आयडिया चांगली आहे.

नवीन कार करता शुभेच्छा!
शक्यतो डिलर असं करत नाहीत. पण रिसेंटली जेव्हा मी गाडी (क्रिस्टल होंडा विमान नगर - सिटी ऑटो ) घेतली तेव्हा सेल्स अ‍ॅडवाझर म्हणालेला - आरटीओ पासिंग करता पूर्ण पेमेंट ची रिसीट असणं आवश्यक आहे. ही केस आहे का ते पाहा.
मी फायनान्स केलेय पण बाबांनी सेम कंपनीची सेम शोरूम पण गाडी - अमेझ ऑटो घेतली तेव्हा फुल पेमेंट आधी केलं होतं; अर्थात आधी गाडी शोरूम/ डिलर बॅकयार्ड ला आली होती आणि त्यानी व्हिआयएन (व्हेइकल आयडेंटिटीनंबर) चॅसी डिटेल्स वगेरे कंन्फर्म केले होते.

आरटीओ ला देताना फुल पेमेंट ठीक आहे. त्या आधी पण दोन लाख मागितले. मी इतर डीलर्स ना फोन केला तेव्हा हे मधले अधले पैसे इतर जण घेत नाहित असे समजले. मग आमच्या डिलरला फोन करून ठणकावून सांगितले. आता तो वरमलाय. जमले तर बघा म्हणतो.

शेवटची कार मी २००९ साली घेतली. त्या वेळीही फुल पेमेंटच केलं होतं. म्हणजे लोन प्रपोजल केल्यावर डीलरला फुल पेमेंट झाल्यावरच गाडी मिळाली. त्यानंतर टू व्हीलर्स घेतल्या होत्या. पण कधीच मला ही सवलत मिळाली नाही.