माझं दुःख

Submitted by दत्तात्रय साळुंके on 11 March, 2022 - 00:22

माझं दुःख माझ्याशी
एकांती वाद घालत होतं
म्हणालं
सुखाचे सगळे असतात
माझं का कोण नसतं?

मी म्हणालो सर्वाठायी तू
असतोस, उगा का रडतोस
अरे तू तर कर्माचा आरसा
माझ्यासाठी तू सुखच जसा

तरीही त्याच्या हट्टाखातर
झिजवले जोडे शेजारीपाजारी
बंद दारं सारी, नव्हते कुणी घरी
मग माझ्याच घरी
घातली त्याची पथारी

म्हणालो मी त्याला, पाहिलं
अरे ज्याचेत्याचे रांजण
दु:खानं असतात भरलेलं
तसाही तू अगांतूक, नकोसा पाहुणा
पाहुणचार तुझा करायला वेळ कोणा
त्यापेक्षा तू माझाच पाहुचार घे
तुपरोटी खावून जाडजूड हो
मग जा तुला वाटलं जावसं तर
नाही आडवली वाट तुझी
तरी मनात दाटेल हुरहूर

त्यावर ते फुंरंगटलं म्हणालं
तुझी हीच एक वाईट खोड
संतांसारखाच तुही द्वाड
आत्ममग्न तू
तुला मी का जड

मित्रांनो तेव्हापासून मांझ दुःख
माझ्याघरी सुखात नांदतय
सगळे सोडून गेले तरी तेच
हल्ली माझी सोबत करतयं

© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुमार १ Happy
आबा ... Happy

मनापासून धन्यवाद...

सामो,
SharmilaR

खूप धन्यवाद....