मराठी भाषा दिवस : अभिवाचन - तुम मुझे यू भुला ना पाओगे - शान्त माणूस

Submitted by संयोजक-मभादि on 3 March, 2022 - 23:42

उपक्रम - अभिवाचन/साहित्यवाचन
सदस्य नावः शान्त माणूस
लेखः तुम मुझे यू भुला ना पाओगे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नावाप्रमाणे शांत आणि संयमित आवाजात अभिवाचन केलंय्.. छान..!
अभिवाचनात गाणी सुंदर म्हटली आहेत तुम्ही...
गाणी आणि संगीत दोहोंची आवड दिसतेयं खूप..!

छान. शांत आवाज.
ध्वनीमुद्रणात प्रतिध्वनी आलाय.

दत्तात्रेय साळुंके, चौथा कोनाडा, सामो, च्रप्स , वीरु, प्राचीन, अ'निरु'द्ध, शर्मिला आर, मृणाली समद, सामो आपणा सर्वांचे मनापासून आभार.

रुपाली विशे-पाटील >>> कानावरचे अत्याचार सहन केल्याबद्दल सर्वप्रथम आभार. Happy
गाण्याची / संगीताची विशेष करून ऐकण्याची आवड आहे. कधी कधी गाण्याचा मूड होऊन आजूबाजूचे संकटात सापडतात हे बायप्रॉडक्ट आहे.

मानव >> धन्यवाद. तुमचे निरीक्षण अचूक आहे. घाईत केलं आहे. ऑडीटोरियमच्या बाहेरच्या पॅसेजमधे फार आवाज घुमत होता. कराओके मधे नाही आलेले इको.

__/\__

ऋन्मेषच्या कमेंटला काहीतरी भन्नाट उत्तर सुचलं होतं. शेवटी ते टाईप करताना वीज गेली. वायफाय जाईल म्हणून घाईत सेव करताना एवढेच सेव झाले.
नंतर आठवले कि पुन्हा एकदा लिहून ठेवीन.
तोपर्यंत आभार. Happy

शान्त माणूस,
उत्कृष्ट अभिवाचन..!
'गोष्ट' सांगण्याची तुमची शैली अगदी सहज साधी निर्मळ आहे. समोर बसून सांगितल्यासारखं वाटलं.
आणि तुमच्या आवाजात भावनांचं थेट वहन करण्याची ताकद आहे, हे एक आवर्जून सांगू इच्छितो..!
आणखी अभिवाचने ऐकायला मिळावीत, या शुभेच्छा..
Happy

शांत माणूस
कशाचं कौतुक करू ?
आवाजाचं , गायकीचं की अभिवाचनाचं ?
जेव्हा सारंच उत्तम आहे .
तुम्ही मागे आवाजही कल्पकतेने वापरले आहेत .