मराठी भाषा दिवस : अभिवाचन - संस्मरणीय - प्राचीन

Submitted by संयोजक-मभादि on 27 February, 2022 - 10:15

अभिवाचन
संस्मरणीय
सदस्य नावः प्राचीन

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राचि कसलं छान वाचलयस गं. त्या चिनी मुलीचा आवाज. एकंदर भावना मस्त पोचवल्या आहेस. दिव्य होता तो प्रवास. खरच.

छान वाचलंय. आवडलं.
आमचा एक १९ तासाचा प्रवास असा तीन दिवस दोन वेगळी हॉटेलं चालूच होता तो आठवला. Happy

छान वाचलंय! पहिल्याच विमान प्रवासात असा दांडगा अनुभव मिळायला नशीब लागत असावे. Wink

मी ही एकदा क्वालालुंपुरला असा अडकलो होतो, शांघाय वरून येताना. विमान उशिरा पोचले आणि हैद्राबादचे विमान निघुन गेले होते. त्यांचे दुसरे विमान मग २४ तासांनीच. इतर कुठल्या विमानात सोय करून द्या म्हणुन भांडून झालं, पण नाही. मग तसंच, विमानतळावरील हॉटेलमध्ये सोय केली त्यांनी, दुसऱ्या दिवशी फिरून आलो शहरात आणि संध्याकाळच्या विमानाने परत आलो.

मस्तच!
एकदम चित्रदर्शी वर्णन आणि वाचन.

वावे, कुमार१, हर्पेन, सामो, सीमंतिनी, अन्जू, हीरा, अस्मिता., जाई., स्वाती२, लंपन- सगळ्यांनी कौतुक केलेत त्यामुळे बरे वाटले. धन्यवाद. वावे आणि हर्पेन, तुम्ही सुचवले आहे, त्याचा विचार करून जमल्यास बदल करते.

एकदम चित्रदर्शी वर्णन आणि वाचन. >>> अगदी अगदी.

एकदम बापरे वाटलं सुरुवातीला, छान निभाऊन नेलत, मुलाचे कौतुक खरोखर. शेवट गोड झाला, मलाही हुश्श झालं वाचून .

अभिवाचन आणि किस्सा दोन्हीही भारी आहेत. किस्सा थरारकच आहे. अशी वेळ कुणावरही न येवो.
अभिवाचन इतकं सहज आणि खणखणीत आहे कि प्रोफेशनल असावं असं वाटावं. एनर्जी लेव्हल मेण्टेन केली आहे. एक्स्प्रेशन्स आहेत. मोनोटोनस झालेलं नाही आणि सर्वात महत्वाचं नाटकीपणाही कुठे आलेला नाही. अगदी संतुलित आणि लक्षवेधी असे झालेय वाचन... आवडेल पुन्हा ऐकायला.

वावे, कुमार१, हर्पेन, सामो, सीमंतिनी, अन्जू, हीरा, अस्मिता., जाई., स्वाती२, लंपन- सगळ्यांनी कौतुक केलेत त्यामुळे बरे वाटले. धन्यवाद. वावे आणि हर्पेन, तुम्ही सुचवले आहे, त्याचा विचार करून जमल्यास बदल करते.= क्षमस्व. हा प्रतिसाद माझ्या म. भा. दि. लेखावरील प्रतिसादांसाठी होता. गडबडीत इथे दिला. Uhoh
तरी मी लेखाचे प्रतिसाद वाचले आणि माझा प्रतिसाद कुठे हरवला ते शोधत होते. इथे गावला शेवटी.

फारच छान ग, म्हणजे छान सादर केलस.
पण अनुभव डेंजरच. सगळं नीट पार पाडलस हे छान

सामो, अमितव, मानव, गजानन, वावे, च्रप्स, अन्जू, शान्त माणूस, रूपाली, वर्णिता, अवल - कौतुकाबद्दल आभारी आहे.
अमितव, तुम्ही तीन दिवस हा त्रास कसा काय सहन केलात, धन्य आहे हो.
मानव, हो ना. पहिल्या विमानप्रवासात एकदम परदेशी जाण्याचा निघण्यापूर्वी थोडा दिमाख मिरवला होता मी . त्यामुळे आणखीनच त्रासदायक वाटलं तेव्हा. Angry
गजानन, चित्रदर्शी आहे कारण मी अजूनही तेव्हाचे बरेच काही विसरू शकलेले नाही..
वावे, रूपाली, वर्णिता - संयोजकांमुळे ही संधी मिळाली.
च्रप्स, कथावाचन आवाज हे कौतुक आवडलंच.
अन्जू आणि अवल, मी खरंतर भित्री आहे. पण त्या प्रसंगामुळे जरा कणखर बनावं लागलं. मुलाच्या निर्धास्तपणामुळे जरा बरं झालं.
शा. मा., तुम्ही सूक्ष्म व सविस्तर जे विश्लेषण केले आहे त्याबद्दल धन्यवाद तर देतेच पण कौतुकही करते.

खुपच आवडलं. अन्जू आणि शामांना अनुमोदन. आधी म्हंटलं तसं तुमच्या आवाजात अजूनही कथा, प्रवासवर्णनं ऐकायला आवडतील

प्राचीन
प्रवास आवडला आणि वाचन प्रवास सुद्धा !