द फेम गेमः वेब सीरीज परीक्षण रिस्क घेतलीच तिने!!

Submitted by अश्विनीमामी on 27 February, 2022 - 07:06

माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट हा चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हा मी तो कौतुकाने थेटरात जाउन बघि तला होता व वैतागून ती काहीच रिस्क घेत नाही हा परीक्ष् णाचा धागा काढला होता. रूप व हसण्यावर पूर्ण चित्रपट निभावून नेलेला अ‍ॅक्टिन्ग कधी करणार बाई असा वैता ग तेव्हा आलेला होता.

द फेम गेम ही माधुरी मुख्य कलाकार असलेली वेब सीरीज काल परवात भारतातील नेटफ्लिक्स वर रिलीज झाली आहे. ती काल व आज बसून बिंज वॉ च करून संप विली व एक प्रकार चा आनंदाचा धक्का बसला. तिने रिस्क घेतली आहे व ती यशस्वी झालेली आहे. त्या अजरामर सुहास्याच्या मागची लोखं डी व्यक्तिरेखा तिने यशस्वी पणे वेब सीरीजच्या माध्यमातून पुढे आणली आहे. सैफ ने सेक्रेड गेम्स मधून वेब सीरीज माध्यमात चांगले ट्रांझि शन केले तसेच माधुरीने ह्या मालिकेतून वेब सीरीज मध्ये यशस्वी पदार्पण केले आहे. वे टु गो मॅम दुसरा सीझन लवकर आणा.

आठ भागांची मालिका उत्कंठा वर्धक थ्रिलर आहे त्यात अनेक भाग आहेत त्यामुळे स्पॉयलर देत नाही. पण कथा वस्तू नीट बांधलेली वाटली. मुंबईत एका सोशल क्लास मध्ये जग णारे आईबाप मुले ह्यांचे संबंध इतराशी इंटरअ‍ॅक्षन अगदी योग्य व सहज पकडली आहे. त्यांच्या नात्यातील
असंख्य गाठी निरगाठी उकलत कथा पुढे जाते.

चित्रपटाच्या ग्लॅमरस जादु ई दुनीये मागचे काही घाणेर डे सत्य प्रकाशात आणले जाते. मीना कुमारी, मधुबाला श्रीदेवी, नीतुसिंग ह्या पठडीतल्या नायिकांनी अनामिका आनंद चे वास्तव भोगले आहे. सुंदर मुलगी म्हण जे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी तिला तिचे जीवन ते काय तिचे नि र्णय स्वातंत्र्य खच्चीच केले पाहिजे तिला नाचवले पाहिजे व आलेले पैसे बळकावले पाहिजेत ह्या मानसिकतेचे विदारक चित्रण ह्या मालिकेत होते.
अनामिका चे अडकले पण तिची सुटण्याची धडपड, एक प्रकारचा रूथलेस स्वभाव कथेला पुढे नेतो.

माधुरी चे कपडे अप्रतिम लेव्हलचेच आहेत व तिने खरे तर आईचाच रोल केला आहे. ( साधार ण वय झालेल्या हिरॉइन्स नी आई चे रोल्स घ्यावेत अशी अपेक्षा असते तसाच हा आहे पण ही आई सध्याची आहे.) सपोर्टींग मध्ये तिची आई नवरा मुले ह्यांचे रोल्स आहेत. तिचा मेकप मॅन, तो पोस्टर रंगवणा रा मॅन मनीश खन्ना तिचा प्रेमिक व सुपर स्टार ह्यांचे रोल्स ही कलाकारांनी योग्य केले आहेत. परंतु सीरीज पूर्ण पणे
माधुरीच्याच खांद्यावर आहे व जबाबदारी तिने पेलली आहे. ( ते नाजूक खांदे!!) चेहरा वयस्कर दिसतो अगदी ट्रीट करून सुद्धा पण आ तले सोने अनुभवाने प्रकाशमान झाले आहे अशी ती अनामिका आनंद आहे. वय्स्कर तिशी चाळीशी पन्नाशी साठीतल्या स्त्रियांच्या सुद्धा कथा अस्तात व त्या सांगण्या सारख्या असतात हे आता प्रेक्षकांच्या व कंटेंट बनवणार्‍यांच्या लक्षात येउ लागले आहे. हे ही नसे थोडके.

कथेतील पात्रांचा मराठी पणा अधून मधून येतो तो छान वाटतो. आई एकदा मुलग्यासाठी साबुदाणा खिचडी बनवून घेउन येते. तो सीन छान आहे. तसेच आई मुलग्याचा एक संवेदनशील वैयक्तिक बाबीवर आधारीत सीन पण चांगला घेतला आहे.

गुन्ह्याचा तपास कर् णारी पोलीस ऑफिसर पण कामाच्या ठिकाणी डिस्क्रिमिनेशन चा सामना करत आहे. ही समलिंगी संबंधात आहे.
साधारण फ्रेंड्स मधील रॉस च्या बायकोचा बाज ह्या दोन आया मुलाच्या कस्ट डी साठी भांडायचे ठरवतात. एकूणच मुलांसाठी काही करायला तयार असलेली आई हा कथेचा कणा आहे. व शेवटी एक ट्विस्ट आहे तो मुळातूनच बघा.

आर्ट डिरेक्षन बॅक ग्राउंड संगीत अगदी नयन सुखद कर्ण सुखद आहे. एकंदरीत एक विषारी व्हेलवेट चॉकोलेट आपल्याला सुंदर सिरॅमिक प्लेट मध्ये आणून दिल्यासारखे आहे. पण आत काही असे घटक आहेत जे नक्कीच घशात अडकतील. विषबाधा होईल असे आहेत.
पण आपली माधुरी त्यावर मात करते व पुढे जाते. ( सौंड्स फॅमिलिअर!१) शेवटा ला एका सीन मध्ये परिस्थितीशी सामना कसा करायचा ह्याचया गहन विचा रात बुडलेली शिळाबधिर झालेली आई. ती आहे ह्या सुरक्षित भावनेने शान्त निवांत आईच्या मांडीवर झोपून गेलेली
ग्रोन अप बाळे शेजारी हनुमानासारखी बसलेली मावशी. ह्या फ्रेमला तर आमच्या कडे राम पंचायतना चा फोटो बघितल्या सारखी उत्स्फूर्त दाद मिळाली.

सीरीज मधली घरे, फार्म हाउसेस बंगले फार सुरेख डिझाइन व शूट केले आहेत.

माधुरीचा प्रेमीक म्हणोन खानांपैकी एखादा किंवा संजूबाबा शोभून दिसला असता पण वेब सेरीज चे तेवढे बजेट कुठले असायला तरीही ही हाय बजेट सीरीअल आहे. संजुबाबा वयस्कर दिसतो. मानव कौल ने चांगले काम केले आहे पण तिच्या पुढे साधाच दिसतो.
संजय कपूर मध्यम वयीन नको श्या झालेल्या नवर्‍याच्या रोल मध्ये टाइप कास्ट होउन जाईल असे वाट्ते.

एकदा नक्की बघा. युट्युब लिंक कृपया इथे प्रतिसादात देउ नये. नेटफ्लिक्स वर्गणी भरून बघावे. धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज एका दिवसात दोन धागे काढले. पण सीरीज बद्दल लिहायचेच होते. कारण तिने रिस्क घेतली तर आपण नोंद घेतली पाहिजे. व कौतूकही केले पाहिजे. नुसती एका पिक्चर वर टीका करून असे कलाकार विसरता येत नाहीत. व उद्या हॉरिबल काम आणि आल्यावर काही लिहायची शक्ती उरणार नाही म्हणून रवि वारचा सदुपयोग केला. बाफ बाजी बद्दल माफी असावी.

बाईंचा पंखा असल्याने कालच बघितली. आवडली. तिचे मुलांबरोबरचे सगळेच सिन मस्त जमलेत आणि तिथे ती एक साधारण आईच वाटते खासकरून तुम्ही म्हणत आहात तो सिन, अजिबात फार melodrama नाही छानच जमलाय तो सिन. एका सीनमध्ये मनीषला त्याची जागा दाखवते तो सिन मस्त आहे, अजून एका सीनमध्ये ज्युनिअर हिरॉईनला टोला लावते ते पण छान घेतलंय. शेवटच्या भागात पण छान काम केलंय. पेस संथ आहे काहीवेळेस नको इतका. सर्वच कलाकारांची कामे उत्तम झालीत मायनस पोलीस इन्स्पेक्टर, एकदम बकवास काम केलंय तिने एवढा चांगला रोल असून.

संजीव कपूर कोण ?>> अनील कपुर चा मोठा भाउ. शनाया चा बाबा. शनाया आता लाँच होते आहे. अनन्या नंतर तिचाच नंबर आहे. राजा नावाच्या सिनेमात त्यांनी आधी एकत्र काम केले होते. संजीव कपुर चा लाँच सिनेमा पाच वर्शे रखडला होता त्यामुळे त्या च्य बरोब र तब्बुचा लाँच पण अक्खी पाच वर्शे रखडलेला. ह्याचे नाव संजय कपूर आहे दुरुस्त करते.

माधुरी आवडत नाही आणि अभिनयात देखील कमी पडते... अन बायस्ड होऊन हि सिरीज बघायला घेतली- सुखद धक्का आहे... छान अभिनय केला आहे.. 4 एपिसोड पाहिले ... माधुरी ने उचलली आहे सिरीयल संपूर्णपणे... फिटनेस देखील मस्त आहे...
थोडे स्लो एपिसोड आहेत.. वेग पाहिजे होता...
जास्त स्लो झाली तर सिरीज पूर्ण बघण्याची इच्छा निघून जाते...

अमा, पहीला परिच्छेद वाचून थांबले आहे. बरं वाटलं! माधुरी आवडते त्यामुळे तिला चांगली कामे करायला मिळावीत असे वाटते. आता फेम गेम बघेन.

छान परिक्षण.
बघते आहे. मालिका संथ वाटते. माधुरीने अनामिका छान साकारली आहे.
काही गोष्टी खटकल्या पण कथेबद्दल आत्ताच बोलायला नको.

सुखद धक्का!
काल चालू केली. माधुरी हसे करून घेईल वाटत असताना तिने फारच सुंदर काम केलं आहे. बघतोय.

चांगली आहे सीरिज.
माधुरी दिसली आहे छान, कपडेपटपण छान आणि अभिनयपण छान केला आहे.
तिच्या मुलाचे काम लक्षवीर सरनने केले आहे. त्याचाही अभिनय छान आहे. मनातील चलबिचल, गिल्ट छान व्यक्त केला आहे.
काही लुझ एण्डस् सोडले आहेत त्यामुळे सिझन २ येईल असं वाटतंय.
बादवे, मकरंद देशपांडेंना छोट्या भुमिकेत वाया घालवले आहे असे मला वाटले.

माधुरी हसे करून घेईल वाटत असताना तिने फारच सुंदर काम केलं आहे < मलाही असे वाटले पण माधुरीचे काम मस्त आहे ह्यात.

माधुरीचे कपडे यावेळी चक्क छान आहेत पण अ‍ॅक्टिंग , डॉयलॉग्ज आणि स्क्रिन प्रेझेन्स नेहेमी प्रमाणे एकदमच ९० च्या काळातला शाळकरी गॅदरींग मधल्या हौशी अ‍ॅक्टर्स टाइपचे !

संपवली.
अवि फार आवडला. सहज वावरला आहे, त्याच्या कॅरेक्टरला सगळ्यात जास्त छटाही आहेत. येईल पुढे हा.
आणखी एक आवडलं म्हणजे बॅकग्राऊंड स्कोर... रादर मोस्टली लॅक ऑफ इट. सगळेच महत्त्वाचे प्रसंग, संवाद आणि अभिनयाने उभे रहातात. टिपिकली देसी ड्राम मध्ये कायच्या काय बॅकग्राऊंडला वाजत असतं, तसं इथे काहीच नाही. हे जाणवण्याइतकं ठळक उठून दिसलं.
शेवटचा ड्रामा आधी कायच्या काय आणि मग क्लिशे असा वाटत रहातो. पण ते ठीकच आहे. इतर कुठल्या शक्यतांपेक्षा हे असंच काही होईल वाटलेलं. ते फक्त दाखवताना जरा कन्विनिअंटली दाखवलंय.
माधुरीला सेकंड इनिंग मध्ये आता चांस दिसतो आहे. हा रोल पठडीत राहुन थोडा बाहेरचा होता. टाईप कास्ट न होता वय इ. प्रमाणे रोल घेतले तर स्कोप आहे.
संजय कपूर सुरुवातीच्या काही सीन्स मध्ये उगाचच ओरडून बोलत होता, आणि त्याला काही झेपतही न्हवतं. मग ठीक होता.
स्त्री पात्र सेमसेक्स दाखवणे आणि तिचा पार्टनर डिव्होर्स मधुन जात असणे आणि मुलाची कस्टडी फाईट... यातच सेमसेक्स चेकमार्क टिक होतोय की काय वाटलं. अगदी असाच त्या कारखानिसांची वारी मध्ये टिक झालेला. पण इथे अजुन जास्त जवळुन दुसरं पात्र उभं रहातं. त्याचा स्टगल ही बिलिवेबल वाटतो. नुसतं चेकमार्क फीचर केलं नाही ते ही आवडलं.

मलाही आवडली, माधुरी आवडतेच यातही आवडलीये, ड्रेसिन्ग सुरेख आहे, सजय कपुर आक्रस्ताळा वाटला पण त्याच्या विषयी सिम्पथी आहे त्या नेफ्लीच्याच बॉलीवुड वाइफ सिरिज पाहिल्यापासुन.
फक्त सिरिज खुप सन्थ आहे त्यामुळे ग्रिप सुटून इन्ट्रेस्ट कमी होतो.

अमा, कृपया गैरसमज नसावा, पण एक सुचवू का?
तुमच्या मजकुरात बरेच शब्द तुटक तुटक दिसतात, शब्दांच्या मध्ये अनावश्यक स्पेसेस दिसतात. त्यामुळे वाचताना फार विस्कळीत वाटतं.
तुम्ही बहुधा स्पीच टू टेक्स्ट वापरता किंवा वर्ड सजेशन्स सिलेक्ट करता, असा माझा अंदाज आहे.
पण सगळा मजकूर एकदा पाहून घेऊन त्यातल्या अनावश्यक स्पेसेस काढत जाल का?

तुमच्या पोस्ट्स, सिनेमा-सीरीज रिव्ह्यूज वाचायला मला आवडतं, पण तुटक शब्दांमुळे ते मध्येच सोडून दिलं जातं.

तुम्ही बहुधा स्पीच टू टेक्स्ट वापरता किंवा वर्ड सजेशन्स सिलेक्ट करता, असा माझा अंदाज आहे.>> तो चुकीचा अंदाज आहे.

ललिता-प्रीति,
हा दोष अमांचा नसावा. मायबोलीतच टंकले की असे होते. पोस्ट करण्याआधी शब्द पूर्ण दिसतो. पोस्ट केल्यानंतर तो अनावश्यक तुटतो. एडीट करतानाही अंदाज येत नाही.

लिहिता लिहिता दुरुस्ती केली की अक्षरे एकमेकांत गुंतून पडतात. ती गुंतू नयेत म्हणून नको बिघडलेला मजकूर उडवून पुन्हा टाइप करायच्या आधी स्पेस द्यावी लागते. मग पुन्हा टाइप करा , मागे येऊन स्पेस उडवा एवढे उपद्व्याप करावे लागतात. माझ्याही प्रतिसादांत बरेचदा शब्द असे तोडलेले राहतात.

तो चुकीचा अंदाज आहे. >>> ठीक.

पोस्ट करण्याआधी शब्द पूर्ण दिसतो. पोस्ट केल्यानंतर तो अनावश्यक तुटतो. एडीट करतानाही अंदाज येत नाही.
>>> मग या तुटक्या शब्दांवर उपाय काय? कारण बरंच काही वाचायचं राहून जातं त्यामुळे.

माधुरी ग्रेट अभिनेत्री नव्हती हे माझेही मत आहे. पण ते तिच्या नृत्य आणि सौंदर्य या स्वत:च्याच दोन गुणांच्या तुलनेत. पण मला नाही वाटत की ती अभिनयात ईतकी सामान्य होती की जे हसे करून घेईल. कमर्शिअल कलाकार एखाद्या चित्रपटात पाट्या टाकतात त्याला बरेचदा दिग्दर्शक आणि काही वेळा निर्माताही जबाबदार असतो.

असो. योग आला तर बघेन ही सिरीज. फेसबूकवरही बरेच आणि चांगलेच ऐकलेय.

मला तर मनीष खन्ना खूप आवडला... मानव कौल....!! किती इंटेंस अभिनय केलाय ! ऑल सीन्स खाऊन टाकलेत माधुरी सोबतचे.....फक्त डोळ्यांनी....

माधुरी पण सुरेख दिसते..... !! त्या लाल चाईनीज ड्रॅगन ड्रेस मधे विषेशतः !
शेवटी मु लीलाही तसलाच ड्रेस का दिला?
माधुरी चे पुल ओव्हर जॅकेट्स किंवा रोब्ज.....जे काय आहेत ते खूपच मस्त आहेत....!!
हे सगळे कपडे इंपोर्टेड असतिल का? कि भारतातच मिळतात? डिझाईनर असणात अर्थात!

तिचा मुलगा अवि....रणवीर ची ज्यु. आवृत्ती वाटतो ...............सेम तसाच मुद्रा भिनय!
.

बघतेय, शेवटचे भाग स्लो वाटताय पण. अवि चा रोल आवडला. माधुरीने चांगलं केलंय काम आणि ड्रेसेस तर फारच उत्तम.

मला तर मनीष खन्ना खूप आवडला... मानव कौल. >>> हो मलाही आवडला. समोर माधुरी असो कि अजून कोणी, सहज वावर आहे त्याचा.
संजय कपूर सेम टाईपचे रोल करतोय कधीचे,, अभिनय चांगला असला तरी त्याच्या जागी दुसरा कोणीही चालला असता. मुलगी फक्त एपिसोड्स फिल करायला घेतल्यासारखी वाटते. जान्हवी ची झलक आहे तिच्यात. तशीच वाटली.

माधुरी चे पुल ओव्हर जॅकेट्स किंवा रोब्ज.....जे काय आहेत ते खूपच मस्त आहेत....!!>> हो मलाही फार आवडले, एकदम स्टाइलिश दिसतायत.
हे सगळे कपडे इंपोर्टेड असतिल का? कि भारतातच मिळतात? डिझाईनर असणात अर्थात!>> स्टाइलवरुन तरी भारतातलेच वाटतायत इन्स्टावर मिळेल बहुधा

पाहिला पहिला सीझन.
खूप ग्रेट नाही, पण एन्टरटेनिंग वाटला. मानव कौलचा अभिनय आणि वावर आवडला.
तसंच माधुरीच्या मुलीचा रोल केलेल्या मुलीनेही चांगलं काम केलंय. बाकी नटमंडळीही आपापल्या रोलमध्ये ठीकठाक वाटली.
नेनीणबाईंचा अभिनयमात्र अगदीच शाळकरी वाटतो.
मला सारखी 'आर्या'मधली सुश्मिता सेन आठवत होती - तिने काय मस्त कॅरी केलं होतं अल्फा फीमेलचं बेअरिंग! आणि विश्वासघाताचं दु:खही.

अनामिका गायब होण्यातली मिस्टरी बर्‍यापैकी प्रेडिक्टेबल वाटली, तरीही काही उत्तरं अजून मिळायची आहेत. तेव्हा दुसरा सीझन आला की पाहणार नक्की.

संपवली... मकरंद स्टीरीओटाईप अभिनय करतो - त्याच
लेव्हल चा रोल आहे त्याला...
माधुरीबध्दल चे मत तेच.. अभिनय जमत नाहीय.. सुरुवातीला एक दोन एपिसोड चांगला वाटला नंतर एकदम सुमार...

सर्वात चांगला अभिनय अवि च्या मित्राचा व मनीष खन्ना च्या मुलीचा वाटला... आणि अर्थातच मनीष खन्ना चा...

Pages