द फेम गेमः वेब सीरीज परीक्षण रिस्क घेतलीच तिने!!

Submitted by अश्विनीमामी on 27 February, 2022 - 07:06

माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट हा चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हा मी तो कौतुकाने थेटरात जाउन बघि तला होता व वैतागून ती काहीच रिस्क घेत नाही हा परीक्ष् णाचा धागा काढला होता. रूप व हसण्यावर पूर्ण चित्रपट निभावून नेलेला अ‍ॅक्टिन्ग कधी करणार बाई असा वैता ग तेव्हा आलेला होता.

द फेम गेम ही माधुरी मुख्य कलाकार असलेली वेब सीरीज काल परवात भारतातील नेटफ्लिक्स वर रिलीज झाली आहे. ती काल व आज बसून बिंज वॉ च करून संप विली व एक प्रकार चा आनंदाचा धक्का बसला. तिने रिस्क घेतली आहे व ती यशस्वी झालेली आहे. त्या अजरामर सुहास्याच्या मागची लोखं डी व्यक्तिरेखा तिने यशस्वी पणे वेब सीरीजच्या माध्यमातून पुढे आणली आहे. सैफ ने सेक्रेड गेम्स मधून वेब सीरीज माध्यमात चांगले ट्रांझि शन केले तसेच माधुरीने ह्या मालिकेतून वेब सीरीज मध्ये यशस्वी पदार्पण केले आहे. वे टु गो मॅम दुसरा सीझन लवकर आणा.

आठ भागांची मालिका उत्कंठा वर्धक थ्रिलर आहे त्यात अनेक भाग आहेत त्यामुळे स्पॉयलर देत नाही. पण कथा वस्तू नीट बांधलेली वाटली. मुंबईत एका सोशल क्लास मध्ये जग णारे आईबाप मुले ह्यांचे संबंध इतराशी इंटरअ‍ॅक्षन अगदी योग्य व सहज पकडली आहे. त्यांच्या नात्यातील
असंख्य गाठी निरगाठी उकलत कथा पुढे जाते.

चित्रपटाच्या ग्लॅमरस जादु ई दुनीये मागचे काही घाणेर डे सत्य प्रकाशात आणले जाते. मीना कुमारी, मधुबाला श्रीदेवी, नीतुसिंग ह्या पठडीतल्या नायिकांनी अनामिका आनंद चे वास्तव भोगले आहे. सुंदर मुलगी म्हण जे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी तिला तिचे जीवन ते काय तिचे नि र्णय स्वातंत्र्य खच्चीच केले पाहिजे तिला नाचवले पाहिजे व आलेले पैसे बळकावले पाहिजेत ह्या मानसिकतेचे विदारक चित्रण ह्या मालिकेत होते.
अनामिका चे अडकले पण तिची सुटण्याची धडपड, एक प्रकारचा रूथलेस स्वभाव कथेला पुढे नेतो.

माधुरी चे कपडे अप्रतिम लेव्हलचेच आहेत व तिने खरे तर आईचाच रोल केला आहे. ( साधार ण वय झालेल्या हिरॉइन्स नी आई चे रोल्स घ्यावेत अशी अपेक्षा असते तसाच हा आहे पण ही आई सध्याची आहे.) सपोर्टींग मध्ये तिची आई नवरा मुले ह्यांचे रोल्स आहेत. तिचा मेकप मॅन, तो पोस्टर रंगवणा रा मॅन मनीश खन्ना तिचा प्रेमिक व सुपर स्टार ह्यांचे रोल्स ही कलाकारांनी योग्य केले आहेत. परंतु सीरीज पूर्ण पणे
माधुरीच्याच खांद्यावर आहे व जबाबदारी तिने पेलली आहे. ( ते नाजूक खांदे!!) चेहरा वयस्कर दिसतो अगदी ट्रीट करून सुद्धा पण आ तले सोने अनुभवाने प्रकाशमान झाले आहे अशी ती अनामिका आनंद आहे. वय्स्कर तिशी चाळीशी पन्नाशी साठीतल्या स्त्रियांच्या सुद्धा कथा अस्तात व त्या सांगण्या सारख्या असतात हे आता प्रेक्षकांच्या व कंटेंट बनवणार्‍यांच्या लक्षात येउ लागले आहे. हे ही नसे थोडके.

कथेतील पात्रांचा मराठी पणा अधून मधून येतो तो छान वाटतो. आई एकदा मुलग्यासाठी साबुदाणा खिचडी बनवून घेउन येते. तो सीन छान आहे. तसेच आई मुलग्याचा एक संवेदनशील वैयक्तिक बाबीवर आधारीत सीन पण चांगला घेतला आहे.

गुन्ह्याचा तपास कर् णारी पोलीस ऑफिसर पण कामाच्या ठिकाणी डिस्क्रिमिनेशन चा सामना करत आहे. ही समलिंगी संबंधात आहे.
साधारण फ्रेंड्स मधील रॉस च्या बायकोचा बाज ह्या दोन आया मुलाच्या कस्ट डी साठी भांडायचे ठरवतात. एकूणच मुलांसाठी काही करायला तयार असलेली आई हा कथेचा कणा आहे. व शेवटी एक ट्विस्ट आहे तो मुळातूनच बघा.

आर्ट डिरेक्षन बॅक ग्राउंड संगीत अगदी नयन सुखद कर्ण सुखद आहे. एकंदरीत एक विषारी व्हेलवेट चॉकोलेट आपल्याला सुंदर सिरॅमिक प्लेट मध्ये आणून दिल्यासारखे आहे. पण आत काही असे घटक आहेत जे नक्कीच घशात अडकतील. विषबाधा होईल असे आहेत.
पण आपली माधुरी त्यावर मात करते व पुढे जाते. ( सौंड्स फॅमिलिअर!१) शेवटा ला एका सीन मध्ये परिस्थितीशी सामना कसा करायचा ह्याचया गहन विचा रात बुडलेली शिळाबधिर झालेली आई. ती आहे ह्या सुरक्षित भावनेने शान्त निवांत आईच्या मांडीवर झोपून गेलेली
ग्रोन अप बाळे शेजारी हनुमानासारखी बसलेली मावशी. ह्या फ्रेमला तर आमच्या कडे राम पंचायतना चा फोटो बघितल्या सारखी उत्स्फूर्त दाद मिळाली.

सीरीज मधली घरे, फार्म हाउसेस बंगले फार सुरेख डिझाइन व शूट केले आहेत.

माधुरीचा प्रेमीक म्हणोन खानांपैकी एखादा किंवा संजूबाबा शोभून दिसला असता पण वेब सेरीज चे तेवढे बजेट कुठले असायला तरीही ही हाय बजेट सीरीअल आहे. संजुबाबा वयस्कर दिसतो. मानव कौल ने चांगले काम केले आहे पण तिच्या पुढे साधाच दिसतो.
संजय कपूर मध्यम वयीन नको श्या झालेल्या नवर्‍याच्या रोल मध्ये टाइप कास्ट होउन जाईल असे वाट्ते.

एकदा नक्की बघा. युट्युब लिंक कृपया इथे प्रतिसादात देउ नये. नेटफ्लिक्स वर्गणी भरून बघावे. धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

rmd ह्या गोष्टी वेबसिरिज मध्ये compulsory यायलाच हव्यात असं करतात हल्ली. वीट येतो, तोचतोचपणा वाटतो. >>> खरंय. चेकलिस्ट असल्यासारखं झालं आहे.

>>वीट येतो, तोचतोचपणा वाटतो. >>> खरंय. चेकलिस्ट असल्यासारखं झालं आहे. >> असं झालंय खरं.
पण दुसर्‍याबाजूने विचार केला तर पोलिस बाईला (बुवा न दाखवता बाई दाखवुन एक स्टिरिओटाईम मोडलाय, याची स्तुती ही केली असती) भिन्न लिंगी सोबती दाखवला असता तर ते कथेशी निगडीत नसतानाही आपण काही कमेंट न करता पुढे गेलो असतो. तर मग समलिंगी सोबती दाखवणे का खटकावे? ते सहज एक डीटेल म्हणून आलेलं आहे.
मेल नर्स, फीमेल जज/ पुलिस/ ब्रेड विनर हे आता अंगवळणी पडलं आहे. समलैंगिक संबंध अजुन मुद्दाम 'दिसतात', इतके वेळा बघुनही डोळ्याला सवय झालेली नाही म्हणजे कदाचित अजुन तितकं अंगवळणी पडलेलं नसेल का? मे बी. आय डोंट नो. Happy

ते सहज एक डीटेल म्हणून आलेलं आहे. >>> नाही. त्याचा वापर तिला टोमणे मारण्यासाठी केला आहे. सहज भिन्नलिंगी पार्टनरसारखा वावर दाखवला असता तर काही मुद्दाच नव्हता. एकाच कथेत असंख्य इश्यूज घुसवणं हे अगदीच उगाच वाटतं. त्यापेक्षा याच मुद्द्यावर काढा ना सिरीज. एकाच स्टोरीत चंदेरी दुनियेमागचं खरं जग आणि त्याचे पैलू, गे मुलाचे प्रॉब्लेम्स, कॉलगर्लच्या समस्या, तृतीयपंथी, नेपोटिझम, पालकांच्या फेमचा मुलांवर होणारा परिणाम, स्त्री आहे म्हणून पोलिसबाईला मिळणारी दुय्यमता आणि शिवाय लेस्बियन बाईला कामाच्या ठिकाणी होणारे प्रॉब्लेम्स दाखवणं हे ओव्हर वाटलं. या माझ्या वाक्यातच ३ LGBTQ references आहेत या सिरीजमधले. खरंच गरज आहे का इतकं सगळं कोंबायची?

बुवा न दाखवता बाई दाखवुन >>> ते ही फारसं अनकॉमन नाही राहिलंय तसं.

बुवा न दाखवता बाई दाखवुन >> १९८६ मध्ये सुद्धा हिंदी पिक्चर मध्ये रेखा पोलीस इन्स्पेक्टर असायची की

फेम गेम मध्ये माधुरी आणि तिचा फेम आणि त्याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम्स हे बघताना तो उगीच सबप्लॉट असल्यासारखा वाटतो. तिचा मुलगा गे आहे ते ठीक आहे कारण ते शेवटी तिच्याशी रिलेटेड आहे. पण इतर गोष्टी दाखवून तुम्ही मूळ कथेत पाणी घालत आहात असे नाही वाटत का?

शिवाय तिच्या मुलीचं काहीही आगापिछा नसलेल्या मुलाला अचानक जवळ करणंही पटलं नाही. ते ही इतक्या अल्पावधीत.>> अगदी अगदी. पोलिस चौकशी करत असताना ही तो एकदा त्यांच्या घरात दाखवलाय Lol काहीही..

मेकपमॅन च्या मर्डर बद्दल काहीही चौकशी फॉलो अप नाही.. विचित्र वाटलं.
मुळे बाईंचा अभिनय काहिंना शाळकरी वाटला, पण मला ती स्क्रीन वर आली की लग्गेच चीड येत होती आणि शेवटपर्यंत येत राहीली, याचा अर्थ तिने तिची भुमिका उत्तम निभावली. Happy

माधुरी चा अभिनय मुलां सोबत इन्टरॅक्ट करताना अगदी नैसर्गिक वाटला, रोल ताकदीने पेललाय आणि पुर्ण सीरीज वाहून नेलिये खांद्या वर स्वतः च्या. हॅट्स ऑफ्फ!
साधना ने वर म्हटल्या प्रमाणेच जरा मेकप चा थर कमी असता तर बहार आली असती, विशेष करून ती घरात असताना च्या सिन्स मधे.
आजकाल विद्या बालन, राणी मु. , आलिया भट गेला बाजार जॅकलीन यांना पाहता मेकप चा पुसटसा थर असावा की नसावा अशी शंका येते. नॅचरल असा लूक असतो. तसाच हवा असं मला वाटतं. म्हणजे एक्सप्रेशन्स दिसतात Wink

माधुरी चा कपडे पट, तिच्या मुलाची तगमग अ‍ॅक्टींग , मानव कौल च्या डोळ्यातली व्याकुळता उत्तम लाजवाब!

स्पॉयलर अलर्ट :

तिची लेक तिला तशी बाहेर काढायला तयार असते. पण माधव चं नाव घेतल्यावर ती बिथरते आणि आईला कायम आतच ठेवण्याचा निर्णय घेते.

हा सीन माधुरीच्या "ambition च्या मध्ये कोणालाही येऊ देऊ नकोस" च्या रेफरन्स ने पुन्हा दाखवला आहे. मला कळलं नाही ते. तिची ambition हिरॉईन होणे ही असेल तर आधी ती माधुरीला काढायला तयारच नसली पाहिजे. आपल्या स्टारडम ला आपली आईच टफ कॉम्पितिशन आहे असं वाटत असेल तर.

माधव चं नाव घेतल्यावर निर्णय बदलला म्हणजे माधव ला मिळवणं किंवा त्याच्यासोबत प्रेमात राहणं ही तिची ambition होती का? किती फुटकळ? उलट मुलगी अश्या स्टेजला दाखवली पाहिजे होती की खुद्द माधव जरी तिच्या हिरॉईन बनण्याच्या आड येत असेल तर त्यालाही संपवला. येड्या मुलीला (म्हणजे त्या कॅरॅक्टरला) स्वतःचीच प्रायोरीती अजून नीट ठरवता आली नाही ती काय ट्रान्सफॉर्मेशन दाखवणार?

हिरॉईन व्हायचंय म्हणून आईचा सल्ला आईच्याच प्लॅन ने डोकं न वापरता माशी टू माशी फॉलो केला. आणि मग जेव्हा खरेच निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा कच्च्या वयामुळे शारीरिक आकर्षणाने ambition वगैरे वर मात दिली आणि बया आपल्याला नक्की काय अचिव्ह करायचे होते आणि कोणाच्या मदतीने हेही विसरली.

एकाच कथेत असंख्य इश्यूज घुसवणं हे अगदीच उगाच वाटतं. त्यापेक्षा याच मुद्द्यावर काढा ना सिरीज. एकाच स्टोरीत चंदेरी दुनियेमागचं खरं जग आणि त्याचे पैलू, गे मुलाचे प्रॉब्लेम्स, कॉलगर्लच्या समस्या, तृतीयपंथी, नेपोटिझम, पालकांच्या फेमचा मुलांवर होणारा परिणाम, स्त्री आहे म्हणून पोलिसबाईला मिळणारी दुय्यमता आणि शिवाय लेस्बियन बाईला कामाच्या ठिकाणी होणारे प्रॉब्लेम्स दाखवणं हे ओव्हर वाटलं. >> +१

पियु, मला वाटतं ते असं होतं की आई जेव्हा माधवन चं नाव घेऊन लिलया त्याला अडकवुया म्हणते तेंव्हा तिला जाणवतं की आई किती पोहोचलेली आहे, भोळी नाहिच्चे मुळी!! मग आई जी स्वतः लेकीला टफ कॉम्प. आहे तिलाच वाटेतून दुर करावे..असा विचार असावा.

पण तरी आई ला आत च अडकवण्याचा निर्णय खूप च बालिश आहे..जसं काय ती आतंच अडकून राहणारेय.

Pages