फायब्रोमायल्जीया विषयी महिती हवी आहे.

Submitted by टीया on 20 February, 2022 - 06:03

नमस्कार. मी मायबोली नियमित वाचते. लेखनासाठी आज सदस्यत्व घेतले.
मला गेली 8,9 वर्षे अंगदुखी, कम्बरदुखी ,पाठदुखी, अंगात कळा येणे असा त्रास आहे. हातापायाची मनगटे दुखून जळजळणे ,अधूनमधून डोके दुखणे असंही होतं. वेगवेगळ्या पॅथीच्या डॉ कडे तपासण्या केल्या. MRI , संधिवात टेस्ट, युरिक ऍसिड टेस्ट, व्हिटॅमिन्स टेस्ट आशा सगळ्या चाचण्या केल्यात. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आलेत. पण तरीही दुखणे कमी होत नाही. आज एक दुखते तर उद्या दुसरे दुखते. सगळे डॉ म्हणतात आहार संतुलित ठेवा, व्यायाम करा, व्हीटामिन्स सप्लिमेंट्स घ्या. बाकी काही नाही. पण तरीही त्रास कमी होत नाही. या महिन्यात यु ट्यूबवर शोधाशोध केली असता ह्या आजाराला फायब्रोमायलजिया म्हणतात अस कळलं. कुणाला या संदर्भात काही माहिती आहे का? होमिओपॅथी वाले डॉ म्हणतात हो हाच आजार आहे. तर काय करावे म्हणजे हा त्रास बंद होईल. कुणाला काही अनुभव असल्यास सांगावे. .
धन्यवाद.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

यासाठी कोणत्या डॉ कडे दाखवायचं नक्की? एम डी .. अलोपॅथी, होमिओपॅथी या डॉ ना दाखवून झाले आहे. त्यानी व्हिटामन्स गोळ्या फक्त दिल्यात कारण रिपोर्ट्स नॉर्मल आहेत संधीवत टेस्ट, युरिक ऍसिड टेस्ट नॉर्मल आहे . मग आता न्यूरॉसर्जन किंवा आणि कोणत्या डॉ कडे जाऊन निदान करावे?

8,9 वर्षे अंगदुखी, कम्बरदुखी ,पाठदुखी, अंगात कळा येणे असा त्रास आहे. हातापायाची मनगटे दुखून जळजळणे ,अधूनमधून डोके दुखणे असंही होतं. >> ताई
१) सर्व प्रथम डी व्हिटामिन डेफिशिअन्सी आहे का ते चेक करा. पीसी ओ एस आहे का ते गायनॅक कडे बघा.
२) यु ट्तुब वर बघुन स्वत: निदान करणे व वेळ घालवणे घातक आहे.
३) मॅमो ग्राफी व युटेराइन व ओव्हरीची सोनोग्राफी करून घ्या. ते बरोबर आले म्हणजे कोणत्याही लेव्हलच्या कर्करोगाची शक्यता दूर होईल.
एवढे करून ते निदान सांगा म्हण जे पुढील माहिती देता येइल
४) बोन डेन्सि टो मेट्री टेस्ट करून घ्या.
५) कॅल्शिअम चेक करा.

उत्तम आरोग्या साठी शुभेच्छा. फक्त आयुर्वेदावर विसंबू न वेळ दवडू नका. नुसते एम्डी असून चालत नाही. स्पेशालिटी काय होती ज्याला दाखवले?

कुठल्या स्पेशलिस्टकडे जायचे हे आपण ठरवायचे की डोक्टर सान्गणार? एवढ्या टेस्ट करुनही डॉक्टर सान्गु शकत नाही कोणाकडे जायचे ते?

साधना ताई +१००
७,८ वर्षात MD allopathy (Physician )ना रोगाचे निदान होऊ नये ?फक्त allopathy वर विसंबून वेळ दवडू नका... specialist ना दाखवा..Take care .
तुमच्या रोगाचे लवकर निदान होऊन तुम्हाला बरे वाटू दे.

होणाऱ्या त्रासाचे, आजाराचे निदान न झाल्याने होणाऱ्या मनस्तापाची कल्पना आहे. त्यामुळे, तुम्हांला लवकर निदान होऊन योग्य ते उपचार होवोत आणि आराम पडो ही शुभेच्छा.
शारीरिक त्रासाबरोबरच काही मानसिक ताण वगैरे आहे का?
होमिओपॅथिक डॉक्टरांनी जर तुमची शंका योग्य आहे असे सांगितले आहे तर त्यानुसार औषध दिले नाही का?

थायरॉईड आहे का ते पण पहिला असेलच. मला हि सगळी लक्षणे होती पण एक सांगू का या सर्वांच एकाच कारण असत ते म्हणजे मानसिक तणाव, आपल्याला माहीतही नसत इतक्या सूक्ष्म पातळीला जाऊन हा तणाव आपलं नुकसान करत असतो. तेव्हा स्वतःच्या मनाला तपासा.