एका आदिवासीची जागा दुसऱ्या आदिवासीला घेणेबाबत माहिती हवी आहे...

Submitted by सुर्या--- on 15 February, 2022 - 05:42

एका आदिवासीची जागा दुसऱ्या आदिवासीला घेणेबाबत माहिती हवी आहे...

साधारण जमीन घेणेबाबत नॉर्मल प्रोसेस वकीला मार्फत करता येते, परंतु आदिवासींची जागा आदिवासीला घायची असल्यास काय प्रोसेस आहे? कोणकोणते कागदपत्र असायला हवेत? किती दिवसात ७/१२ वर नवीन नावं registered होतो. साधारण खर्च किती येतो? तुकड्याने हवी असल्यास कोणत्या वर्गातील किती जागा घेता येते? विकणाऱ्याने पैसे घेतल्यानंतर काही फसवणूक करू नये यासाठी कोणकोणती काळजी घ्यायला हवी?

कृपया मार्गदर्शन करावे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आदिवासी क्षेत्रात असणाऱ्या जागे विषयी तुम्हाला विचारायचे आहे का?,
आदिवासी क्षेत्र जाहीर नसलेल्या भागातील जागा आदिवासी व्यक्ती जागेचा मालक असला तरी विकत घेण्यात काहीच अडचण नाही.
मुंबई,पुण्यात आदिवासी व्यक्ती चा फ्लॅट आहे विकत घेण्यास काहीच वेगळे नियम नाहीत.

आदिवासी क्षेत्र म्हणून जाहीर झालेल्या भागातील जमिनी चे खरेदी विक्री व्यवहार हे जिल्हा अधिकारी ह्यांच्या संमती नीच होत असावेत.

आदिवासी क्षेत्र म्हणून जाहीर झालेल्या भागातील जमिनी चे खरेदी विक्री व्यवहार हे जिल्हा अधिकारी ह्यांच्या संमती नीच होत असावेत.----
हो.
आदिवासी क्षेत्र म्हणजे काय हे माहित नाही परंतु, कुळकायद्यांन्वये जमिनीचा मालक हा आदिवासी समाजाचा असेल तर त्यावर कलम ३६ अ लागू होतो. अश्या जागा इतर आदिवासी समाजातील व्यक्तीला विकत घेते येते. परंतु त्यासाठी असलेली procedure समजून घ्यायची होती. ऐकिवात असल्याप्रमाणे अश्या प्रोसेस मध्ये टेबल खालुन खूप मोजावे लागतात, याशिवाय जमिनीच्या व्यवहारात frauds खूप होतात. त्यामुळे कोणकोणती काळजी घ्यावी? कोणकोणते documents लागतात आणि अंदाजे किती खर्च येऊ शकतो अशी एकंदर माहिती अपेक्षित आहे.

आदिवासी असू किंवा बिगर आदिवासी जिल्हा अधिकारी ह्यांची परवानगी लागतेच
आदिवासी व्यक्ती ची जमीन आदिवासी व्यक्ती ल सुद्धा विकत घ्यायचे असेल तर जिल्हा अधिकारी ह्यांची परवानगी लागते.
खूप विचार करून व्यवहारात पुढे जा.
शहरी नोकरी करणाऱ्या सर्व सामान्य लोकांना छक्के पंजे माहीत नसतात.
आणि हा वर्ग सरळ मार्गी असल्या मुळे टेबल खाली होत असलेली गणित पण त्याला समजत नाहीत.