सखे तुझ्या आठवणीत आयुष्य जगेन सारं...

Submitted by सुर्या--- on 15 February, 2022 - 05:35

सखे तुझ्या आठवणीत आयुष्य जगेन सारं...

आठवणीत राहील अशी एक खुण मला देशील का?

सखे तुझ्या आठवणीत आयुष्य जगेन सारं...

आठवुनही हसेन अशी नजर हसुन देशील का?

मी पाहत राहीन तुला, एकदाच मला बघशील का?

आनंद मावणार नाही मला, हसेल जग सारं...

साद माझ्या प्रेमाला, गुपचूप तु ही देशील का?

माझ्या मनात धडधड होते, तुझ्याही मनात होत असेल ना?

कितीही लपवलं तरीही आठवण क्षणभर होत असेल ना?

नाहीच कसली अपेक्षा, हातभर अंतर ठेऊन जग,
मनात जपलेल्या होकाराच स्वप्न तु ही बघशील का?

Group content visibility: 
Use group defaults