झेन कविता

Submitted by सामो on 13 February, 2022 - 09:14

- अन्यत्र पूर्वप्रकाशित

खरं तर "The Graduate" सिनेमा, पहाटे उठून पहायलाच नको होता. आता दिवसभर डोक्यात रहाणार शिवाय तरुण "Dustin Hoffman" आठवत रहाणार. सिनेमा चांगला होता प्रश्नच नाही. एका सुंदर मध्यमवयीन स्त्रीने, तिचा मुलगा शोभेल अशा तरुण मुलाला seduce करणे - त्याचं भांबावलेपण, क्षीण विरोध आणि त्या पार्श्वभूमीवरचा तिचा आत्मविश्वास, क्वचित जरब आणि हुकूमत - तिनेच त्याला भरीस पाडणं - त्याचं ते पहीलं निळ्या निळ्या पाण्यात पोहण्याचं साहस - निव्वळ intense आणि काव्यमय.
.
झिगझॅग निळं चमकतं खोल पाणी - त्याचं त्या पाण्यात खरं तर मर्जीविरुद्ध ओढलं जाणं .... हे सर्व चालू असताना, घराला जाग आली, मागे वर्दळ सुरु झाली आणि त्या सिनेमाच्या धुंदीत, खरं तर एकांत शोधायला आपण तिरमिरीत बाहेर पडलो. बार्न्स & नोबल्स - एकांत सापडण्याचं हमखास ठिकाण.
.
Erotic poems चं पुस्तक शोधतोय आपण - नाही ना मिळत आहे शेल्फवर - खरं तर गर्दीतल्या एकांतात फक्त त्या कविता वाचण्याकरता आपण आलोय - हां तसं E.E. Cummings चे Erotic poems चे पुस्तक आहे पण आपल्याला हवं ते नाहीये. दूधाची तहान ताकावर भागवायची नाही. नाही निदान कवितांपुरती तरी नाहीच. पण कोणी उचललं ते अनवट पुस्तक? आपल्यासारख्याच एखाद्या रसिकाने घेतले असणर. स्त्री असेल की पुरुष? - तारुण्य हरवत चाललेलच एखादं कोणीतरी असेल. Hanging onto dear youth by reading poems? Living out every poem? चला आपण नाही तर कोणालातरी पुस्तक सापडलय.
.
बाकी हे zen poems चे पुस्तकंही सुंदर वाटतय. दुकानात छान wistful, longing वालं संगीत लागलय. कुठे मिळतात या सीडी आणि मुख्य म्हणजे त्या ऐकण्याकरता आवश्यक असा एकांत. ही कविता छान आहे -
.
I sit beneath the cliff quiet & alone.
Round moon in the middle of the sky's a bird
ablaze:
All things are seen mere shadows in it's brilliance,
that single wheel of perfect light ...
.
ह्म्म पण आधी भांबावलेला आणि गोंधळलेला असतो तो ... पण जसजसे वरचेवर भेटू लागतात, एकमेकांचा आनंद घेऊ लागतात - तसतसा सरावतो तो - पाण्यात तरंगायला शिकतो - He loves floating. - सुंदर! - हे असे सिनेमे एकांतातच पहायला हवेत. कोणी मागून डोकावत बसायला नको - कोणाचाही aura नको - फक्त आपण आणि सिनेमा - आजकाल इतके व्याकुळ का होतो आपण? - काय निसटतय? - आणि समजा झालो १९-२० वर्षाचे तर? तर काय? काय बदलू आपण? बदलायची हिंमत तेव्हा नव्हती तर आता कुठून येणार? आणि आता मारे येणार असेल तर .... नकोच ते विचार.
Who is that the stream sobs for?
वा! छान वाक्य आहे. चमकदार आणि उत्कट.
.
वेडं वेडं करतं हे गाणं आपल्याला - खेचून घेतं - व्याकुळ करतं
.
तिला काय मिळालं एका कोवळ्या तरुणाला भोगून? त्याचा पहीला शरीरसंबंध बनून? - त्याला आत्मविश्वास मिळाला, अमूल्य आत्मविश्वास गवसला त्याला! तिला? स्वप्नं? तारुण्य की फक्त त्याची पहीली प्रेयसी झाल्याचं समाधान? जाऊ देत ना - हे झेन पुस्तक वाच - ५० व्या पानावरची ही कविता भेदक आहे -
.
When the stupidest folks read my poems,
they snort in incomprehension ...
When the middleing sort read my poems,
They think them over & pronounce them in deep...
When a sage reads a poem of mine
his face breaks into a great big smile.
When the great Yang Hsiu saw the
young woman in an instant,
he understood the mystery
.
नंतर तो त्या स्त्रीच्या (Mrs Robinson) च्या मुलीच्या प्रेमात पडतो - काय वाटत असेल तीघांनाही? मुख्य म्हणजे त्याला .... छानच काम केलय डस्टीन हॉफमनने.
.
कविता म्हणे कपडे काढून भोगायची असते. आज हे पुस्तक चवीचवीने वाचले पाहीजे. आधाशासारखं नाही , एकाग्रतेने, प्रत्येक कवितेला तिची due respect देऊन, गर्दीतल्या एकांतात.

Group content visibility: 
Use group defaults

आयला! कसलं भारी लिहिलंय हे! ती झेन कविता पण आवडली..
The Graduate चा ट्रेलर पाहिला आत्ताच. Happy
ज्युलियन बार्न्सची द सेन्स ऑफ ॲन एंडींग म्हणून एक कादंबरी आहे.. ती आठवली यासंदर्भात.

>>>>The Graduate चा ट्रेलर पाहिला आत्ताच. Happy
वाह!!!
धन्यवाद पाचपाटील.

आज इथल्या बार्न्स & नोबल्स मध्ये गेले पाहीजे. आहे आमच्याजवळ एक. आज नक्की जाइन.
.

https://www.youtube.com/watch?v=th1Uy3dwyU4

ओ पलाश ओ शिमूल ......

And Palash, and Shimul, why is my mind troubled?
I don't know, I don't know why you broke my sleep
I have counted the days looking for the way

I heard his footsteps today
I have counted the days looking for the way
I heard his footsteps today
And the wind, why are you playing the flute today?

Did you decorate this heart?
And Palash, and Shimul, why is my mind troubled?
I don't know why this disturbed my sleep

No matter the day
Don't keep both eyes busy in beautiful dreams
As if that auspicious day came today
No matter the day
Don't keep both eyes busy in beautiful dreams
As if that auspicious day came today

As much as I want in this life
I think I got more than that
As much as I want in this life
I think I got more than that
And the sky, why is it spreading so much light today?

What you gave me?
And Palash, and Shimul, why is my mind troubled?
I don't know why this disturbed my sleep
---------------------
गुलजारची गाणी ढगाळ हवेत, विलक्षण व्याकुळ करतात. Sad

जीने के लिये सोचा ही नही दर्द संभालने होंगे
मुस्कुराये तो मुस्कुरानेके कर्ज उतारने होंगे