- अन्यत्र पूर्वप्रकाशित
परवाचीच गोष्ट सांगते. एक इन्टर्व्ह्यु देण्याकरता पायपीट करत , जागा शोधत, घामाघूम अशी ठरलेल्या स्थळी पोचले. कितीही इन्टर्व्ह्यु आजतागायत दिले असले तरी प्रत्येक इन्टर्व्ह्युला अस्मादिकांना घाम हा फुटतोच. तरी बरं बेंचवर वगैरे नव्हते नाहीतर घाम फुटण्याबरोबर पोटही बिघडतं ; ) तर ते एक असोच.
.
मोठ्या, ऑफिसात आत गेले तर प्लश खुर्च्या अन ए सी ने स्वागत केले. काऊंटरवरती एक सुहास्यवदना होती. जिने माहीती घेऊन , आतमध्ये माझ्या येण्याची वर्दी दिली. आता वाट पहाण्याचा अवघड काळ समोर होता. परत एकदा स्वतःच्याच रेझ्युमे ची उजळणी करुन, जो की आता आठवेनासा झाला होता, मी कूल डाऊन होण्याचा प्रयत्न केला. पण जितका प्रयत्न अधिक, तितकी चलबिचल अधिकच वाढली.
.
शेवटी १५ मिनिटांनी एकदाचं आतून बोलावणं आलं. ही १५ मिनीटे मला युगांसारखी भासली होती तो भाग अलहिदा. दारावर टकटक करुन आत गेले तो ३ जणांचा पॅनल आसनस्थ होऊन माझ्याकडे पहाताना दिसला. जणू माझी प्रत्येक हालचाल अन अवघडलेपण टिपून त्यावरुन ते काही निष्कर्षच काढणार होते. पैकी एक जण बद्ध्कोष्ठ्पिडीत दिसत होता तर दुसरी बाई खुनशी दिसत होती व तीसरा नॉर्मल अन होयबा वाटत होता.
.
या मिस देखणे म्हणून त्यांनी मला आत बोलावून स्थानापन्न होण्याचा इशारा केला. औपचारीक ओळख झालयावरती बद्धकोष्ठ्पिडीताकडून नेहमीचा प्रश्न आला - हां तर थोडं तुमच्याबद्दल सांगा.
इतका रेझ्युमे समोर आहे तो काय पूजा करायला दिला का रे? वाचायला वेळ नाही मिळाला साल्या.
पण उघडपणे पोपटासारखा एक्स्पिरीअन्स व स्पेशली त्यांना हव्या असलेल्या डोमेनचा एक्स्पिरीअन्स घडाघड बोलून दाखवला.
.
आता खुनशी मॅडमना जोर चढल्याचे दिसले - Where do you see yourself after 5 yrs?
काय ऑबसेशन असतं ५ आकड्याचं या लोकांना काय माहीत? फुगलेला बँक बॅलन्स आणि फुगलेले रिटायरमेन्ट पॅकेज मला दिसतय असे बाणेदार उत्तर द्यायचा मोह झाला
पण वेळीच सावरुन म्हटलं - मी टेक्निकल लीड होऊ इच्छिते. यावर अपेक्षित प्रश्न आलाच की मॅनेजमेन्ट का नाही.
मी मॅनेजमेन्ट म्हटलं असतं तर टेक्निकल लीड का नाही हे विचारलच असतंं ना चिवड्यांनो? अरे या लहानपणीच्या शिव्या का आठवताहेत अचानक? असो,)
काहीतरी थातूर्मातूर कारण देऊन तो प्रश्नही टाळला.
.
पुढे सॉफ्टस्किलचे काही प्रश्न आले जसे- कंपनीचा फायदा होणार आहे पण थोडा अवैध किंव आनैतिक मार्ग स्वीकारावा लागतोय तर तुम्ही काय कराल?
कंपनीच्या फायद्याशी मला काय देणं घेणं ... च्यायला माझी कातडी बचावली की ऐष. मला पगार-बोनस-उन्नती मिळाल्याशी कारण.
पण उघडपणे - कंपनीच्या तत्कालीन तात्पुरत्या फायद्यासाठी मी कंपनीचे रेप्युटिशन लाँग टर्म धोक्यात घालणार नाही. यावर होयबा खूष झालेला दिसला तर खुनशी वार फुकट गेल्याने निराश झालेली वाटली.
.
होयबा गरीब वाटला. त्याने विचारले - "मिस जर तुमचा प्रकल्प वेळेआधी पूर्ण झाला तर रिकाम्या वेळेचा सदुपयोग तुम्ही कसा कराल?"
मला १००% खात्री आहे रे तू मग्गू असणार आणि मरुन मरुन प्रकल्प लवकरत लवकर पूर्ण करत असणार. पण मी तुझ्याइतकी सरळ नाय रे बाबा. उगा अपेक्षा फुगवु कशाला अन परत जर कामात चूका निघाल्या तर वरचा म्हणणार घिसाडघाई केलीत. पण थांब तुझ्या प्रकृतीला साजेसं उत्तर देते.
सर तसं झालं ना तर उत्तमच की. उरलेला वेळ सेल्फ-ग्रोथ्/अन्य प्रकल्पांना मदत आदि विधायक कार्यात रिसोर्सेस लावता येतील. : )
.
बरं एका प्रकल्पाला रिसोर्सेस ची गरज आहे कारण त्यांची डेड लाइन आलेली आहे व तुम्हालाही तुमचे रिसोर्सेस वापरुन स्वतःचा प्रकल्प पूर्ण करायचा आहे तेव्हा जर दुसर्या टीमलीडने तुमचे रिसोर्सेस उधार मागीतले तर काय कराल? ती रिक्वेस्ट कशी हँडल कराल? हा प्रश्न समजायला थोडा वेळ लागला. समजल्यावर मनात म्हटलं
फाट्यावर मारु ती रिक्वेस्ट
पण उघड तर असले भाव व्यक्त करता येत नाहीत म्हणून म्हटलं - माझ्याकडचे नवशिके रिसोर्स उधार देइन ज्यायोगे त्यांना अनुभव तर मिळेलच पण दुसर्या प्रकल्पाचे काम मार्गी लागेल अन रेनचेकच्या रुपाने, माझा वरचष्मा राहील.
.
पुढे बराच वेळ टेक्निकल डिस्कशन होऊन, नंतर वाटाघाटी होऊन इन्टर्व्ह्यु संपला.
.
आता फक्त वाट पहात आहे काय उत्तर येते याची. पण दर वेळेस इन्टर्व्ह्यु च्या स्ट्रेस मधून गेले की वाटते नको तो ताप परत परत. अन परत काही दिवसांनी परत इन्टर्व्ह्यु द्यायची उबळ येतेच. इन्टर्व्ह्यु-अॅडिक्ट झाले आहे दुसरं काय.
इति इन्टर्व्ह्यु पुराण
छान लिहिलं आहेस.नजरेसमोर
छान लिहिलं आहेस.नजरेसमोर घडतेय असं वाटत होते.
मग्गू असणार ....... हे डोक्यावरून गेले.पण त्यामुळे फारसे अडले नाही. तू sangashilach.
मग्गू हा आमच्या कॉलेजमधील
मग्गू हा आमच्या कॉलेजमधील शब्द आहे. म्हणजे function at() { [native code] }इअभ्यासू, पुस्तककीडा.
Dp पेंटिंग मस्त आहे.
Dp पेंटिंग मस्त आहे.
थँक्स गं.
मस्त मस्त.. सगळ्या भावना
मस्त मस्त.. सगळ्या भावना पोहोचल्या
पण मला इंटरव्ह्यूज द्यायला फार आवडतात.. माझा प्रॅाब्लेम हा आहे की कोणी मला इंटरव्ह्यू साठी बोलवतच नाही
तरी बरं बेंचवर वगैरे नव्हते
तरी बरं बेंचवर वगैरे नव्हते
?????
याचा अर्थ नाही समजला
गेले ते दिवस.. आता मार्केट
गेले ते दिवस.. आता मार्केट वेगळा आहे... ईंट्वरव्यु घेणाराच भीतीत असतो कि आपण नीट बिहेव नाही केले तर हा कॅन्डीडेट दुसरीकडे जाईल...
मस्त.
हाहा. मस्त.
हाहा. मस्त.
>>>>>>>>>गेले ते दिवस.. आता
>>>>>>>>>गेले ते दिवस.. आता मार्केट वेगळा आहे... ईंट्वरव्यु घेणाराच भीतीत असतो कि आपण नीट बिहेव नाही केले तर हा कॅन्डीडेट दुसरीकडे जाईल...
अरे मस्त!!!!
>>>>>>>>तरी बरं बेंचवर वगैरे नव्हते
नावापुरता कंपनीत पण कोणत्याच प्रॉजेक्टवरती नाही त्याला बेंचवरती असणे म्हणायचे. केव्हाही काढू शकतील ना.
>>>>>>>>पण मला इंटरव्ह्यूज द्यायला फार आवडतात.. माझा प्रॅाब्लेम हा आहे की कोणी मला इंटरव्ह्यू साठी बोलवतच नाही Lol
म्हाळसा. आता आहे की तुझा जॉब. ऐश कर.
लेख म्हणून छान आहे आवडला
लेख म्हणून छान आहे आवडला
पण मी विनोदी लेखन म्हणून वाचायला घेतला आणि तितका विनोदी नाही वाटला
स्पष्ट सांगितल्याबद्दल माफी असावी
नो प्रॉब्लेम. सो सो च विनोदी
नो प्रॉब्लेम. सो सो च विनोदी आहे.
छान
मस्त जमलय! उत्तरेही भारी
मस्त जमलय! उत्तरेही भारी दिलीत!
'आतला आवाज ' सर्वात भारी. आवडलय!
छान मजेशीर... खूप हसू आले.
छान मजेशीर... खूप हसू आले.
काही प्रश्न इंटरव्ह्यू दरम्यान का विचारतात हेच समजत नाही.
उदा : कंपनीचा फायदा होणार आहे पण थोडा अवैध किंव आनैतिक मार्ग स्वीकारावा लागतोय तर तुम्ही काय कराल?
आता ह्याचे सरळ हो असे कोणी उत्तर देईल का? सगळेच जण अवैध मार्ग स्विकारणार नाही असेच उत्तर देईल ना?
मला एका इंटरव्ह्यू दरम्यान असा प्रश्न विचारला होता की जर क्लायंटला डिलीव्हरी ३ महिन्यात हवी आहे आणि तुम्हाला सगळे ऑप्शन वापरले तरी ६ महिने लागणार आहेत. तुम्ही काय कराल? मी म्हणालो होतो की जर सगळे ऑप्शन वापरून सहा महिने कमीत कमी लागणार असतील तर ३ महिन्यात हे काम करून देतो असे सांगून प्रोजेक्ट घेतलाच का? मी वरती तक्रार करीन व प्रोजेक्टवर काम वरून ऑर्डर आल्याशिवाय सुरू करणार नाही. हे माझे काम नाही. ज्याने प्रोजेक्टची ऑर्डर घेतली त्यानेच हे क्लाएंटला सांगावे. फार तर मी progressive delivery करू शकतो म्हणजे शक्य असेल तर बेसिक व महत्वाचे फिचर्स आधी देणे व नंतर नंतर नवनवीन गोष्टी add करत रहाणे. (agile way). ह्या माझ्या उत्तरावर डिलीवरी साईडची लोके खूष दिसली पण एच आर वाले नाराज दिसले.
कंपनीचा फायदा होणार आहे पण
कंपनीचा फायदा होणार आहे पण थोडा अवैध किंव आनैतिक मार्ग स्वीकारावा लागतोय तर तुम्ही काय कराल?>>>
हा प्रश्न कुणी खरचं विचारत? Compliance इशु नाही का हा?
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
चांगले लिहिलेय.
चांगले लिहिलेय.
इतक्यात बरेच इंटरव्यू
इतक्यात बरेच इंटरव्यू दिल्याने अनुभव ताजा आहे. बऱ्याच वाक्यांना अगदी अगदी झालं..
अजून एक प्रश्न
टाईमली डिलिव्हरेबल्स बट विथ कॉम्प्रमैज्ड क्वालिटी कि
डिलेड डिलिव्हरेबल्स विथ गुड क्वालिटी?
जसं काही आमचा चॉईस विल मॅटर. जसं हवंय तसं देतो.
जसं काही आमचा चॉईस विल मॅटर.
जसं काही आमचा चॉईस विल मॅटर. जसं हवंय तसं देतो.>> Lol..
खरंय!
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
Where do you see yourself after 5 yrs? >>
ह्या प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे दरवर्षी appraisal च्या वेळी लिहून द्यावं लगायचं. मी पहिल्या वर्षी मोठ्ठा निबंध लिहिला. पण कुणी वाचत नाही हा अंदाज आल्यावर पुढे दरवर्षी तोच print out काढून द्यायचे. कारण तसंही मला कुणीच फार मोठं बनायचं नव्हतं.
छान लिहिलेय... सगळे ईंटरव्यू
छान लिहिलेय... सगळे ईंटरव्यू एका क्षणात आठवले
<<< कंपनीचा फायदा होणार आहे पण थोडा अवैध किंव आनैतिक मार्ग स्वीकारावा लागतोय तर तुम्ही काय कराल? >>>
साधारण अश्याच धाटणीचा प्रश्न मलाही विचारण्यात आलेला. तेव्हा मी फक्त दोन वर्ष एक्सपरीअन्सवाला होतो. म्हणजे ज्युनिअरच. त्यामुळे मी उत्तर दिले की जी मॅनेजमेंट आणि कंपनीची पॉलिसी आहे ती फॉलो करेन. थोडक्यात माझी तत्वे माझ्याकडे. तुमच्याकडे काम करतोय तर तुमची तत्वे, तुमची पॉलिसी पाळेन.
तसेच एका ईंटरव्यूला एक प्रश्न वर्क कल्चरवालाही विचारलेला. तुम्हाला कसे वर्क कल्चर आवडते. सिरीअस काम करणारे की हसत खेळत टाईमपास करणारे??
तेव्हा मी चार वर्ष एक्सपरीअन्स वाला होतो. दोन कंपन्यात दोन-दोन वर्षे काम केलेले. म्हणून मी उत्तर ठोकून दिले की आधीच्या दोन्ही कंपन्यात तुम्ही सांगितले तसे दोन टोकाचे वर्क कल्चर होते. आणि मी दोन्हीमध्ये कंफर्टेबल आहे.
थोडक्यात असे प्रश्न विचारले की मी सरळ हाच मध्यममार्ग स्विकारतो की माझ्या वैयक्तिक आवडीनिवडी काही मॅटर करत नाहीत. तुम्ही मला पगार देत आहात तर ऑफिसटाईमिंगला तुम्हाला हवे तसे मी राहणार आणि वागणार.
पण प्रत्यक्षात मी उलटा आहे. मी जसा आहे तसेच राहणार. मी तुमचा पगार घेतो त्याबदल्यात तुमचे काम करून देतो. माझ्या बाकीच्या गोष्टी आणि वर्तणूक तुम्हाला चालत नसेल तर मला कामावरून काढून टाका. पण मी बदलणार नाही

याचमुळे मला घरचेही नेहमी विचारतात, तुलाच नेहमी अश्या कंपन्या कश्या मिळतात रे जे तुझे लाड चालवून घेतात
आणि हो, ते थ्री ईडियटवाल्या शर्मन जोशी सारखे ईंटरव्यू प्रत्यक्षात होतात का कल्पना नाही. निदान आमच्या फिल्डमध्ये तरी नाही
ह्या प्रश्नाचं उत्तर
ह्या प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे दरवर्षी appraisal च्या वेळी लिहून द्यावं लगायचं. मी पहिल्या वर्षी मोठ्ठा निबंध लिहिला. पण कुणी वाचत नाही हा अंदाज आल्यावर पुढे दरवर्षी तोच print out काढून द्यायचे.
>>>>
हा हा, मी तर हे आणि असे प्रश्न कलीगचीच उत्तरे कॉपीपेस्ट करतो. आमच्याकडे या कंपनीत हे सेक्शन मॅनेजर सोबत बसून भरावे लागते. मीच त्यांना सांगतो की अबक आणि कडई या दोघांनी काय लिहिलेय ते उघडा आणि त्यातले बरे वाटेल ते माझ्यात कॉपी पेस्ट करूया. ते सुद्धा तसे करतात कारण झटपट संपून जाते प्रोसेस
<< टाईमली डिलिव्हरेबल्स बट
<< टाईमली डिलिव्हरेबल्स बट विथ कॉम्प्रमैज्ड क्वालिटी कि
डिलेड डिलिव्हरेबल्स विथ गुड क्वालिटी? >>
Good, Fast, Cheap: You Can Only Pick Two!
- काम लवकर आणि चांगल्या क्वालिटीचे हवे असेल तर महाग पडेल.
- काम लवकर आणि स्वस्तात हवे असेल तर चांगल्या क्वालिटीचे मिळणार नाही.
- काम चांगल्या क्वालिटीचे आणि स्वस्तात हवे असेल, तर लगेच मिळणार नाही.
मला १००% खात्री आहे रे तू
मला १००% खात्री आहे रे तू मग्गू असणार आणि..>>>>>
"Muggle" हा शब्द हॅरी पॉटर च्या चलचित्रात "अति सामान्य पब्लिक" या अर्थी आलेला आहे
सर्वांचे आभार.
सर्वांचे आभार.