शेअर मार्केट एक जुगार?... भाग २ Portfolio and Risk Management

Submitted by अतरंगी on 4 February, 2022 - 04:10

“I have two basic rules about winning in trading as well as in life:
If you don’t bet, you can’t win.
If you lose all your chips, you can’t bet”

Larry Hite

मार्केटमधे सर्वात महत्वाचे आणि अवघड काही असेल (विशेषतः  ट्रेडर्सना) तर ते आपले भांडवल सुरक्षित ठेवणे. शेअर मार्केटमधे दिर्घकाळ टिकून राहिल्यास पैसे कमाविणे शक्य आहे. पण ईथे दिर्घकाळ टिकून राहणेच मुळात अवघड आहे. आपण शेअर मार्केटमधे पैसे गमावलेल्या अनेक ट्रेडर्स, ईनव्हेस्टर्सचे किस्से ऐकून असतो. बहूतांशवेळा त्या लॅासच्या मुळाशी improper position sizing, improper capital allocation, lack of discipline, trader’s bias and psychology, improper strategy or lack of in depth analysis या पैकी एक किंवा अनेक कारणे असू शकतात. जर आपले कॅपिटल प्रोटेक्ट करायचे असेल, मार्केट मधे टिकून रहायचे असेल तर वरील चुका कशा टाळता येतील याच्या systematic methods समजून घेणे अतिशय गरजेचे आहे. Capital allocation per strategy, position sizing, risk management हे सर्व विषय फार मोठे आहेत. आपण ते सर्व थोडक्यात पाहू. मार्केटमधे ॲक्टिव ट्रेडिंग किंवा ईनव्हेस्टमेंट करण्याआधी हे विषय खोलात जाऊन समजावून घेणे नितांत गरजेचे आहे. 

मागील भागात आपण एका रिटेल ईन्व्हेस्टर आणि फायनान्शिअल ईन्स्टिट्यूटचा मार्केटबद्दलचा ॲपरोच थोडक्यात पाहिला. या भागात आपण कोणतीही स्ट्रॅटेजी डिप्लॅाय करण्याआधीची प्रोसेस पाहू. 

एखादी स्ट्रॅटेजी डिप्लॅाय करण्याआधी काही महत्वाचे प्रश्न आहेत
१. कोणती स्ट्रॅटेजी डिप्लॅाय करायची?
२. कोणत्या स्ट्रॅटेजीला किती कॅपिटल ॲलोकेट करायचे?
३. त्या स्ट्रॅटेजीमधे पोझिशन साईज काय हवा? एका सिंगल ट्रेडमधे किती कॅपिटल असावे?
४. रिस्क मॅनेजमेंट कशी करावी?

आपण प्रत्येक प्रश्न आणि ते करायच्या शास्रीय पद्धती कोणत्या ते थोडक्यात पाहू या. 

१. कोणती स्ट्रॅटेजी डिप्लॅाय करावी.:-जसे आपण फंडामेंटल ॲनेलेसिस करताना वेगवेगळे रेशिओ पाहतो तसेच कोणत्याही स्ट्रॅटेजीचे ईव्हॅल्यूएशन करताना त्या स्ट्रॅटेजीचे फक्त रिटर्न न पाहता अनेक वेगवेगळे रेशिओ पाहिले जातात. त्या रेशिओच्या आधारे स्ट्रॅटेजीचे मुल्यमापन केले जाते. त्यातील काही महत्वाचे रेशिओ म्हणजे Sharpe Ratio, Sortino ratio, calmar ratio, Jensen's Alpha ratio, sterling ratio, omega ratio, M squared, RAROC etc प्रत्येक रेशिओचा ऊद्देश आणि उपयोग वेगवेगळे आहेत. 

२. कॅपिटल ॲलोकेशन:- प्रत्येक स्ट्रॅटेजीचे रिटर्न आणि रिस्क पॅरॅमीटर मिळाले की पुढची स्टेप म्हणजे कोणत्या स्ट्रॅटेजीला नक्की किती कॅपिटल ॲलोकेट करावे. कॅपिटल ॲलोकेशन साठी मला माहित असलेल्या दोनच पद्धती आहेत. त्यातली पहिली CAPM (Capital allocation pricing model) efficient frontier आणि दुसरी utility function. यातील पहिली पद्धत सोपी आहे पण दुसरी पद्धत जरा क्लिष्ट आहे. Trenor Black ratio सुध्दा वापरला जऊ शकतो असे काही ठिकाणी वाचले आहे. मला सुद्धा या वर अजुन वाचन करायचे आहे. 

३. Position Sizing:- Position sizing आणि risk reward ratio वर सगळीकडे मुबलक लिखाण आहे. प्रत्येक ट्रेडर शक्यतो या दोन संज्ञांशी परिचित असतोच. प्रत्येक स्ट्रॅटेजीमधे एका ट्रेडला किती कॅपिटल ॲलोकेट करायचे हे सुद्धा अतिशय महत्वाचे आहे. Position size कमी असेल तर आपल्याला अपेक्षित फायदा होणार नाही आणि जास्त असेल तर आपल्याला चांगलाच लॅास होऊ शकतो. Position sizing साठी fixed units, fixed sum, fixed fraction, fixed percentage, kelly criterion, leverage space theory वापरले जातात.  यावर Ralph Vince यांची पुस्तके वाचनीय आहेत.

४. रिस्क मॅनेजमेंट:-
मार्केट मधे दोन प्रकारची रिस्क असते. 
१. Systematic Risk
२. Unsystematic Risk.

कितीही काही केले तरी मार्केटमधे रिस्क आहेच, ती आपण टाळू शकत नाही, ते काही आपल्या हातात नाही. आपल्या हातात फक्त रिस्क मॅनेज करणे आहे. ते जितक्या ऊत्तम प्रकारे करता येईल ते करायला हवे. वेगवेगळ्या रिस्क आणि त्याचे risk measures आपण थोडक्यात पाहू या. 

systematic risk components हे वारंवार घडत असतात, याचा एक ठराविक पॅटर्न असतो. आपण आपल्या मॉडेल मधे, बॅकटेस्टींग मधे हे अंतर्भुत करु शकतो. जे असे दिवस असतील ते दिवस वगळून आपली स्ट्रॅटेजी बॅकटेस्ट/ ईम्प्लीमेंट करु शकतो. अशा दिवशी ट्रेडींग न करणे, पोझिशन साईझ कमी करणे असेही करता येते. systematic risk चे ऊदाहरण द्यायचे झाल्यास अर्थसंकल्प, सेंट्रल बँक पॉलिसी, निवडणूकींचे निकाल, कंपन्याचे वार्षिक निकाल, वगैरे

unsystematic risk components हे अतिशय अनिश्चित/ रँडम असतात आणि याचा फिक्स असा काही पॅटर्न नसतो. त्यामुळे अर्थातच हे कधी घडतील याचा अंदाज कोणालाच नसतो आणि त्यामुळे हे जास्त धोकादायक असतात. एखादी नैसर्गिक आपत्ती, राजकीय अस्थिरता, युद्धजन्य परिस्थिती हे unsystematic risk मधे मोडतील.

मोठ्या प्लेअर्स साठी असणार्‍या risks, risk evaluation methods, risk measures हे जास्त आहेत, त्याच्यासाठी अर्थातच एक संपुर्ण डिपार्ट्मेंट असते. आपण त्याविषयी खोलात जाऊन अभ्यास करण्याची तितकीशी गरज नाही.

एका रिटेल ट्रेडरने ट्रेड घेताना किमान, position sizing, Stop loss orders, capital allocation या बाबतीत अतिशय शिस्तबद्ध असणे नितांत गरजेचे आहे. याशिवाय Sensitivity analysis, VaR analysis, Stress Tests सुद्धा करायला हव्या. यात अजून एक सर्वात महत्वाचे म्हणजे लिव्हरेज. रिटेल ईन्व्हेस्टर्स साठी मला मार्केट मधे सर्वात घातक काही वाटत असेल तर ते आहे लिव्हरेज. लिव्हरेज ही दुधारी तलवार आहे. ती फार काळजी पुर्वक हाताळायला हवी. मी FNO मधे ट्रेड करणार्‍या अनेकांचे हात या मधे पोळलेले पाहिले आहेत.

मार्केटमधील systematic, unsystematic risks शिवाय आपल्या सारख्या रिटेल ईन्व्हेस्टर्स कडून वेंधळेपणाने होणार्‍या चुका जसे की चुकीची संख्या टाकणे, जो PE किंवा CE ट्र्रेड करायचा होता ते सोडून भलत्याच कोणत्यातरी PE किंवा CE ची ऑर्डर टाकणे, टाकलेली ऑर्डर कॅन्सल करायला विसरणे, ह्या सर्व वेगळ्याच. ह्यासाठी एक तर अल्गो ट्रेडिंग कडे वळणे हा एक चांगला पर्याय आज उपलब्ध आहे.

वर लिहिलेल्या सर्व संज्ञा, व्याख्येसकट, विस्तृतपणे लिहायला घेतल्या होत्या पण ते सर्व एका लेखात लिहून होणे अशक्य आहे. शिवाय हा अतिशय गहन आणि महत्वाचा विषय असल्याने तो व्यवस्थित समजायला हवा. हा लेख फारच छोटा आहे याची कल्पना आहे. पण मला माहित असलेल्या सर्व पद्धती मी यात लिहिल्या आहेत. बहुतांश ट्रेडर्सना हे सर्व करायचे असते हेच माहित नसते, आपल्याला फक्त position sizing, risk reward ratio हेच माहित असते, त्यामुळे हा लेख फक्त तोंडओळख करुन देण्यासाठी लिहिला आहे. या लेखाचा ऊद्देश पहिल्या लेखाप्रमाणेच आपल्या मार्केटकडे बघण्याच्या अ‍ॅप्रोच मधे बदल करणे हा आहे. यातील प्रत्येक विषयाचा प्रत्येक ट्रेडर व ईन्व्हेस्टरने अभ्यास करणे गरजेचे आहे.

जाता जाता काही रिस्क आणि रिस्क मॅनेज न केल्यास काय होऊ शकते याची ऊदाहरणे पाहू या.

१. ऑप्शन्स ट्रेड करणार्‍यांना मागील वर्षी झालेले मार्केट मॅनिप्युलेशन, फ्रिक ट्रेडस याविषयी कल्पना असेलच. भारताबाहेरील फ्रिक ट्रेड्सचे किस्से अनेक आहेत. न्युज रिडींग अल्गोरिदम्स मुळे ट्रिगर ट्रेड्स, स्पुफिंग मुळे आलेली मार्केट मुव्ह याविषयी वाचल्यास्नेत वर अनेक किस्से सापडतील.
पण हे भारतातले लेटेस्ट किस्से.

https://www.moneylife.in/article/traders-spooked-as-friday-freak-trade-s...

२. ब्लॅक-शोल्स मॉडेल साठी नोबेल मिळालेल्या ब्लॅक व शोल्स यांच्या लाँग टर्म कॅपिटल मॅनेजमेंट फंडच्या एका स्ट्रॅटेजी मधे अमेरिकन सरकारला हस्तक्षेप करावा लागला होता.
https://www.managementstudyguide.com/failure-of-long-term-capital-manage...

३. हा किस्सा बर्‍याच जणांना माहित असेलच. एका ट्रेडर मुळे युकेची जुनी बँक बुडाली होती.
https://www.investopedia.com/ask/answers/08/nick-leeson-barings-bank.asp

४. सेबीच्या बदलेल्या नियमाचा आणि illiquid ऑप्शन्स ट्रेड केल्याने रिटेल ट्रेडर्सना बसलेला फटका.
https://www.fortuneindia.com/investing/new-sebi-options-rules-misfire-sh...

५. शेअर मार्केट मधे झालेल्या नुकसानामुळे रिटेल ट्रेडर्स ने केलेल्या आत्महत्या.

https://timesofindia.indiatimes.com/city/coimbatore/rs-50l-loss-in-share...

https://timesofindia.indiatimes.com/city/bhubaneswar/loss-in-stock-marke...

६. Knight Capital ला एका चुकीसाठी ४४० मिलियनचा दंड बसला होता.
https://www.forbes.com/sites/steveschaefer/2012/08/02/knight-capital-tra...

७. Goldman Sachs ला पण एका चुकीसाठी १०० मिलियनचा भुर्दंड बसला होता.
https://www.reuters.com/article/us-sec-goldmansachs-idUSKCN0PA28H20150630

८. ईस्राईल मधील एका ट्रेडरने केलेल्या टायपिंग एरर मुळे झालेले नुकसान.
https://www.timesofisrael.com/typing-error-sends-tel-aviv-stock-exchange...

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यातल्या अनेक संज्ञा मी पहिल्यांदाच ऐकतोय.
अर्थात माझ्या एकंदर कॉर्पसचा दोन टक्के भाग डायरेक्ट शेअर्समध्ये असावा असे टारगेट ठेवूनच मी शेअर्स घेतो, त्यामुळे फार खोलात जायची गरज पडली नाही. चुकतमाकत बरेच काही शिकलोय.
वेळ झाला की तुम्ही लिहिलेल्या गोष्टींबद्दल अधिक वाचेन.

<< मार्केट मधे टिकून रहायचे असेल तर वरील चुका कशा टाळता येतील याच्या शास्त्रीय पद्धती समजून घेणे अतिशय गरजेचे आहे. >>

एकंदरीत लेख गमतीशीर आहे. शेअर मार्केट हा प्रकार शास्त्रीय नाही, अमके केले की फायदा होईल किंवा तमके केले की नुकसान होणार नाही, असे काहीही नियम किंवा लॉज शेअर मार्केटमध्ये नसतात.

<< मार्केट मधे दोन प्रकारची रिस्क असते. >>
नाही, फक्त एकच रिस्क असते ती म्हणजे loss of capital.

Rule No. 1: Never lose money. Rule no. 2: Never forget Rule No. 1.

रिस्क कुठलीही असो, ती manage करण्याचे फक्त ४ प्रकार आहेत.
Avoid risk, Reduce risk, Transfer risk, Accept risk (e.g. black swan event)

<< या भागात आपण कोणतीही स्ट्रॅटेजी डिप्लॅाय करण्याआधीची प्रोसेस पाहू. >>

डिप्लॅाय करण्याआधी मुख्य मुद्दा हा आहे की स्ट्रॅटेजी कशी ठरवावी. त्याबद्दल लिहिले नाही. मुळात व्यक्तिगत रिस्क टॉलरंस काय आहे, ॲसेट ॲलोकेशन काय असावे, ट्रेडिंग करावे की लाँग टर्म इंवेस्टर बनावे, नेटवर्थच्या किती टक्के शेअर मार्केटमध्ये गुंतवावे हा पण स्ट्रॅटेजीचा भाग आहे.

बहुतेक लेख ट्रेडर्सच्यासाठी किंवा त्यांच्या दृष्टीकोनातून लिहिला आहे, असे वाटले. असो, वाचत आहे.

फायदा होण्याच्या किंवा तोटा टाळण्याच्या शास्त्रीय पद्धती असे कुठे ध्वनित होत आहे?

मी कॅपिटल प्रोटेक्शन, रिस्क मॅनेजमेंट कसे करायचे या विषयी लिहिले आहे.

लेख ट्रेडर्सना जास्त उपयोगी आहे. पण यातील अनेक पद्धती लॅांग टर्म ईन्व्हेस्टर्स पण वापरतात.

improper position sizing, improper capital allocation, lack of discipline, trader’s bias and psychology, improper strategy or lack of in depth analysis ... या चुका कशा टाळता येतील याच्या शास्त्रीय पद्धती समजून घेणे अतिशय गरजेचे आहे. >> असं लिहिलंय, त्या संदर्भात माझी प्रतिक्रिया आहे. यात शास्त्रीय काय आहे?

स्ट्रॅटेजी कशी ठरवावी>>>
आपण कोणती स्ट्रॅटेजी ट्रेड करणार त्याचे मुल्यमापन कसे करायचे ते पहिल्याच मुद्द्यात लिहिले आहे.
>>>>

१. कोणती स्ट्रॅटेजी डिप्लॅाय करावी.:-जसे आपण फंडामेंटल ॲनेलेसिस करताना वेगवेगळे रेशिओ पाहतो तसेच कोणत्याही स्ट्रॅटेजीचे ईव्हॅल्यूएशन करताना त्या स्ट्रॅटेजीचे फक्त रिटर्न न पाहता अनेक वेगवेगळे रेशिओ पाहिले जातात. त्या रेशिओच्या आधारे स्ट्रॅटेजीचे मुल्यमापन केले जाते. त्यातील काही महत्वाचे रेशिओ म्हणजे Sharpe Ratio, Sortino ratio, calmar ratio, Jensen's Alpha ratio, sterling ratio, omega ratio, M squared, RAROC etc प्रत्येक रेशिओचा ऊद्देश आणि उपयोग वेगवेगळे आहेत.

Fundamental analysis vs. Technical analysis part comes much later. I am not trying to argue, but just showing other side as well, to add value to the discussion. Anyway, please continue.

improper position sizing, improper capital allocation, lack of discipline, trader’s bias and psychology, improper strategy or lack of in depth analysis ... या चुका कशा टाळता येतील याच्या शास्त्रीय पद्धती समजून घेणे अतिशय गरजेचे आहे. >> असं लिहिलंय, त्या संदर्भात माझी प्रतिक्रिया आहे. यात शास्त्रीय काय आहे?>>>>

मला अजुनही तुमचा मुद्दा समजला नाही.

शास्त्रीय हा शब्द चुकीचा वाटतोय का?

मला Portfolio and risk management च्या systematic methods असे म्हणायचे आहे.

I am not trying to argue, but just showing other side as well, to add value to the discussion. Anyway, please continue.>>>

मी तुमचा मुद्दा समजून घ्यायचाच प्रयत्न करतोय, जेणे करून मला जर काही माहित नसेल तर शिकता येईल, लेख लिहिताना काही सुटले असेल तर ते त्यात ॲड करता येईल.

मुळात व्यक्तिगत रिस्क टॉलरंस काय आहे, ॲसेट ॲलोकेशन काय असावे, ट्रेडिंग करावे की लाँग टर्म इंवेस्टर बनावे, नेटवर्थच्या किती टक्के शेअर मार्केटमध्ये गुंतवावे हा पण स्ट्रॅटेजीचा भाग आहे.>>>

हो.

मी फक्त ईक्विटीमधले ॲसेट ॲलोकेशन, रिस्क मॅनेजमेंट कसे करायचे या विषयी लिहिले आहे.

Fundamental analysis vs. Technical analysis part comes much later. >>>

मी पण त्या विषयी बोलत नाही. वर लिहिलेल्या पद्धतींपैकी अनेक पद्धती फंडामेंटल ईन्व्हेस्टर्स सुद्धा वापरतात. स्ट्रॅटेजी काय असावी हे वैयक्तिक आहे. स्ट्रॅटेजीचे मुल्यमापन कसे करावे हे मी लिहायचा प्रयत्न करतोय.

शास्त्रीय हा शब्द चुकीचा वाटतोय का? >> होय>>>

ओके. बदल करतो.

लेख माहितीपूर्ण आहे व पुढील भागाच्या प्रतिक्षेत, पण तो हेज फंड्स च्या दृष्टीकोनातून लिहिला आहे असे वाटते. यातल्या बर्‍याच संज्ञा सामान्य गुंतवणूकदारांच्या बाबतीत गैरलागू आहेत. बरीश वर्षे गुंतवणूक करणार्‍यांनीही या पहिल्यांदाच ऐकल्या असाव्यात.

अतरंगी,

या लेखाचा ऊद्देश पहिल्या लेखाप्रमाणेच आपल्या मार्केटकडे बघण्याच्या अ‍ॅप्रोच मधे बदल करणे हा आहे ===> ++
मी पहिला लेख वाचताना थोड गोंधळलो होतो ( वा मी चुकीचे ग्रह केले होते).... पण आता स्पष्ट झाले.

आपल्या समाजाचा ( मराठी तर जास्तच) अ‍ॅप्रोच बदलणे खूपच गरजेच आहे !!

Equity investment , Equity trading.... बद्दल लिहणार का ?

मला वाटत trading ची सुरुवात Equity करावी.....

शुभेच्छा !!

हेज फंड्स आणि High frequency traders या पद्धतीने रिस्क मॅनेज करतात.

रिटेल ट्रेडर्स मधे यशस्वी ट्रेडर्सचे प्रमाण कमी आहे कारण ते हे सर्व करत नाहीत. ॲक्टिव्ह ट्रेडर्स आणि ईन्व्हेस्टर्स साठी तर हे महत्वाचे आहेच पण एका सामान्य गुंतवणूकदारा साठी पण हे सर्व फायद्याचेच आहे. अगदी म्युच्युअल फंड मधे पैसे गुंतवणाऱ्या एखाद्याचे ऊदाहरण घेतले तरी दहा बारा शॅार्टलिस्टेड फंड्स मधून कोणत्या फंड मधे पैसे गुंतवायचे? कोणत्या फंड मधे किती गुंतवायचे हे कशाच्या आधारावर ठरवणार?

फंडचा पर्फॅारमन्सचे मुल्यमापन करायला पण तेच रेशिओ वापरले जातात जे एका स्ट्रॅटेजीचे मुल्यमापन करायला वापरतात. शिवाय कोणत्या फंड मधे किती पैसे गुंतवायचे हे ठरवायला पण CAPM efficient frontier किंवा ईतर कॅपिटल ॲलोकेशन मेथड्स वापरायला हव्या.

मला वाटते की एक रिटेल ट्रेडर, गुंतवणूकदार यांच्या यशामधे रिस्क मॅनेजमेंट ही सर्वात महत्वाची आहे. शेअर मार्केट एक जुगार आहे या मानसिकतेमधून बाहेर येण्यासाठीच ही मालिका आहे.यात मला आजमितीला माहीत असलेल्या सर्व रिस्क मॅनेजमेंट पद्धती मला ईतरांशी शेअर करायच्या होत्या.

Equity investment , Equity trading.... बद्दल लिहणार का ?>>>

तुम्ही investment साठी स्टॅाक कसे सिलेक्ट करायचे, ट्रेडिंग कसे करायचे याबद्दल विचारत आहात का?

अतरंगी,
थोडक्यात हो.
In General जर एखादयाला प्रथमच share market मध्ये पैसे गुंतवायचे असेल तर equity/mf नंतर derivative ह्या मार्गाने जावे अस मला वाटत, not compulsory thumb rule.

equity investment/trading share market समजायला सोप व कमी risky.

तुम्ही अनेक महत्वाच्या बाबी लेखात व प्रतिसादांत सांगत आहात pls keep continue...

स्टॅाक सिलेक्शन किंवा ट्रेडिंगवर लिहायचा माझा विचार नाही. त्यावर मुबलक चांगले साहित्य उपलब्ध आहे, रिटेल ट्रेडर्स व छोट्या गुंतवणूकदारांना त्याबद्दल माहिती आहे. पण रिस्क मॅनेजमेंट, त्यातल्या नविन व चांगल्या पद्धती अनेकांना माहित नसतात. त्यामुळे मला त्याविषयी लिहावेसे वाटले.

शिवाय मी Quant Trader आहे. ईंट्राडे असो की लॅांग टर्म मी rule based strategies तयार करून, त्याचे बॅकटेस्टिंग करून, या लेखात लिहिलेल्या पद्धतीने त्याचे मुल्यमापन करून मग भांडवल गुंतवतो. ते कसे करायचे, त्यासाठी उपलब्ध असलेले रिसोर्सेस यावर सेपरेटली लिहिणार आहे.

Quant Trader ==>
मी In.
लवकरच लिहा .

Jim Simons चे The Man Who Solved the Market: How Jim Simons Launched the Quant Revolution हे नुकतेच मागवले आहे.... पण वाचन नाही केल. पण त्यात Quant trading बद्दल नाही जास्त.