४ किलीमांजारो - कीकेलेवा the Third

Submitted by वाट्टेल ते on 2 February, 2022 - 20:31

या hike मधली सगळ्यांत उत्साहवर्धक गोष्ट म्हणजे प्रत्येक सकाळ सुंदर असायची. माझ्यापाशी तोडी, भैरव किंवा ललत चे रेकॉर्डिंग नाही किंबहुना जाणीवपूर्वक आपण रेकॉर्डेड गाणी आणलीच नाहीत याबद्दल त्या सकाळी जरासे वाईट वाटायचे. पराग वाकणकरांनी गाणी आणली होती पण बहुदा पहिल्याच दिवशी त्यांचा फोन आणि player बॅगमध्ये उघड्या कप्यात राहून पावसात स्वाहा झाले होते, त्यामुळे तो मार्गही बंद होता. फोन कामातून जाऊनही गृहस्थ calm and composed आहे हे बघून थक्क झाले. माझे, इतरांचा फारसा विचार न करता स्वतःच्याच वेड्यावाकड्या आवाजात गाण्याचे प्रयत्न चालू होते आणि जास्त करून स्मरणरंजन. तरीही एकूण digital detox was working well.
second cave हे आम्ही राहिलेल्या जागांमध्ये मला सर्वांत कमी आवडलेले ठिकाण. इथून सकाळी निघताना तरी स्वच्छ सूर्यप्रकाश आणि जरासे ऊन पण होते. जवळ जवळ रोजच सकाळी ४:३० -५ पर्यंत छान झोप होऊन जाग येत असल्याने कपालभाती, अनुलोम विलोम, थोडे breathing exercises अगदी मनासारखे होत होते. सकाळच्या उन्हात जरासे stretching सुद्धा करता आले. आज सकाळी पोर्टर्सनी गाणी म्हटली, एक किलीमांजारोचे गाणे आणि missing XXX चे गाणे मस्त होते, ते त्यांनी नंतरही अनेक वेळा म्हटले.
इंडियन स्टॅंडर्ड टाइमप्रमाणे ठरवलेल्या वेळेच्या तासभर नंतर पोले पोले निघालो. आज वाट छान होती. वाटेत पुष्कळ धुके. जेव्हा धुके नसायचे तेव्हा खालचे खोरे दिसायचे, आपण परवा कुठे होतो आणि आता कुठे आलो असे काहीतरी चमत्कारिक विचार डोक्यात आल्याचे आठवते. second cave च्या इथली cave फारशी चांगली नव्हती, पण आज त्याने चांगली cave दाखवेन असे सांगितले होते. हे guide इतका हळू pace सेट करत होते की चालण्याचे काहीही श्रम वाटत नव्हते, न श्वास लागत होता. दिल ढुंढता है फिर वही फुरसतके रात दिन, वगैरे काहीसे वाटल्याचे स्पष्ट आठवते. चालत चालत त्या cave जवळ पोहोचलो. मोठी cave होती, आत मिट्ट अंधार, एका बाजूने भिंतीला धरून धरून आत जात होतो. बरोबरची मंडळी उगीचच चित्कार काढत होती आणि echo च्या आवाजाने शहारे येत होते. मध्ये अर्थातच दगड, चिखल असा भाग होता, पण cave च्या आत एक वेगळीच शांतता होती. मला Guide सिनेमात सुरुवातीला वहिदा रेहमानचा नवरा शोधत असतो त्या गुहेच्या सीनची आठवण झाली. अचानक कोरीव मूर्ती वगैरे दिसल्या तर काय मजा होईल असं काहीसं वाटल्याचे आठवत. अर्थात तसला काही चमत्कार घडला नाही. काही अंतर गेल्यावर मंडळी कंटाळली. पुढे जरासे वाकून व सरपटत आत जावे लागेल असे सांगण्यात आले, अर्थात तिथे कोणताही खजिना नव्हता त्यामुळे फोटो काढून मंडळी परत वळली. मिहीरला पुढे जाण्यात interest होता, मी पण कंपनी दिली असती पण सगळेच मागे फिरलो आणि पुढच्या रस्त्याला लागलो.
6.jpg
पुढे कुठेतरी बराच पुढे पाऊस लागला. मध्ये १,२ वेळा ओढे - पाणी सुद्धा ओलांडले. बराच वेळ मी बहुतेक एकटीच चालत होते असे आठवते. ती सगळी वाट magical होती. एकदाही घड्याळ पहिले नाही, काळ-वेळ सगळेच भान हरपले होते. अचानक इंदिरा संतांची निवडुंगाच्या शीर्ण फुलांचे ही कविता आठवली. तीच मनातल्या मनात म्हणत राहिले. मग फुलराणी म्हटली. झपूर्झा सुद्धा. भय इथले संपत नाही वगैरे वगैरे. पाऊस आणि धुक्यामुळे इतर काही दिसत नव्हते आणि अचानक कीकेलेवा कॅम्पला पोहोचलेच. आल्या आल्या टेन्टमध्ये सर्वप्रथम काय केले तर - आजची विडिओ डायरी. गेल्या १-२ तासांत एक eternal bliss , काहीतरी शब्दांत न पकडता येण्यासारख्या क्षणांचा प्रवास घडला होता.
यथावकाश DS आली. हा camp आम्ही राहिलो त्या सगळ्यात मला सर्वांत जास्त आवडला. पाठी एक लहान धबधबा होता आणि त्याचा रात्रभर इतका सुंदर आवाज येत होता की त्या आवाजाचा होत असणारा परिणाम शब्दांत सांगणे अशक्य आहे. दूरवर अजून १,२ धबधबे दिसत होते पण डेविडने तिथे जाणे फारच अवघड आहे असे सांगितल्याने ते दूरच राहिले. दुपारी जरा ऊन पडले होते. तिथे भरपूर जागा होती मग मी आणि DS ने बरेच stretching , योगा केले. एका पोर्टरने अतिशय गंभीर चेहऱ्याने उगीचच जरा अजून stretching करून घेतले. आम्ही म्हटले फुकटात योगालेसन मिळाला. तिथे हिंडताना Patrick भेटला. एकदम young , enthusiastic, bubbly. आम्ही ३ दिवसात केले ते अंतर त्याने दोन दिवसातच पार केले होते. मूळ Seattle चा असणारा आणि आता ऑस्ट्रेलियात राहणारा. JRO ला सकाळी ६ ला आला आणि लगेच hike सुरु केली होती. आमचा Summit डे एकच असणार होता. तो त्याच्या ग्रुप मध्ये एकटाच होता आणि सोबत ३-४ पोर्टर-guide. तो चांगलाच hiker असावा. त्याच्या उत्साही बडबडीत संध्याकाळचा वेळ मजेत गेला. DS आणि मी सुद्धा इथे खूप गप्पा मारल्या. धुके असले तरी valley खाली आहे हे जाणवत होते. DS ला इथे बहुदा जरा पोटाचा त्रास सुरु झाला, other than that she was going strong . आणि मी स्वतः - खोकला almost गेलाच होता, अंगप्रत्यंगात वेगळाच उत्साह होता.
7.jpg
रात्री ३ च्या आसपास जाग आली तेव्हा बाहेर आले. प्रचंड थंडी होती पण टेन्टमध्ये जावेसे सुद्धा वाटत नव्हते. वर पहिले तर clear skies आणि "पसरली जणू तारकादळे गगनात". इतके सुंदर आकाश इतके जवळून मी कधीही अनुभवले नव्हते असेच वाटले. परवा summit night ला अमावस्या आहे तेव्हा हेच आकाश असेच पुन्हा दिसेल या कल्पनेने अद्भुत वाटले. घरी असताना meteor shower असेल तर किंवा कधीतरी आनंद असे रात्रीचे आकाश बघायला उठतो, तेव्हा मी गाढ झोपेत असते, चुकूनही उठत नाही पण आज अचानक ते भेटले. परत टेन्टमध्ये आल्यावर - सतारीचे बोल अचानक डोक्यात आली. त्या प्रचंड कवितेची सर्व कडवी पुन :पुन्हा आठवत राहिले,
दिक्कालांसह अतीत झालो - उगमी विलयी अनंत उरलो. किंवा
नक्षत्रे तो अगणित दिसली, अस्तित्वाची त्यांच्या नव्हती हा वेळवरी दादच मज ती
आणि मग शेवटचे -
शांत वाजली गती शेवटी , शांत निशा ती शांत धरित्री, शांतच वारे शांतच तारे, शांतच हृदयी झाले सारे
असा सुखे मी सदना आलो, शांतीत अहा झोपी गेलो, बोल बोललो परी कितीकदा , स्वप्नी दिडदा दिडदा दिडदा

झोप येणे शक्य नव्हते. DS पण लवकर उठली. मी तिच्याशी कितीतरी बोलत राहिले, काहीतरी उच्च. पण तिच्यावर काहीही परिणाम नव्हता, त्यामुळे अनिताची आठवण झाली. अर्थात माझ्या उत्साहात काहीही फरक पडला नव्हता. सकाळी टेन्टमध्ये समोर सूर्योदय दिसत होता, भैरवचे सूर आठवत होते. प्राणायाम व आवराआवरसुद्धा लवकरच झाली. चौथ्या दिवसासाठी सज्ज झाले. सा रम्या मधुरा कीकेलेवास्थित तृतीय रात्री संपूर्णम।
क्रमश:..https://www.maayboli.com/node/81001

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'लिखाणात आलेल्या गाणी आणि कविता यांच्या ओळी आवडल्या' हे ह्या भागाला जास्तच लागू होते आहे.

सुंदर लिखाण!

खूप सुरेख. वाटचालीच्या वर्णनाबरोबरच सहजपणे जे कविता, गीतं वगैरेंचे संदर्भ येतात त्यामुळे एकूणच अनुभव फार उच्च झाला आहे.

अमेझिंग! तुमच्या लेखनातून आत्ता कानात भैरवचे धीर गंभीर स्वर वाजू लागलेत. मारवा लवकर नका आणू फक्त!

वाटचालीच्या वर्णनाबरोबरच सहजपणे जे कविता, गीतं वगैरेंचे संदर्भ येतात त्यामुळे एकूणच अनुभव फार उच्च झाला आहे. >>> +१ अगदी हेच लिहिणार होते!

केवळ सुंद र!!

>>>>>>>पाठी एक लहान धबधबा होता आणि त्याचा रात्रभर इतका सुंदर आवाज येत होता की त्या आवाजाचा होत असणारा परिणाम शब्दांत सांगणे अशक्य आहे.
>>>>>>>>वर पहिले तर clear skies आणि "पसरली जणू तारकादळे गगनात". इतके सुंदर आकाश इतके जवळून मी कधीही अनुभवले नव्हते असेच वाटले. परवा summit night ला अमावस्या आहे तेव्हा हेच आकाश असेच पुन्हा दिसेल या कल्पनेने अद्भुत वाटले.

आहाहा!!!

फारच भारी, आकाशाचे आणि चांदण्यांचे वर्णन
मला माझाच अनुभव तुमच्या शब्दरूपाने आल्यासारखा वाटतोय

फार सुंदर!!!
वाटचालीच्या वर्णनाबरोबरच सहजपणे जे कविता, गीतं वगैरेंचे संदर्भ येतात त्यामुळे एकूणच अनुभव फार उच्च झाला आहे.>>+११११