Adult ADHD

Submitted by दिव्या१७ on 30 January, 2022 - 00:41

हॅलो, माझी मोठी बहीण नेहमी अस्ताव्यस्त कधीही इसिली डिस्ट्रॅक्ट होणारी कोणते हि काम खूप हिरीरीने हातात घेऊन मधेच मूड गेला म्हणून सोडून देणारी.

तिच्या अस्ताव्यस्त पणामुळे घर घरातली माणसे वस्तू जागेवर न मिळणे काम टायमावर न होणे याने खूप त्रस्त आहेत, आणी माझ्या एका डॉक्टर मैत्रिणी च्या म्हणण्या प्रमाणे तिला ADHD असू शकतो Attention Deficit Hyperactivity Disorder (ADHD) पण माझी बहीण डॉक्टर कडे जाण्यास तयार नाही आणि घरच्यांना ती वेंधळी, आळशी आहे, काम करायला नको काही ADHD वैगेरे नाही असे म्हणणे आहे.

मी काय करू समजत नाही, बहिणीशी बोलले तर ती म्हणते अग मला खूप वाटतंय सगळी काम वेळेवर करावी, घर छान ठेवावं मी लिस्ट बनवते कामालाही लागते पण परत ते राहून जाते उद्या करू, आज ऑफिस चे काम खूप आहे, थकलेले वाटतंय म्हणून थोडावेळ आराम म्हणवुन थोडा वेळ घेतला कि परत ती distrarct होते आणि काम राहून जात.

इथे काही मदत मिळेल, सल्ला मिळेल म्हणून टाकते आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Take her to therapist. They will prescribe tests . So you will have clear diagnosis in hand. Take leave from job If needed. Sistervention is needed.

मी तर दरवर्षी शेवटच्या दिवसापर्यंत टॅक्स दिकलेरेशन साठी, investment सबमिशन साठी, नॉमिनेशन दिकलेरेशान साठी थांबतो.. मला पण टेस्ट करायला हवी का..? सवयच लागली आहे असं शेवटपर्यंत थांबायची

बहीण ऑफिसचं काम कसं करते? जर ते व्यवस्थित करत असेल आणि फक्त घरच्या कामाचा इश्यू असेल तर:
वेळ मिळत नाहीये, थकायला होतंय हेच खरं असेल.
किंवा हा प्रकार असा असेल की नवरा, सासु तिला थकेपर्यंत राबवून घेत आहेत? घरात पगारी मदत घेता येईल घर आवरायला.
जर ऑफिसमध्येही इश्यू असेल तर ADHD असू शकेल.

च्या अस्ताव्यस्त पणामुळे घर घरातली माणसे वस्तू जागेवर न मिळणे काम टायमावर न होणे याने खूप त्रस्त आहेत, >> घरच्या लोकांनी त्यांना मदत करायचा प्रयत्न केला आहे का? एकदा शांतपणे बसून त्यांच्याशी सर्वांनी बोलावे. काम प्लस घरकाम एकटीला ओव्हरव्हेल्मिन्ग वाट्त असेल दमून जात असतील तर राहात असेल. प्रत्येकाने पण आपापल्या वस्तू आपन जागे व र ठेवणे आपली कामे करणे असे केले तर त्यांच्यावरचे लोड कमी होईल. हे एकदा करून बघा.

>>प्रत्येकाने पण आपापल्या वस्तू आपन जागे वर ठेवणे <<+१ एकदा पसारा व्हायला सुरुवात झाली की बघता बघता त्याचा डोंगर उभा रहातो. तो बघुन आवरण्याचा अधिक कंटाळा येऊ शकतो..

थकायला होणं, रुटीन चा कंटाळा, कधीकधी काही व्हिटॅमिन्स ची कमी, थायरॉईड इश्यू,(किंवा डिप्रेशन) यामुळेही असं होऊ शकतं.
कारण काहीही असो, घरच्यांनी जास्तीत जास्त सपोर्ट करणं,(पसारा होण्याची संभाव्य कारणं शोधून ती कमी करणं, किंवा वस्तू त्या त्या वेळी सर्वांनी जागेवर ठेवणं, एकमेकांना आठवण करणं) इतकं करता येईल मुख्य कारण मिळेपर्यंत. थायरॉईड, बी12, डी3,शुगर तपासून घ्यावेच.

अरे बापरे .. मी पण थोडा असाच! बघुया माहिती मिळतेय इथे! >>> +७८६ .. मी ही असाच. हा एक आजार असू शकतो हे कधी ध्यानातच आले नाही. घरच्यांना मात्र फार त्रास होतो माझ्या या वागण्याचा. आम्ही आहोत म्हणून तुझे चाललेय हे रोजच ऐकावे लागते.
मी सुद्धा येथील चर्चा वाचतोय.

>> काम खूप हिरीरीने हातात घेऊन मधेच मूड गेला म्हणून सोडून देणारी.

असे झाल्यावर घरातल्या कोणीतरी त्यांना "चल हे काम आपण मिळून करू" असे त्यांना विचारून पाहिलं आहे का?

मी पण, जेव्हा कार्ड किंवा एन्व्हलप्स करायची असतात तेव्हा मी गळ्याशी येई पर्यंत त्या कामाला हात लावत नाही. आणि मग जागून वगैरे ग्रिटींग / लिफाफे पूर्ण करते. पण मग फार ताण येतो. आधी जेव्हा हातात वेळ असतो तेव्हा का करत नाही मी? शोधलं पाहिजे.

माझी बहिण ही अशीच आहे, पण ती नोकरी करत नाही..टीव्ही बघत असते. म्हणुन वाटते निदान घर नीटनेटके ठेवावे स्वतःचे.
तिला आळशी असेच म्हणायचो..असा आजार असू शकतो हे माहित नव्हते.
खूप सफाई करण्याचा आजार असतो हे मात्र माहित आहे (फ्रेंड्स मधिल मोनिका) OCD बहुधा..

सगळ्यांना थँक्स,

मंजूताई - ऑफिसमध्ये कशी वागते? >>> जॉब ची ही सोड पकड चालूच असते, मागच्यावर्षी मला घर, मुलीचा अभ्यास या मुळे मला जबाबदारी नाही पेलणार, नाही जमणार म्हणून हाती आलेलं प्रोमोशन सोडून जॉब पार्ट time करून घेतला.

WHITEHAT - नवरा, सासु तिला थकेपर्यंत राबवून घेत आहेत? घरात पगारी मदत घेता येईल घर आवरायला >> सासू नाही आहे, घरात फक्त दोघे आणी मुलगी, कोविद मध्ये सासू, तिची एक जवळची मैत्रीण आणी ऑफिस मधला एक कलीग गेले, आणी नवर्याला BP, शुगर असल्यामुळे तिने घरात कामवाली ठेवलीच नाही सासू गेल्यानंतर, तिला भीती वाटते नवर्याला ईन्फेकशन नको म्हणून. बाहेरून अगदी गरज असेल तरच कोणी घरात घेते. नवरा मार्केटिंग जॉब मध्ये आहे हेलथ issue मुळे वर्क फ्रॉम होम चालू आहे पण दिवसातले १२ तास कामात असतो मग हिला कुठून मदत करणार. घरातल्या कामाची सवय नाही आधी कामवाली, सासू आणी ही यांच्यात काम वाटली जायची आता एकटीवर पडतंय हे कारण असेल कदाचित.

थँक्स,अमा, कामाचा आणी कोविद मुले इमोशनल लोड खूप आहे, आणी ती थोडी जास्तच सेंसिटिव्ह आहे.

चंबू, एकदा पसारा व्हायला सुरुवात झाली की बघता बघता त्याचा डोंगर उभा रहातो. तो बघुन आवरण्याचा अधिक कंटाळा येऊ शकतो..>> हो ना कामाची सवय नाही मग नंतर करेन म्हणून काम साचतात, आधी ऑफिस जॉब होता २ वर्षा पासून workfromhome आहे टाइम manage होत नसावा.

mi_anu - थकायला होणं, रुटीन चा कंटाळा, कधीकधी काही व्हिटॅमिन्स ची कमी, थायरॉईड इश्यू,(किंवा डिप्रेशन) यामुळेही असं होऊ शकतं.>> हो मी अनु रिपोर्ट्स सांगितली आहेत डॉक्टर नी.

प्रोकॅस्टिनेशन आपण सगळेच करतो कधी ना कधी, मीही अशीच आहे पण जेंव्हा तिच्या मुलीचा मला फोन आला अग मावशी आई ला जरा सांगत जा मी माझे कपाट आवरते तिचे तसेच असते चोळा मोळा वस्तू मिळतच नाही मग बाबा चिडतो, कधी चहाला कपच मिळत नाही ही डिशवॉशर ला भांडे अगदी सगळे भांडे संपले की मग लावते, कपडे सकाळी वॉशिंग मशीन ला लावते आणी रात्री वाळत टाकते, मी आणी बाबा कधी कधी खरंच वैतागतो. तरी बाबा जास्त नाही बोलत तिला नाही तर रुसून बसते आणी बोलतच नाही. खूप पटकन चिडते.

हे एका दहा वर्ष्याच्या मुलीचे बोलणे, मी तिला फोन केला कि काय चाललंय काही टेंशन आहे का? तर तिचे म्हणणे अग लास्ट इयर promtion सोडले त्या जागी एक नवीन मुलगा आलाय माझ्यापेक्षा कमी अनुभव, वय आणी मलाच ऑर्डर सोडतो, आधी काम कशी नीट नव्हती आणी आता मी कशी सिस्टिमॅटिक करतो हे नेहमी दाखवून देत असतो, सिनिअर्स समोर जाणून बुजून माझ्या चुका काढत असतो. आता वाटते उगाच सोडल प्रोमोशन झालं असतं मॅनेज, ही डोकेदुखी तरी नसती आली, आणी माझी आधीची रेप्युटेशन राहिली असती, सिनिअर्स ही मी प्रोमोशन सोडल्यामुळे आणी जॉब partitme केल्यामुळे नाराज आहेत आता हा जॉब ही जातो की काय असं वाटायला लागलंय.
कोविद मुळे बाहेर जाणे होत नाही, तेच तेच रोजचे काम नको वाटते, आणी काम करायला घेतले की कॉन्सन्ट्रेटे नाही होत, थोडा विरंगुळा म्हणून एकादी वेब सिरीस बघायला घेते आणि ती पूर्ण झाल्याशिवाय उठावेसे नाही वाटत मग राहतील ती काम राहू देते, मला कळतंय मी चुकीचं करतेय, रोज ठरवते आज घरातली, ऑफिसची काम झाल्याशिवाय नो मूवी नो फोन पण कधी परत distarct होते कळतच नाही. आणि बिंगे watching आणि इटिंग मुळे वजन हि खूप वाढलंय, व्यायाम नाही होत.

मी symptoms गूगल केले तर हे मिळाले, डॉक्टर मैत्रिणीशी बोलली तर ती बोलली असू शकते, आधी ब्लड रिपोर्ट्स काढायला सांग व्हिटॅमिन कमी असू शकते.

ADHD symptoms include trouble focusing, hyperactivity and impulsive behaviour.
People may experience:
Behavioural: hyperactivity, fidgeting, impulsivity, irritability, risk-taking behaviours, or lack of restraint
Cognitive: difficulty focusing, forgetfulness, lack of concentration, problem paying attention, racing thoughts, or short attention span
Mood: anxiety, boredom, excitement, or mood swings
Also common: depression, learning disability, or sleep deprivation

यातले जवळजवळ सगळेच symptoms आहेत तिच्यात

COVID, घराबाहेर न पडणे ह्याचा सायकॉलॉजीकल परिणाम असू शकेल.
बाई लावा म्हणावं ही वेव्ह संपली की.
के र , फारशी, भांडी , ( आमच्याकडे आवडत नाहीं, चालत नाही वगैरे ना म्हणता) स्वैपाक, आणि कपड्यांच्या घड्या, भांडी लावणे, दस्तींग अशा कामांनाही.
Take a break and bring things on normal mode.
Mag ek एक काम ताब्यात घ्या हळूहळू किंवा हाच मोड चांगला वाटल्यास नका घेऊ. Happy

बाई ने कामात इकडे तिकडे केले तर थोडीफार डिस्काउंट द्यायला विसरू नका , आपली आधीची अवस्था आठवून. !पण १००% त्यांच्यावर सोडू नका).

वेब सिरीज संपवल्याशिवाय उठवत नसेल तर ते ADHD असेल का? त्यातही लक्ष लागायला नको ना?

रूटिन कामं इच्छा नसताना आणि प्रमाणाबाहेर डोक्यावर येऊन पडली की ती करायची इच्छा होत नाही हा माझाही अनुभव आहे. शिवाय याचा कधी शेवट आहे की नाही? हे करण्यासाठी माझा जन्म आहे का? असे प्रश्न जोडीला असतात.
कोणाला मदतीला बोलवायची लाज वाटते.

ऑफिसात प्रमोशन ऑफर केले होते याचा अर्थ काम चांगलं करत असणार. तिथे ADHD नव्हता म्हणजे!

सासू घरात काम करत असत का? मग त्यांची कामं आता कोण करतं? कामवाली येत नाही तर तिची कामं कोण करतं? सासूबाई गेल्या आणि कामवाली येत नाही म्हटल्यावर इतकं लोड कसं झेपेल?
नवऱ्याला समजायला हवं की बायकोला त्रास होतो आहे. Dishwasher तोही लावू शकतो किंवा स्वतःचा कप घासून घेऊ शकतो. त्याचे कपडेही बायकोच धुते का? मग तो काय फक्त 12 तास घरून काम करतो आणि बायको आळशी आहे असं म्हणतो? जेवण रोज चारी ठाव त्याच करतात का? तिथेही नवऱ्याला शुगर बीपी असल्यामुळे प्रॉपर हेल्दी फूड बनवण्याचा दबाव असतो का? तसं असल्यास काही जेवणं बाहेरून ऑर्डर करता येतील. हॉटेल फूड नको असल्यास घरगुती जेवण देणारेही खूप लोक असतात.
मला हा ADHD पेक्षा खूप जास्त काम असल्यामुळे overwhelm होऊन जाणं, आपण कितीही केलं तरी कामं पूर्ण होणारच नाहीत, घरी आणि ऑफिसात बोलणी खायचीच आहेत मग काम तरी कशाला करा- त्यापेक्षा वेब सिरीज बघू- असा प्रकार वाटला.
त्यांना मुळात कामं कुठे कमी करता येतात का ते बघायला सांगा. नवऱ्याला कामाला लावा. जमेल तिथे आउटसोर्स करा.
एखादी सिंगल, कसल्याही जबाबदाऱ्या नसणारी व्यक्ती जर म्हणाली की कामात लक्ष लागत नाही तर तो ADHD असण्याची शक्यता जास्त.
हा अटेन्शन डेफिसीट सिंड्रोम नसून- selfish husband gaslighting wife असा प्रकार वाटला. तिच्यावर भरपूर काम टाकायचं आणि वर तिच्यात काही समस्या आहे(आळशीपणा/मानसिक समस्या) असं म्हणून तिला दोष द्यायचा.
ती दहा वर्षांची मुलगी जर म्हणत असेल की कप उपलब्ध नव्हता म्हणून बाबा आईवर चिडला तर तिच्यावर काय conditioning होत आहे हाही विचार करा. बाप कप स्वतः का विसळत नाही हा प्रश्न तिला पडायला हवा.

पसारा होण्याची संभाव्य कारणं शोधून ती कमी करणं, किंवा वस्तू त्या त्या वेळी सर्वांनी जागेवर ठेवणं, एकमेकांना आठवण करणं) अनु, हा म्हंजे आदर्श उपाय आणि तोही ह्याच नव्हे तर प्रत्येक कुटुंबात अंमलात आणण्यासारखा आहे. पण बऱ्याच ठिकाणी "घर म्हणजे एकाने आवरायचं, दुसऱ्याने पसरायचं" (अशी कोणतीतरी कविता आहे बहुतेक,) हाच प्रकार दिसतो. :रागेजलेला चेहरा :
कारण ह्यात 'एक' म्हणजे स्त्रीवर्ग हेच गृहीत धरले जाते. क्वचित कोण अपवाद असतीलही. लहानपणी एक धडा होता की रविवारी (तरी) आईला सुट्टी मिळावी म्हणून सगळी मेंब्रं कामाला लागतात. चुकतमाकत का होईना, पण रांधप वगैरेसकट कामं होतात. मजा वाटायची ते वाचताना. असो. अवांतर पुरे.
बाकी अमा, WHITHAT, यांचेही मुद्दे योग्य वाटले.
एकदम कामाचा ताण येत असेल तर ऑफिस मध्ये करतात तसं घरी अग्रक्रम यादी तयार केली, तर चालेल का बहिणीला? म्हणजे वर्गीकरण करून कामं उरकणं. आणि एक प्रश्न जरा वैयक्तिक. जर रुचत असेल तर सांगा. ताईला पहिल्यापासून म्हणजे विवाहापूर्वीपासून अशी लक्षणे होती का?

१० वर्शाची मुलगी जर स्वतःचे कपाट आवरत असेल तर कपडे वाळत घालायला नक्कीच मदत करू शकते .
थोडी फार घरातली कामे करायला ही .
नवर्याचा जॉब जर महत्वाचा आहे तर तिचा नाही आहे का ? नवर्याला कामाच प्रेशर असेल तर तिलाही असेलच की .
मलाही हा ADHD प्रकार न वाटता fatigue वाटतोय . हे प्रकरण depression च्या मार्गावर जाण्या अगोदर सावरावे.
I feel , she needs a break , just to relax and get her mind sorted.
नवरा , मुलगी आणि तिने एकत्र बसून काही काळ quality time घालवाला .

वरती सर्वांनी चांगले मुद्दे मांडले आहेत.
जवळची माणसे अचानक गेल्याचा ताण देखील मोठा असतो. एकूणच घरातील तिन्ही सदस्यांनी एकत्र बसून मोकळेपणाने बोलणे गरजेचे आहे. शिवाय तुमच्या बहिणीने थोडे समुपदेशन देखील घ्यावे असे सुचवेन. आपला प्रमोशन नाकारून अर्धवेळ नोकरी करण्याचा निर्णय चुकला की काय असे वाटल्याने पण थोडे निराश वाटू शकते. This too shall pass! तुमच्या बहिणीला आणि तिच्या कुटुंबाला शुभेच्छा!

WHITEHAT यांचा प्रतिसाद १००% पटला. हे थोडं डिप्रेशन आणि anxiety सारख पण वाटतय.

covid मुळे सगळ खूप overwhelming झालच आहे आणि घरच्यांची साथ नसेल तर सगळ बाईवर येउन पडत. अशा वेळेला priorities ठरवल्या तर खूप फायदा होउ शकतो. आणि realistic expectations from yourself regardless of what others say.

अश्या situation मध्ये frustration येत की बाकिच्यांना - नवर्याला, घरातल्या इतर मोठ्या माणसांना - choice का मिळतो घरातली कोणती काम करायचा याचा, आपल्याला का नाही मिळत.

वेळच्या वेळी मदत घेतलेली बरी. घरातल्यांनी हातभार लावला तर ठिक नाहीतर outsource the task. हे असच चालू राहिल तर नंतर प्रक्रुतीवर परिणाम होणार.

कोणताही मानसिक आजार हा लगेच होत नाही
माणसाचे विचार कोणत्या प्रकारचे आहेत .त्याची विचार करण्याची कुवत किती आहे हे घटक महत्वाचे अस्तात.
पाहिले मानसिक आजार आणि नंतर त्याचा परिणाम म्हणून हार्मोन मध्ये बदल होत असावेत
.
वर what असे काही तरी नाव असणाऱ्या आयडी नी सासू त्रास देत असेल,घरातील लोक काहीच काम करत नसतील
तिलाच सर्व काम करावे लागत असेल म्हणून तिला कंटाळा आला असेल असे मत त्या आयडी चे मत वाचले
खरे तर तो सल्ला देणारा तो आयडी च मानसिक रोगी आहे
घर सर्वांचे असते आणि प्रत्येकाला घरविषयी आपली काय जबाबदारी आहे ह्याची जाणीव असते..

सगळ्यांनी चांगले मुद्दे मांडलेत. प्रमोशन म्हणजे जास्त जबाबदारी व ती पेलण्यास मानसिक तयारी नसावी कारण घरची संपूर्ण जबाबदारी व त्यात ही जास्तीची तर ती स्वत:ला ओळखून आहे असं वाटतंय नाहीतर सहजासहजी प्रमोशन कोण नाकारेल. योग्य ती मदत कुटुंबाची अथवा समुपदेशकाची मिळो! शुभेच्छा!

माझ्या ओळखीत तिघं आहेत, एडीएचडी असलेले, पैकी दोन ऑटिझम स्पेक्ट्रमवर आहेत. तिसऱ्या व्यक्तीचं निदान साधारण ६-७ महिन्यांपूर्वी झालं. तीही डॉक्टरकडे जायला तयार नव्हती, पण नंतर स्वेच्छेने गेली. त्यात मला एक गोष्ट जाणवली म्हणजे, कुठेतरी तिलाही वाटू लागलं कि हा असा "आळस", "थकवा येणं", एक गोष्ट ४-५ वेळा सांगूनही ना समजणं, काहीच लक्षात ना राहणं वगरे "नॉर्मल" नाही. मी आणि माझी डॉक्टर मैत्रिणी तिला समजावायचो, कि हात-पाय दुखले किंवा थकले कि जसा डॉक्टर लागतो, तसंच मेंदूलाही जास्त ताण, त्रास झाला तर डॉक्टर लागतो. आणि जखम झाली कि लगेच औषधोपचार केल्यावरच त्याचा परिणाम दिसू लागतो. जेवढं जास्त थांबू, तेवढा त्रास वाढणार.

https://www.mayoclinic.org/diseases-conditions/adult-adhd/diagnosis-trea...

लहान मुलांच्या आणि प्रौढांच्या एडीएचडीत फरक आहे, तसंच नेटवर खूप उलटी सुलटी माहिती आहेत. तेव्हा न्यूरॉलॉजिस्ट किंवा सायकियाट्रिस्टचा सल्ला घ्या. तिला नसेल जायचे डॉक्टरकडे तर तिच्याशी एका बोलून पहा कि का नाही जायचे. दुर्दैवाने बऱ्याच लोकांना वाटतं कि सायकियाट्रिस्टकडे जातोय म्हणजे आपल्यातच काही कमी आहे, किंवा आपल्याला सगळं नॉर्मल वाटत असताना, आपल्याला लोकं वेडं ठरवताहेत.

"बऱ्याचदा वर्ष निघून जातात, आणि आपल्याला वाटतं कि श्या, साला आपण असेच आहोत. मग एक दिवस निदान होतं, ट्रीटमेंट सुरु होते आणि जग बदलून जातं. " (सध्या एडीएचडीची ट्रीटमेंट चालू असलेल्या मैत्रिणीचा अनुभव)

योग्य ती मदत कुटुंबाची अथवा समुपदेशकाची मिळो! शुभेच्छा! +१

हा अटेन्शन डेफिसीट सिंड्रोम नसून- selfish husband gaslighting wife असा प्रकार वाटला. तिच्यावर भरपूर काम टाकायचं आणि वर तिच्यात काही समस्या आहे(आळशीपणा/मानसिक समस्या) असं म्हणून तिला दोष द्यायचा.
ती दहा वर्षांची मुलगी जर म्हणत असेल की कप उपलब्ध नव्हता म्हणून बाबा आईवर चिडला तर तिच्यावर काय conditioning होत आहे हाही विचार करा. बाप कप स्वतः का विसळत नाही हा प्रश्न तिला पडायला हवा.

>>
Perfect

घरात वारंवार वाद होत असतील किंवा एखादी व्यक्ती यांच्यावर वेळोवेळी राग व्यक्त करत असेल तर भीतीदायक तणाव सुद्धा एक कारण होऊ शकतो. ज्यामुळे हातात घेतलेलं काम करता करता दुसरं काम आठवलं किंवा कोणीतरी सांगितलं म्हणून हातातलं काम सोडून ते करायला घेतलं आणि राहून गेलं.

प्रमोशन म्हणजे जास्त पगार,सुविधा अशी त्याची व्याख्या नाही
जबाबदारी घेण्याची कुवत असावी लागते.
आणि ती नसली की बॉस ची सेवा करावी लागते .
अनेक ऑफिसर हे त्या जागेवर बसण्याच्या बिलकुल लायकीचे नाहीत ह्याची किती तरी उदाहरणे मिळतील .
पुरुष बॉस स्त्री ला प्रमोशन
स्त्री बॉस स्त्री ला प्रमोशन
नालायक बॉस चमचे गिरी करणारा कर्मचारी
काहीच अक्कल नसलेला बॉस आणि लाळघोटेपणा करण्यात एक्स्पर्ट कर्मचारी.
अशी वर्ग वारी करून प्रत्येक सरकारी,खासगी क्षेत्रातील प्रमोशन मिळणाऱ्या लोकांचा इतिहास कोणी तरी लिहला पाहिजे

सगळे शारीरीक टेस्ट्स घ्याच करून. पण बहुधा इतक्या गोष्टी अचानक आल्यने , गांगरून जाणे व मग काहीच न सुचणे मग ते साचत जाणे मग सवय लागणे ह्या चक्रातून जात असेल.
मानसिक आणि आर्थिक बदल हि कारणीभूत असतात.
सासू जाणे( जिची मदत होती), स्वतःचे करीअर निर्णय चुकल्याने खंत आणि त्यातच गिल्ट मध्ये फक्त गुंतुन रहाणे ह्यातच वेळ जात असेल. मग सवय लागते.
पसारा( कामाचा, गुंतलेल्या परीस्थितीचा) जितका ज्यास्त, तितक॑ गोंधळ ज्यास्त. काही मार्ग काढतात, काही रुततात.
शी नीड्स केअर. तिला थोडं त्या जागेतून आणि परीस्थितीतून बाहेर पडून श्वास घ्यायची गरज सुद्धा असेल. तेच तेच घर, त्या जबाबदार्या ह्यांने माणूस कंटाळला असतो. मग काहीच करावेसे वाटत नाही.
बघा तिच्याशी बोलून.
मी घरात सिनियर माणसाची केअर घेवून इतकी थकले की, नंतर नंतर माझी थकलेली कामं बघून उबग यायचा. त्यात मला अजिबातच काम थोपवायची सवय नाही. ओसीडी आहे कामं लगेच करायची. घर अगदी स्वच्छ ठेवायची. पण एका सिनियर माणसाची काळजी घर आणि नोकरी सांभाळून करताना दमछाक व्हायची. पळूनच जावेवाटल्र्ले.
शारीरीक थकवा इतकव असायचा की माझी कामच नाही व्हायची व आतून चिडचिड काम रखडले म्हणून.
तिला लिस्ट बनवायल॑ सांगा. काय कसं कधी करायचे आहे. थोडं स्वतःसाठी जगणं सुद्धा जरूरी आसते.

झंपी यांनी जे लिहिलंय त्यातून मी सध्या जातोय. माझ्या ओळखीतले - नात्यातले आणखी पाचजण साधारण तशाच स्थितीत आहेत. हे चित्र आता इतकं अनकॉमन राहिलेलं नाही.

झंपी, पोस्टशी अगदीच रिलेट करता आलं. ती फेज संपली, पण अजुनही आठवलं तरी अस्वस्थ वाटतं. भरपुर पैसे असले आणि मेड्सची फौज असली तरी तेव्हाची मानसिक अवस्था त्रासदायकच असते.
आणि भरत म्हणाले तसं, अशा थकलेल्या, त्रस्त व्यक्ती माहित आहेत. दिसतच रहातात.

सीमा, हा असा कसा प्रश्ण लोकांना पडतो ह्याचेच मला उलट आश्च्र्य वाटते, इतक्या लोकांनी लिहिलेय की, त्यांच्या बाबतीत सुद्धा झालय. त्यांनी सुद्धा आजूबाजूला पाहिलय.

बाकी, उत्तर द्यायचेच असेल तर मी फक्त स्वतःत रमत नाही. Happy आणि असे कुठले मायबोलीचे सगळेच अनुभव तुम्ही म्हणता मला माहित नाही. जे आहे ते आहे. मला खरं तर उत्तर द्यायची गरज न्हवती. पण प्रश्ण खवचटपणे विचारला नाही असे समजून देतेय.

आहेत अनुभव फिरण्याने, माझ्या कामाने आणि आजूबाजूच्या लोकांच्या लोंढ्यात वावरण्याने आणि थोडसं संवेदनशील दुसर्‍यांच्या बाबतीत रहाण्याने. Happy

तुम्हा लोकांना अनुभव नाही आलेत तर मग दुसर्‍याच्या बाबतीत घडतच नाही किंवा अस्तित्वातच नाही असे तर नसते ना? गोष्टीची पुस्तकं कमीच वाचते मी. Wink

काम करायला कंटाळा येणारे,झोपून राहणारे.
अन्न मात्र व्यवस्थित घेत असतील, चवी नी खात असतील .
तर ती व्यक्ती काम चोर आहे आजारी नाही.
आजारी असेल तर जेवण का सोडत नाहीत..
खरेच जे मानसिक किंवा शारीरिक आजारी असतात ते जेवण खाण्यात पण कंटाळा करतात.
जेवण बनवायचा कंटाळा आणि खाण्यात सर्वात पुढें.
ही काम चोर लोक.

Admin, webmaster हा वरचा प्रतिसाद चालवून घेणार का?
मानसिक थकवा आलेल्या व्यक्तीचं खच्चीकरण केलं जातं आहे. अशा एखाद्या व्यक्तीची समस्या अशा प्रतिसादामुळे आणखी गंभीर होऊ शकते.
या सदस्याचे बहुतेक धाग्यांवरचे प्रतिसाद याच स्वरूपाचे आणि अशाच भाषेत असतात.

झंपी यांनी जे लिहिलंय त्यातून मी सध्या जातोय.

भरत तुमच्या पोस्ट मधील हे वाक्य वाचलं आणि मग मी त्या रीती चा माझा प्रतिसाद लिहला.
माय बोली वर तुमचे विचार खूप वर्ष वाचतोय
तुमच्या सारखी लोक दुसऱ्या लोकांना मानसिक रोगी बनवाल.
अशी तुमची मतं असतात.

झंपी, पोस्टशी अगदीच रिलेट करता आलं. ती फेज संपली, पण अजुनही आठवलं तरी अस्वस्थ वाटतं. भरपुर पैसे असले आणि मेड्सची फौज असली तरी तेव्हाची मानसिक अवस्था त्रासदायकच असते.
आणि भरत म्हणाले तसं, अशा थकलेल्या, त्रस्त व्यक्ती माहित आहेत. दिसतच रहातात.>>>> +१११
त्यांना जरा एक व्यवस्थित counselling आणि me time ची गरज आहे, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं , प्रेमाची माणसं जवळ असणं आवश्यक आहे, नेमकं हेच चुकतं आणि आपलं, आपणच अशावेळी आपल्या माणसांना जज करून मोकळे होतो , हे असं का असतं काय माहित.

खरेच जे मानसिक किंवा शारीरिक आजारी असतात ते जेवण खाण्यात पण कंटाळा करतात.>> असं नाही. डिप्रेशन/ADHD मध्ये माणूस खातो पण काम करत नाही.
मी घरात सिनियर माणसाची केअर घेवून इतकी थकले की, नंतर नंतर माझी थकलेली कामं बघून उबग यायचा. त्यात मला अजिबातच काम थोपवायची सवय नाही. ओसीडी आहे कामं लगेच करायची. घर अगदी स्वच्छ ठेवायची. पण एका सिनियर माणसाची काळजी घर आणि नोकरी सांभाळून करताना दमछाक व्हायची. पळूनच जावेवाटल्र्ले.>> झंमपी, हा अनुभव येतो बऱ्याच जणांना. घरातल्या वयस्क माणसाची जबाबदारी फक्त मुलीवर किंवा सुनेवर पडते. अशा परिस्थितीत बरीच वर्षे काढल्या नंतर जेव्हा मला आयुष्यात काही वर्षे एकटं रहायची संधी आली ना, तेव्हा लोकांच्या दृष्टीने मी ‘अरेरे, आता एकटी कशी रहाणार ? ‘ अशी अवस्था होती आणी मी मात्र मस्त एंजॉय करत होते.

जॉब आणि प्रोमोशन सोडण्यामागे आणखीही कारणे असू शकतील. ऑफिस मध्ये काही घडलंय का याचाही तपास करावा. कधी कधी आपण विचार करतो त्याहून वेगळे काही घडत असते, सोसणारा सर्व सोसुन इतरांना सांगण्याची तयारी ठेवत नाही. परंतु डोक्यात सतत ते विचार आणि मनात कायम भीती घेऊन वावरताना वागण्या-बोलण्यात गोंधळ निर्माण होऊ शकतो.

>>>>>>>अशा परिस्थितीत बरीच वर्षे काढल्या नंतर जेव्हा मला आयुष्यात काही वर्षे एकटं रहायची संधी आली ना, तेव्हा लोकांच्या दृष्टीने मी ‘अरेरे, आता एकटी कशी रहाणार ? ‘ अशी अवस्था होती आणी मी मात्र मस्त एंजॉय करत होते.

समजू शकते शर्मिला.

बाकी, उत्तर द्यायचेच असेल तर मी फक्त स्वतःत रमत नाही. Happy आणि असे कुठले मायबोलीचे सगळेच अनुभव तुम्ही म्हणता मला माहित नाही. जे आहे ते आहे. मला खरं तर उत्तर द्यायची गरज न्हवती. पण प्रश्ण खवचटपणे विचारला नाही असे समजून देतेय.>>
नाही. खवचटपणाने नाही विचारला. अजुन ते इतक जमत नाही पण प्रयत्न चालू आहेत. कोल्हापुरी असल्याने वेळ लागतो.
पोस्टीत एक पॅटर्न दिसला म्हणुन विचारल.
वपुंची एक कथा आहे. त्यात पाकीट मारल्यावर सिंपथी दाखविण्यासाठी तो माणुस म्हणतो माझा कॅमेरा अस्साच हरवलेला. पण तस तो माणुस एम्पथी दाखविण्यासाठी प्रत्येकाला तशी स्टोरी सांगत असतो. गोष्टीच नाव अज्जिब्बातच आठवत नाहीये. लहानपणी कॅसेट ऐकलेली.
तुझ्या पोस्ट वाचल्या कि मला त्या गोष्टीची आठवण येते .

एकुण पोस्टवरून आईपेक्षा मुलीची काळजी जास्त वाटली. तिच्यावर किती भार पडतोय या सगळ्याचा हे का लक्षात येत नसेल अस वाटल. काय हरकत आहे डॉक कडे जायला निदान मुलीसाठी. ADHD /Depression काहीही असेल पण पहिल्यांदा डिनायल मधून बाहेर येवून हेल्प घ्यायला काय हरकत आहे अस वाटल. पण हे सगळ आतून आल्याशिवाय दिव्याची बहिण हॉस्पिटल मध्ये जाईल अस वाटत नाही. इथे नवर्‍यानेच पुढाकार घेवून तिला डॉक कडे , 'तु आजकाल थकल्यासारखी दिसतेस ' अस म्हणुन ( रेग्युलर प्रायमरी फिजिशियन कडे) घेवून गेल तरी चालण्यासारख आहे. सुरुवात तरी होईल कुठुन्तरी. कदाचीत प्रायमरी फिझिशियन नी तिला टेस्टस नॉर्मल आल्यावर शाररिक काही नाही आणि नेक्स्ट स्टेप सायकॉलिज्स्ट कडे जाण आहे अस सांगितल तर कदाचीत त्या ऐकतील. बरेचदा घरच्या लोकांच अशा व्यक्ती ऐकत नाहीत. पण डॉकनी सांगितल्यावर ऐकतात.