व्हिक्टोरिया राणीचा पुतळा

Submitted by प्रसाद70 on 22 January, 2022 - 05:43

व्हिक्टोरिया राणीचा पुतळा
हिरा यांनी प्रतिसाद देताना उल्लेख केलेला व्हिक्टोरिया राणीचा बसलेल्या स्थितीत असलेल्या राणीच्या पुतळ्याबद्दल ची हि माहिती.
हा पुतळा सध्याच्या टाटा कॉम्युनिकेशन(पूर्वीची ओव्हरसीस कॉम्युनिकेशन ) च्या बिल्डिंग च्या जागेवर होता. पुतळ्या भोवती तुम्ही फोटोत बघाल तर सुंदर कोरीव काम केलेली मेघडंबरी होती .हा पुतळा व मेघडंबरी बडोदयाचा गायकवाड महाराजांनी भेट दिला होता .ह्या पुतळ्याचे उदघाटन मुंबई चे गव्हर्नर फिलिप्स वुडहाऊस यांनी १८७२ मध्ये केले .पुतळ्याची उंची साधारण ८ फूट ६ इंच आहे.मेघडंबरीची उंची जमिनीपासून ४५ फूट होती.खालचा चौथरा १८ बाय २२ चा होता. पुतळा व मेघडंबरी साठी ३५० टन मार्बल वापरला होता.हा पुतळा मथुयू नोबेल यांनी लंडन मध्ये घडविला .१९६५ मध्ये इतर परदेशी व्यक्तीं च्या पुतळ्या प्रमाणे हा पुतळा राणीच्या बागेजवळ भाऊ दाजी लाड म्युझियमच्या आवारात हलवला .१९६८ साली या जागेवर ओव्हरसीस कॉम्युनिकेशन ची बिल्डिंग उभी राहिली .हि मेघडंबरी सध्या जेके हाऊस ,ब्रीच कँडी येथे आहे.त्यात सुटाबुटातील लाला कैलाशपत सिंघानिया यांचा पुतळा बसविण्यात आला आहे.

lala sighaniya new_0.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

छान माहिती
लहानपणी राणीच्या बागेत जायचो तेव्हा तेथील म्युझियम तेव्हाच्या वयाला अनुसरून एक बोअर जागा वाटायची ते आठवले Happy

मला वाटते की हा पुतळा सध्याच्या टाटा कम्युनिकेशन्सच्या जागेवर नसावा. तो त्या समोरील चौकात होता असावा.

धन्यवाद ऋमेषजी, मी लहानपणी माझ्या आजोबांबरोबर बरोबर भाऊ दाजी लाड म्युझियम च्या बाहेर हा , राणीचा पुतळा बघितल्याचे आठवते.