शृंगार मनाचा
मन असते निर्वीकार.
घडवावे ,सजवावे शृंगारावे
तयास जसे ..
ते सजतसे
अन्, शृंगारता भुषणांनी तनाला
दिसते ते बाह्य सौंदर्य
पण , मनाला शृंगारता
वाढे आंतरिक सौंदर्य .
सात्त्विक विचार ,सुविचार
प्रेमळता, माया , दया , क्षमाशीलता
आभुषणे असती मनाची
या भुषणांचे शृंगारण , नटवणे होते
मायबापांकडून बालपणात.
पुढे मानव भुषवतो तयां
जसा वाढतो,
मोठा होतो जीवनात.
तेच असती मनाचे शृंगार
षडरिपू पासून दूर रहाता
मोह ,माया ,मद, मत्सर, काम, क्रोध
मनाच्या कुपीतून काढून टाकता
मन शृंगारिक होते अन्,
सत्व गुणांनी रुप उजळते
साधे सोपे श्लोक दासांचे
तेच येती कामास
मनाच्या शृंगारास
दावा माणुसकी
तोची माना धर्म
त्यातच दडले
जीवनाचे मर्म
याच मनाच्या गुणाने
वाढे मनाचे रुप खरोखर
होतेची मन शृंगारिक
सुंदर अन मनोहर
हाची असे मनाचा शृंगार
ज्याने तनाचा पण वाढे शृंगार
छान.
छान.
खूप सुंदर.
खूप सुंदर.