मुंबई आणि १८५७ चे बंड

Submitted by प्रसाद70 on 14 January, 2022 - 04:07

मुंबई आणि १८५७ चे बंड
१८५७ च्य बंडाच्या वेळी लॉर्ड एल्फिस्टन सारखा धूर्त माणूस मुंबईचा गव्हर्नर होता त्यावेळी मुंबईत फक्त ४०० युरोपिअन लोकांची फौज होती आणि काही भारतीय शिपायांच्या रेजिमेंट होत्या त्यांचा प्रमुख ब्रिगेडिअर शॉर्ट होता .ब्रिटिश ऑफिसर चा भारतीय शिपायांवर पूर्ण विश्वास होता .पण मुंबईतल्या ब्रिटिश सरकारचा मुंबईत राहणाऱ्या मुस्लिम रहिवाशांबद्दल विश्वास वाटत नव्हता .तसेच ६० युरोपिअन पोलीस व भारतीय पोलीस मी . फोर्जेट या पोलीस सुपरटेंडेंट च्या हाताखाली होते . फोर्जेट चा जन्म भारतातला होता तो अँग्लो इंडियन होता .त्यामुळे सामान्य लोकांमध्ये तो अगदी सहज मिसळून जायचा .फोर्जेट देखील धूर्त ,मुत्सद्दी होता .त्याचे खबऱ्यांचे जाळे मोठे होते.वेष बदलून सामान्य भारतीय लोकांमध्ये अगदी सहज मिसळून जाण्यात तो अत्यंत तरबेज होता.एकदा त्याने गव्हर्नर स्टुअर्ट एल्फिस्टन ला आव्हान दिले कि मी तुमच्या परेलच्या गव्हर्नर हॉऊसमध्ये तुम्ही कितीही कडक बंदोबस्त ठेवला तरी मी तुमच्या बिछान्यापाशी येऊन दाखवतो .त्याप्रमाणे एलिफ़िस्टन ने बंदोबस्तात वाढ केली .पण दुसऱ्या दिवशी फोर्जेट झाडूवाल्याच्या वेशात त्याच्या बिछान्यापाशी हजर झाला. फोर्जेट ला माहित होते कि शहरातील लोक शिपायांच्या मदतीशिवाय काहीही करू शकत नाहीत .मुहरम च्या महिन्यात वेष बदलून फोर्जेट मुंबईत रात्रभर फिरत असे .बंडवाल्याच्या बाजूने कोणी सहानुभूतीपूर्वक बोलताना दिसले कि शिटी वाजवून तो पोलिसानंकरवी त्यांना अटक करायचा .यामुळे मुंबईत त्याची दहशत निर्माण झाली . मुहरम संपत असताना च्या काळात सैन्यातील एका ख्रिश्चन ड्रमर ने दारू पिऊन हिंदूंच्या एका मिरवणुकीत गोंधळ घातला.त्याला पोलसांनी अटक करून तुरुंगात टाकले .ड्रमर ज्या रेजिमेंट चा होता त्या रेजिमेंटच्या शिपायांनी तुरुंगावर हल्ला करून त्या ड्रमर ला सोडवले व दोन पोलिसांना पकडून आपल्या बरोबर घेऊन गेले .एक युरोपियन ऑफिसर व चार लोकल पोलीस ,या ड्रमर व पोलिसांना आणायला गेल्यावर शिपायांनी त्यांना विरोध केला या झटापटीत दोन शिपाई मारले गेले. फोर्जेट ला हे समजल्यावर या पाठीमागचा धोका त्याच्या लक्षात आला. त्याने सर्व युरोपिअन शिपायांना एकत्र केले व तो त्या झटापटीच्या ठिकाणी गेला. तिथे शिपाई बेभान होऊन त्यांच्या अधिकाऱ्यांच्या ऑर्डर्स धुडकावून हल्ला करायच्या तयारीत आहेत. फोर्जेट ला बघितल्यावर सैन्याच्या अधिकाऱ्याने त्याला तिथून निघून जाण्याची विनंती केली . पण फोर्जेट ने छावणीचे सर्व दरवाजे उघडून टाकले आणि आपल्या युरोपिअन शिपायसह तिथे उभा राहून "मी तयार आहे" असे जोरात ओरडून सांगितले.शिपायांची अर्थात पूर्ण तयारी नसल्यामुळे ते अचानक शांत झाले .
काही दिवसांनी फोर्जेटने त्याच्या ऑफिसच्या आवारात एक फाशीस्तंभ उभारला .शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांना बोलावून तंबी दिली कि बंडाला थोडा जरी त्यांनी पाठिंबा दिला तर तरी त्यांना फाशी देण्यात येईल .
फोर्जेट ला एकदा समजले कि गंगाप्रसाद नावाच्या व्यक्तीच्या घरी सैन्यातील काही शिपाई जमून गुप्तपणे बैठका घेत आहेत .त्याने गंगाप्रसाद ला ताबतोब अटक केली ,त्याच्याकडून पूर्ण माहिती काढून घेतली .दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो त्या घरी गेला .तिथे भिंतीला असलेल्या एका भोकातून त्याने शिपायांचे सर्व संभाषण ऐकले. सैनिक दिवाळीच्या सणात ऑक्टोबर मध्ये शहर लुटून पुढे सरकणार होते .फोर्जेट च्या या बातमीवर सैन्यातील ब्रिटिश अधिकाऱ्यांचा विश्वास बसेना. तेव्हा फोर्जेट ने मेजर बरो नावाच्या सैन्य अधिकाऱ्याला घेऊन गुप्तपणे त्या घरी गेला.त्यावेळी आपल्याच तुकडीतील सैनिकांच्या तोडून बंडाची भाषा ऐकल्यावर त्याचा फोर्जेट वर विश्वास बसला.
पुढे कोर्ट मार्शल होऊन मंगल गाडिया आणि सय्यद हुसेन या दोन शिपायांना एस्प्लेनेड मैदान (आताचे आझाद मैदान) येथे तोफेच्या तोंडी दिले .सहा शिपायांना आजन्म कारावासाची शिक्षा दिली. या शहीद शिपायांचे स्मारक आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या समोर आझाद मैदानाच्या बाहेर उभारले आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

ईंटरेस्टींग माहिती
मुंबई सुद्धा होती या उठावात हे शीर्षक बघूनच बरे वाटले.

धन्यवाद ऋन्मेशजी ,त्यावेळेच्या काही ब्रिटिश अधिकाऱयांच्या मते मुंबईतील हे बंड यशस्वी झाले असते तर पुढे पुणे, कोल्हापूर ,हैद्राबाद आणि मद्रास इथे ब्रिटिशां चा सहज पराभव झाला असता .

छान

पण भिंतीतील भोकातून ऐकले , तेही दोनदा हे अगदीच नाट्यमय आहे

केम्प्स कॉर्नर च्या उताराच्या शेवटी एका रस्त्याला फॉरजेट स्ट्रीट म्हणून नाव आहे, ते याच अधिकाऱ्यांच्या स्मरणार्थ का?

चला ते नाव बदलूया Happy