स्मितहास्य

Submitted by रघू87 on 13 January, 2022 - 13:35

स्मितहास्य

खूप वर्षांनंतर ते तीघे भेटले
कॉलेज जवळ त्याच जुन्या कट्ट्यावर
काय मग, वेलकम बैक टू इंडीया
त्यातला एक दुसऱ्याला बोलला
तिसऱ्याने केवळ स्मितहास्य दिल
अरे काय... केवढ बदलल रे हे सगळ
दुसरा अगदी भरुन आल्यासारखा बोलला
मग काय,
बघ इथे केवढा मोठा मॉल उभा राहीला.. पहिला
हो ना.. ग्लोबलायजेशन रे ग्लोबलायजेशन .. दुसरा
हो ना.. आणि त्याच मॉलच्या दाराबाहेरील हे भिकारी
ही विषमता हे सुद्धा ग्लोबलायजेशनमुळे ना.. पहिला
अरे पाझरेल आर्थिक विकास हळूहळू.. दुसरा
अरे तो पाझरेल तेव्हा पाझरेल...
पण विकासाचे लाभार्थी तुम्ही.. तुम्ही काही कराल की नाही, आम्ही समाजवादी बघ,
हे करतो, ते करतो
हे देतो, ते देतो .... पहिला
अरे मग आम्हीसुद्धा
हे करतो, ते करतो
हे देतो, ते देतो... दुसरा
इथ दोघांच भांडण सुरू झाल पूर्वीसारखच
तिसऱ्याच लक्ष मात्र दुसरीकडेच होत
तो बघत होता
मॉलबाहेर खाण्यापिण्याच्या स्टॉल शेजारी
भीक मागत रेंगाळणाऱ्या चारपाच वर्षांच्या पोरांपैकी
ती एक चिमुरडी,
मॉलच्या दारातून येणाऱ्या एसीची हवा घेई
आणि पुन्हा जाऊन ओ भैया ओ दीदी करी
तिसरा उठला आणि मॉलकडे गेला
त्या स्टॉलवरुन काहीतरी खायच घेतल
बाजूला एक फुगेवाला होता
त्याच्याकडून एक फुगा घेतला
दोन्ही वस्तू त्या चिमुरडीच्या हातात दिल्या
आणि दिल एक स्मितहास्य
आणि विश्वास ठेवा त्या चिमुरडीनही
त्या बदल्यात दिल
दिल एक गोड स्मितहास्य

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान..