हल्ली मॉल मध्ये आणि online सगळे ब्रँडेड ड्रेसेस असतात त्यातील काही खरंच खूप चांगल्या क्वालिटी चे असतात तर काही नावाजलेले ब्रॅण्ड्स चे कपडे सुद्धा अतिशय सुमार दर्जाचे असतात. मी शक्यतो बिबा चे ड्रेसेस घेत नाही कारण मला ते overpriced वाटतात. पण माझ्या मैत्रिणीने ब्रँड महत्वाचा असतो ग, लुक येतो त्याच्यामुळे असे म्हणाल्यामुळे आणि डिस्काउंट असल्यामुळे मी ५००० चा ड्रेस २२०० ला घेतला. कापड अतिशय सुमार वाटले पण आता ठरवले आहेच तर घेऊ असा विचार केला. पण घरी येऊन घालून बघितला तर पश्चाताप झाला (खूपच ट्रान्स्परन्ट आणि लगेच फाटेल कि काय अशा type चे कापड होते ) अशी quality असून पण फक्त ब्रँड म्हणून बायका घेतातच कसे असे कपडे? असा विचार पण मनात आला. का मी जगाच्या मागे आहे, फॅशन सेन्स वगैरे नाही अस काही आहे ?असे प्रश्न पडले. तुमच्यातील कुणाला असा अनुभव आलाय का? का मला माझी विचारसरणी बदलण्याची गरज आहे.
ब्रँडेड ड्रेसेस च्या खरेदी बाबतीत आपलं काय मत आहे ?
Submitted by मी फुलराणी on 11 January, 2022 - 04:07
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
>>उपाशी लोकांना अन्न/वस्त्र
>>उपाशी लोकांना अन्न/वस्त्र/निवारा पुरविण्याची जबाबदारी कोणत्याच कॅपिटलिस्ट स्टेकहोल्डर्स्ची नसते. तेव्हा आपल्या कपड्याची कशी वासलात लावायची हा सर्वस्वी प्रायव्हेट कंपन्यांचा निर्णय आहे. >>
कपड्याची वासलात लावणे हा प्रकार जाळणे आणि चिंध्या करणे/ लँडफिलमधे जाणे असा दोन्ही प्रकारे केला जातो. सतत नाविन्याचे मागणी करणारा ग्राहक आणि मागणीपेक्षा कित्येक पटीने जास्त केले गेलेले उत्पादन . आपला ब्रँड हा खास आहे असे चित्र कायम राखण्यासाठी उरलेला माल कंपनीला सेलवर विकायचा नसतो, मग उरलेला माल जाळून टाकणे हा सोपा मार्ग वापरला जातो. टॅक्स क्रेडिट्साठी रेकॉर्ड लागते ते दाखवायचे तर माल जाळून किंवा चिंध्या करुन नष्ट झाला हे रेकॉर्ड करणे आले. त्यांच्यासाठी हा कॉस्ट इफेक्टिव(मराठी शब्द?) मार्ग आहे असे सांगितले जाते मात्र त्याची किंमत आपण सगळेच मोजतो. यातले सिंथेटिक कापडाचे कपडे जेव्हा जाळले जातात तेव्हा होणारे प्रदुषण हे अधिकच घातक होते कारण प्लॅस्टिकचे अतीसुक्ष्म धागे वातावरणात पसरतात. लँण्दफीलमधे जे जाते ते तर नष्ट होण्यासाठी शेकडो वर्षे लागतात. पृथीवर रहिवास करणारे सगळेच जण पर्यावरणाबाबत स्टेकहोल्डर आहोत, यात गरीब-श्रीमंत सगळेच आले. जो पर्यंत ग्राहक म्हणून आपण हे चालवून घेणार तो पर्यंत त्यात बदल होणार नाहीये. कपडे सेलवर विकणे हा तात्पुरता उपाय झाला, मुळातच बदल गरजेचा आहे.
>>>>>>.ओ ही प्रपोज्ड मी विथ अ
>>>>>>.ओ ही प्रपोज्ड मी विथ अ १००० कॅरट डायमंड. ही गेव्ह मी अ ४०० $ शनेल बॅग आय नीड अ बर्किन बॅग इन एव्हरी कलर. हे वाचायला किती गोड वाटते. पण प्रत्येक ब्रँडेड वस्तू च्या प्रॉड्क्षन ला एक काळी बाजू आहे.
अमेरीकेत त्या फालतू हिर्यांचे इतके वेड का आहे देवच जाणे. द बिगर द डायमंड, रिचर युअर हबी!!!
याईक्स!!!
डिझायनर क्लोथ्स आवडत नाहीतच. पण ही काळी बाजू माहीत नव्हती. काही मैत्रिणी (खरं तर नातेवाईक) नवर्याशी स्पर्धेत असतात. त्याने डिझाइनर वॉच घेतले म्हणुन मला पाहीजे. काय मठ्ठपणा आहे. खरच.
व्हॅन ह्युसेन ब्रँडचे
व्हॅन ह्युसेन ब्रँडचे शर्ट्स वापरलेत. मस्त होते. कापड, शिलाई, फिटिंग सगळंच. माझ्या साइझचे फार कमी असत पण एक साइझ मोठेही चालून जात. पुढे माझी मापं बिघडल्याने पुन्हा टेलरच्या आश्रयाला जावं लागलं.
व्हॅन ह्युसेनची पँट एकदाच घेतली - दुकानातच ऑल्टर करून .
पिटर इंग्लंड , प्रोव्होग यांचेही माझ्या टेस्टला मानवणारे शर्ट मिळाल्याने वापरलेत.
प्रोव्होगचे शर्ट्स पुढे घरी वापरायला काढल्यावर विरले. कपड्यांबाबत असा अनुभव कधी आला नव्हता.
बऱ्याच ब्रॅण्डसचे कपडे वापरतो
बऱ्याच ब्रॅण्डसचे कपडे वापरतो. शिवून घेणे फक्त सूट घेताना.
टाय फक्त सूट घालतानाच वापरला जातो. माझा शर्ट परफेक्ट साईझ ३९. चाळीसही चालतो. पण जर टाय लावायचा असेल तर गळ्याचं बटन लावावे लागते ते ३९ मध्ये अशक्य आणि ४० मध्ये गळ्याला चिमटा बसतो. आणि ४२ शर्ट घातला तर डगला होतो.
वाईट अनुभव कुठल्या ब्रांडचा लक्षात नाही, पण घेताना कापड हात लावून बघतीले, आतील शिवण बघितकी की थोडा फार अंदाज येतो, क्वालिटी चांगली नसल्यास. त्यातूनही पास होऊन लौकर कापड विरले असा एक दोनदाचा अनुभव आहे, नाव आठवत नाही पण प्रॉव्होग असू शकेल, त्याचा शर्ट आधी घेतला होता आठवते.
<<प्रोव्होगचे शर्ट्स पुढे घरी
<<प्रोव्होगचे शर्ट्स पुढे घरी वापरायला काढल्यावर विरले>>
आणि प्रोव्होग पण विरले ...
नॉर्थ इंडी या मधील मध्यम वयीन
नॉर्थ इंडी या मधील मध्यम वयीन ललना घालत असतील. त्यातल्या त्यात फॅ शनेबल >> नाही हो. (अमा तुमची पोस्ट पहायला खूपच उशीर झाला. हे उत्तर तुमच्या पर्यंत कधीच पोहोचणार नाही ही खंत दाटून आली).
दिल्लीत पहाडग़ंज मार्केट मधे चायनीज च्या शेजारी दोन तीन टेलर्स आहेत. त्यातले काही फक्त फॉरिनर्स ना लुटण्यासाठी बसलेत. पण तिथला एक जेन्युईन आहे. तिथे मध्यमवर्गीय पंजाबी बायका दिसतील. आपली ट्रेन आहे म्हणून सांगितले (तिकीट दाखवायचं) तर आपल्याला गुपचूप शेजारच्या दुकानात थांबायला सांगतात. कधी कधी ट्रेन सुटायला आणि ड्रेस तयार व्हायला एकच गाठ पडते. एक थिएटर होतं तिथे त्याच्या आजूबाजूला सापडेल.
सरोजिनी मार्केट, पालिका बजार इथे तर बजेट असेल तसे ड्रेस मिळतात. करोल बागेत एक होतं पण आता नेमकं कुठे आहे ते आठवत नाही. बहुतेक सेकंड हॅण्ड गाड्यांची लेन आहे त्याच्या जवळपास.
चंदगड भले सतरा सेक्टर मधलं एक दुकान आहे तिथे हिंदी पिक्चर रिलीज झाला कि पहिला शो संपेपर्यंत त्यातला फॅशनेबल ड्रेस शो पीस म्हणून झळकत असतो असं तिथे सांगतात.अतिशयोक्ती असली तरी इतके फॅशनेबल कपडे कुठेच मिळत नाहीत.
त्या बाजूला गेलात तर खरेदीच्या तयारीनेच जा. किंमती पण तशाच फॅशनेबल आहेत. तसे कपडे आपल्या कडे चालत नाहीत जास्त. बावीस सेक्टर मधे मध्यमवर्गीय फॅशन पहायला मिळते. पण बहुतेक मुंबईत यापेक्षा स्वस्त दर असावेत. नॉट शुअर.
अमाँ च्या लिहिण्यात थोडं तथ्य
अमां च्या लिहिण्यात थोडं तथ्य आहे मी पण बिबा चे एक दोन ड्रेस घेतले आहेत त्या म्हणतात तसं उत्तर भारतीय कमी, मध्यम वयाच्या ललना जास्त घालत असतील ,अपवाद असतीलही.मला बिबाचे ड्रेस झमकुडी टाइप्स वाटतात म्हणजे फेस्टिव्ह स्टाइल .वर्क असतं आणि कलरची कपड्याची गॅरेंटी नाही .मी चारपाचदा सणाला वापरला, कलर गेला पण पैसे वसूल झाले इतका छान वर्क वाला ड्रेस होता.
शिवून घेतलेले कपडे आता परवडत नाहीत.ड्रेस ब्लॉउज ची शिलाई खूप महाग आहे ,जेव्हडे कापडाचे पैसे तेव्हडी शिलाई ,त्यामुळे रेडिमेड परवडते.त्यातून कधीकधी ऑनलाईन 1000 च्या आत ओढणीसकट ड्रेस डेलिवेयर साठी मिळून जातो, डील मध्ये.
कोणी ज्यूडियो चे कपडे वापरतं का? तिथला मेकअप आणि कपडे स्वस्त असतात असं ऐकलंय पण क्वालिटी कशी असते?
ऑनलाइन ड्रेसेस अल्मोस्ट सर्व
ऑनलाइन ड्रेसेस अल्मोस्ट सर्व सेमीस्टिच येतात.
ते शिवायला टेलर कुरकुर करतात. पूर्वी एखाद दुसरं गिऱ्हाईक म्हणून रेट मधे घासाघीस करायचे.
आत्ता म्हणतात कि डबल काम पडतं शिवाय नेहमीचं काम राहत. पूर्ण शिलाई देत असाल तर करतो.
दर वेळी नवीन टेलर कुठून शोधणार?
^^कोणी ज्यूडियो चे कपडे
^^कोणी ज्यूडियो चे कपडे वापरतं का? तिथला मेकअप आणि कपडे स्वस्त असतात असं ऐकलंय पण क्वालिटी कशी असते?
नवीन Submitted by सिमरन^^
Zudio चे कपडे मी वापरलेत. छान होते. खूप टिकले. रंग नाही गेले. मी ते star bazaar मधून घेतले होते. रोजच्या ऑफिस वापरातील होते. फार महाग नव्हते.
मेकअप चे काही माहित नाही. तो माझ्यासाठी out of syllabus question आहे.
माझे ऑफिस वेअर सगळे westside
माझे ऑफिस वेअर सगळे westside चे असतात. मस्त डिझाइन आणि टिकतात पण छान... मध्ये libas वरून १ सलवार सूट मागवला होता..ते पण छान निघाला...
माझे ऑफिस वेअर सगळे westside
माझे ऑफिस वेअर सगळे westside चे असतात. मस्त डिझाइन आणि टिकतात पण छान.>>>> माझे पण बहुतांशी वेस्ट साईड. काही शॉपर'स स्टॉप.
हाऊस ऑफ चिकनकारी चे नाव फार झळकत आहे आजकाल इंस्टा वर. खूप महाग आहेत का? कापड कसं आहे?
Pages