सल

Submitted by बिपिनसांगळे on 10 January, 2022 - 10:48

सल - अति लघुकथा
----------------------------

मैत्रिणीचा फोन आला . अन ...
ती आली . आम्ही दोघी त्याच्या घरी गेलो .
त्याला हॉलमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्याला तसं पाहताच डोळ्यांत पाणी साठलं अन मनात आठवणी .
आताही तो कित्ती कूल दिसत होता ! ... तो गेला होता . पण आताही तो कसा शांत झोपल्यासारखा वाटत होता ... वाटलं - आत्ता त्याच्या कुशीत शिरावं अन त्याला बिलगून झोपावं .
आमच्या ब्रेकअप आधी कितीदा तरी मी ...
पण ब्रेकअप झालं नसतं ; तरी ताटातूट ठरलेली होतीच ! नियतीने ठरवलेली .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults