शेवट मात्र मिठीतच, हमसून रडण्यात होतो...

Submitted by देवभुबाबा on 6 January, 2022 - 23:14

पहाटेची कडक थंडी, पाण्यामध्ये कामं ...

बोचऱ्या थंडीतही तिच्या कपाळावर घाम...

हंडा उचलताना तिची लचकली कंबर...

राग काढायचाच तर नवऱ्याचा येतो नंबर...

तोंडाचा पट्टा हळुच चालू होतो...

नवऱ्याच्या घोरण्याने तो वाढतच जातो...

मग आदळतात भांडी, कुंडी, फुटतात काचा...

धडपडत उठतो नवरा, आवरतो वाचा...

शब्दांचा भडीमार वाढतच जातो...

पळणाऱ्या काट्याबरोबर वेळ पळतच जातो...

शेवटी संयमाचा बांध फुटतो...

नवरा तयार होतानाच बायकोवरती खेकसतो...

हळुहळु तिचा आवाज कमी होतो...

कठोर शब्दांची जागा हुंदके घेऊ लागतो...

नवरा जवळ घेऊन तीच सांत्वन करू लागतो...

चकमकीचा हा खेळ रोजच सुरु होतो...

एक दिवस संयमाचा शतक पूर्ण होतो...

रोजरोजच्या कटकटीचा शेवट तेव्हा होतो...

मान अपमानाची सीमा पार होते...

शेवट मात्र मिठीतच, हमसून रडण्यात होतो...

Group content visibility: 
Use group defaults

पण घरी पाण्याचा पंप का नाही बसवून घेत. सब झंझ्टही खतम हो जावे है. ( दिवे घ्या.)

प्रत्येक कपलचे एक स्क्रिप्ट असते त्यात च त्यांना एक्साइट मेंट होउन पुढे जातात. छान प्रांजल कविता.

कठोर शब्दांची जागा हुंदके घेऊ लागतो >> हुंदके घेऊ लागतात किंवा हुंदका घेऊ लागतो - यापैकी एक पाहिजे. कर्ता अनेकवचनी आणि क्रियापद एकवचनी झालंय.

अच्छा. कर्ता 'तिचा आवाज' आहे का? मग ठीकच आहे. पण मग 'कठोर शब्दांच्या जागी हुंदके घेऊ लागतो' असं तरी पाहिजे. की मलाच नीट कळत नाहीये? देवभूबाबा यांनी कृपया अर्थ सांगावा.

ह पा आणि विजयकुलकर्णी साहेब धन्यवाद. ... यमक जुळवण्यासाठी ते एकवचनी केलं आहे. शब्द योग्य साच्यात नव्हता बसत म्हणून तसाच ठेवला. तरीही शब्दाची योग्य मांडणी जमल्यास आवश्यक बदल करेन.