सुखश्रावण..

Submitted by _आदित्य_ on 6 January, 2022 - 14:06

प्रेम जेथे स्पंदते, ते ह्रदय त्याचे घर असे..
स्तब्ध झालेल्या मनाला मुक्ततेचा वर असे !

नेत्र जे पाणावती बघुनी तयाची निर्मिती..
भाग्यरेषा पूर्णतेची त्याच हातावर असे !

मीपणाला पार केल्यानंतरीचा मीपणा...
ही परीक्षा शेवटाची गूढ वाटेवर असे !

लागले रे दीप, अंतर चंद्रपावन जाहले...
जीवनी आता सदा सुखश्रावणाची सर असे !

.................

Group content visibility: 
Use group defaults