Submitted by ऋन्मेऽऽष on 4 January, 2022 - 01:21
आयुष्यात कधी तुमचा पोपट, फजिती, पचका झाला असेल तर न लाजता ईथे लिहा आणि त्या आठवणींना पुन्हा उजाळा देत स्वत:वरच हसून घ्या
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बरं ते एकदा पोपट झाल्यावर
बरं ते एकदा पोपट झाल्यावर पुन्हा "माणुस" बनता येते नां की काही अडचण येते?
ते सरस्वतीचंद्र काका. ते
ते सरस्वतीचंद्र काका. ते सूनेच्या पहिल्या उन्हाळ्यासाठी कारने दापोलीला गेले होते.
माणसाचा पोपट आणि पोपटाचा
माणसाचा पोपट आणि पोपटाचा पुन्हा माणूस हेच तर त्या नियंत्याचे खेळ आहेत ना महाराजा.
सरांनी मौजमजेत एक ब्रह्मसिद्धांतच सांगितला आहे.
हा बरोबर, हेच नाव आठवत होतो
हा बरोबर, हेच नाव आठवत होतो
लै फेमस झालेले काका
सरांनी मौजमजेत एक
सरांनी मौजमजेत एक ब्रह्मसिद्धांतच सांगितला आहे.
व्हय व्हय खरयं. म्या चुकलो सरास्नी बोल लावला...एक डाव.......(धोबीपछाड) माफी असु द्या.
("गोरा म्हनतो गोरी पाहिजे काळाही म्हणतो गोरी...आता तुमीच सांगा पावणं कुटं जातील काळ्या पोरी") (असं गाणं आहे कृपया वस्स्कन अंगावर वॉल्कुन येवु नये)
कामातून मध्येच माबोवर डोकावले
कामातून मध्येच माबोवर डोकावले आणि हा धागा दिसला की डोक्यात
" पोपट झाला रे, पोपट झाला रे..
किस्सा सांगा माबोवरी, किस्सा सांगा माबोवरी
बाफवीर ऋन्मेष सर की जय!"
असं वाजुन जातं.
माझं फेवरेट गाणे
माझं फेवरेट गाणे
माझा नवीन पोपट हा....
एकदम चपखल
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=z6JjY6V4VQY
खतरनाक
याच विषयावरचा याच शीर्षकाचा
याच विषयावरचा याच शीर्षकाचा माझा अनुभव इथेच मायबोलीवर आधी लिहिला आहे.
पोपट झाला रे ... : https://www.maayboli.com/node/39502
ओह!
ओह!
मग वरच्या गाण्यात शेवटी "विनोदवीर मामी मॅम की जय!" हवे खरं तर.
सोबत नेमके ऑफिसचे आयडीही
सोबत नेमके ऑफिसचे आयडीही नव्हते. हे ही काय कमी म्हणून त्याला भलीमोठी दाढीही होती. त्यांनीही मग रिस्क न घेता पोलिस की सिक्युरीटी गार्ड बोलावून त्याला अटक केली >> बिचारा.. अशा प्रसंगात मुलींचं चालून जातं
अरे काय गोंधळ आहे
अरे काय गोंधळ आहे
दोन दोन दोन पोपट उडू लागलेत माबोवर
(No subject)
बिचारा.. अशा प्रसंगात मुलींचं
बिचारा.. अशा प्रसंगात मुलींचं चालून जातं
>>>>
हो, ते देखील आहे. जर मवाल्यांची वस्ती असेल तर स्त्री असुरक्षित असते. जर सभ्य लोकांची असेल तर स्त्रीदाक्षिण्य दाखवले जाते.
मी पहिल्यांदा गडचिरोलीला जायला निघालेलो तेव्हा तिथे नक्षलवाद नक्षलवाद म्हणतात तो नेमका कसा असतो याची बिलकुल कल्पना नव्हती. त्यामुळे माझे मत होते की बायकोला सोबत नेऊ नये. तर बायकोसह घरच्यांचे मत होते की बायकोकडे बघून कोणीतरी तुला दारात उभे करेल, पाणी विचारेल वगैरे..
प्रत्यक्षात अनुभव वेगळाच आला..
तो ईथे वाचू शकता
माझी गडचिरोली सफर - एक थरारक अनुभव.
https://www.maayboli.com/node/33749
"हा हा... नाही हो.. अश्या
"हा हा... नाही हो.. अश्या सत्यकथा स्वताशी घडतील एवढे भाग्य कुठे आपले. पण कथेचा पुर्वार्ध खरा अनुभव आहे.. मनात थोडी धाकधूक होती हे ही खरेच.. सुदैवाने खूप चांगली माणसे मिळाली त्या दिवसात म्हणून भिती निवळत गेली.. पण आधी मात्र नक्षलवाद आणि नक्षलवादी विभागाची भिती मनात असताना असे काहीसे आपल्याशी घडणार असे वाटायचे.. त्याच कल्पनेतून हे उतरले.
Submitted by तुमचा अभिषेक on 26 March, 2012 - 05:24"
आता जे घडलंच नाही, त्यातून पोपट कसा झाला? काल्पनिक पोपट?
अहो फेरफटका त्यातील
अहो फेरफटका त्यातील नक्षलवाद्यांचा अनुभव खोटा आहे. पण ईतर संदर्भ खरे आहेत जे वरील माझ्या आणि म्हाळसा यांच्या चर्चेशी संबंधित आहेत. त्यात पोपट वगैरे काही नाही. स्त्रियांना आणि पुरुषांना येणाऱ्या भिन्न अनुभव आणि भिन्न वागणूकीबाबत ते लिहिले होते.
सरांच्या जुन्या पोस्ट काढून
सरांच्या जुन्या पोस्ट काढून त्यावर सरांना जाब विचारणे याला कायद्याने मनाई करण्यात यावी असा प्रस्ताव मांडतो
सर जे बोलले ते बावनकशी सोनं
मग ते खरे का खोटे लाईक मिळवायला का कमेंट खेचायला असे वर्गीकरण करू नये
सरांच्या दरबारात संशयी लोकांना प्रवेश नाही
सर जुनेच धागे किती गोड मानुन
सर जुनेच धागे किती गोड मानुन घ्यायचे? विकेंड जवळ येवुन राहिला. काहीतरी नवीन
कडक प्रवचन येऊ द्या. भक्त मंडळी ताटकळली बघा. त्यांचा असा अंत नका ना पाहु.
"सरांच्या दरबारात संशयी
"सरांच्या दरबारात संशयी लोकांना प्रवेश नाही" -
ह्यालाच 'संशयात्मा विनश्यति' म्हणतात का?

Submitted by तुमचा अभिषेक on
Submitted by तुमचा अभिषेक on 26 March, 2012 - 05:24"
>>> ????? ऋन्मेष म्हणजेच तुमचा अभिषेक???
आता मात्र हद झाली... किती आयडी आहेत...हे कधीच कळले नसते...
बाकी जाऊ दे, पण मला तरी
बाकी जाऊ दे, पण मला तरी भक्तांचा दरबार सॉलिड आवडला आहे. आता एखादी आरती वगैरे लिहायचे मनावर घ्या.
कोण बोललं रे सरांना ?
कोण बोललं रे सरांना ?
घर विकून कोर्टात खेचीन. सांगून ठेवतोय.
आता मात्र हद झाली... किती
आता मात्र हद झाली... किती आयडी आहेत...हे कधीच कळले नसते...>>>>> कसली हद्द झली? सर हद्द ओलांडुन केव्हाच धाग्याच्या पैलतीरी गेलेत.
आता मात्र माझा खरेच पोपट झाला
आता मात्र माझा खरेच पोपट झाला....
गप्पांच्या नादात मीच तुमचा अभिषेक हे उघड करून बसलो.
आता पोस्ट संपादीत करायची वेळही निघून गेलीय. प्लीज ही खबर या धाग्याबाहेर जाऊ देऊ नका _/\_
एक प्रसंग आठवला. पोपट म्हणता
एक प्रसंग आठवला. पोपट म्हणता येणार नाही कारण पैसे बरेच वाया गेले होते. पण आता बरीच वर्षे झाल्यामुळे ती धार कमी झाली आहे. त्यामुळे हरकत नाही
एका जवळच्या मैत्रिणीचं लग्न रायपूरला होतं. बंगळूर ते नागपूर फ्लाईट, नागपूर ते रायपूर ट्रेन. येताना परत रायपूर ते नागपूर ट्रेन आणि पुढे फ्लाईट असा प्रवास ठरवला. दोन्ही वेळचा ट्रेन प्रवास रात्रभराचा होता. जातानाचं फ्लाईट तिकीट आणि ट्रेन तिकीट एकाच तारखेचं. येतानाचं मात्र फ्लाईट तिकीट दुसऱ्या दिवशीचं काढायला हवं होतं ते आम्ही चुकून त्याच दिवशीचं काढलं.
येतानाचा ट्रेनचा प्रवास व्यवस्थित झाला. नागपूर विमानतळावर पोचलो. चेक इन करायला गेलो तेव्हा तो बाबा म्हणाला, तुमची फ्लाईट आधीच मिस झाली आहे. हे कालचं तिकीट आहे! नवराबायकोमधले हेल्दी संवाद, संयमित चर्चा वगैरे सार्वजनिक ठिकाणी जेवढ्या आणि जशा करणं शक्य होतं तेवढ्या झाल्याच. असो!
आणखी एक तिकीट तारखेचा घोळ
आणखी एक तिकीट तारखेचा घोळ
नवराबायकोमधले हेल्दी संवाद, संयमित चर्चा वगैरे >>> हे अगदीच रिलेट झाले. आमच्यात ज्याची चूक असेल तो मान खाली खालून घटनास्थळाहून गपचूप पसार होतो. कारण दुसर्याचा तात्काळ स्फोट होणार हे ठरलेलेच.
एक हृदयाला चटका लावणारी गोष्ट
एक हृदयाला चटका लावणारी गोष्ट या संदर्भात
मी आणि बायको धरमशाला डलहौसी ला गेलो होतो
येताना ट्रेन रात्री 12.30ची होती
त्यामुळे तिकीट एजंट ने बजावून सांगितले होते की तिकीट जरी 20 तारखेचे असले तरी 19 ला रात्रीच स्टेशन वर जायचं आहे
त्याप्रमाणे आम्ही गेलो आणि एक विदारक दृश्य दिसले
एक कुटुंब नवरा बायको आणि 3 मुले आर्थिक परिस्थिती अगदीच बेताची होती हे समान आणि कपड्यावरूनकळत होते
नवरा अक्षरशः ढसाढसा रडत टीसी च्या पाया पडत होता
बायको पदर पसरून होती आणि ती तीन पिल्ले कावरीबावरी होऊन बघत होती
मला राहवेना म्हणून चौकशी केली तर कळलं त्यांची ट्रेन 19 ची होती म्हणून ते 19 आलेले पण ती आडले दिवशी रात्रीच गेलेली
आणि आता बिचार्यांकडे ना तिकीट काढायला पैसे, आणि जे तिकीट काढलेला ते गेलंच
बापरे, काय वेळ आली ही
बरे माझ्या हातातही काही नव्हतं 5 जणांचे तिकीट काढतो म्हणलं तरी ते मिळणार नव्हते आणि दंड किंवा जास्तीची रक्कम भरून टाकण्याऐवधी माझी तेव्हा आर्थिक ताकद नव्हती
मला तर एसी 3 चे पण परवडत नव्हते त्यामुळे आम्ही सध्या जनरल च्या डब्यातूनच गेलो होतो
त्यामुळे कितीही इच्छा असली तरी त्यांना मदत करणे शक्य नव्हते
बायको ने तरी त्यातल्या त्यात पोरांना बिस्कीट चे पुडे दिले हातात
अरेरे! रात्रीच्या वेळांचा हाच
अरेरे! रात्रीच्या वेळांचा हाच गोंधळ उडतो.
माझ्या मनात नंतर हेच आलं की आपलं जर ट्रेनचं तिकीट चुकलं असतं तर ऐनवेळेस काही दुसरं मिळालं नसतं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी वेळेत नागपूरलाही पोचलो नसतो तर काय?
ऋन्मेषच्या मूळ अनुभवावरून अजून एक किस्सा आठवला. एका मैत्रिणीचा. तिची डिलिव्हरी पुण्यात झाली आणि नंतर दोन तीन महिन्यांनी ते बंगळूरला येत होते. तर तिच्या नवऱ्याने सकाळी साडेअकराचं समजून जे तिकीट काढलं ते रात्री साडेअकराचं होतं. हे त्यांना आदल्या दिवशी वगैरे लक्षात आलं. आता काय करणार, मग बाळ, मोठी मुलगी, हे दोघे, सासूसासरे असे सगळे रात्री एअरपोर्टवर गेले. तिथे गेल्यावर कळलं की फ्लाईटला उशीर होणार आहे. रात्री दीड की दोनला शेवटी विमानात बसले! पहाटे इथे त्यांच्या घरी पोचले. आधीच लहान बाळामुळे झोपेची ऐशीतैशी झालेली, वर आणखी हा व्याप.
अरेरे! रात्रीच्या वेळांचा हाच
अरेरे! रात्रीच्या वेळांचा हाच गोंधळ उडतो. >>> अगदी हेच मनात आले. बारानंतरच्या वेळा नेहमीच तारखेत फसवतात
Pages