बोलके आहेत हे डोळे तुझे

Submitted by सुप्रिया जाधव. on 29 December, 2021 - 00:51

विस्तवावर बांधले पोळे तुझे
शेवटी केलेस वाटोळे तुझे

विभ्रमांवर भाळले होते खरी
केवढे होते नयन भोळे तुझे !

मोकळे केलेत दोन्ही हात घे
काढ तू तोंडातले बोळे तुझे

सांगती शब्दाविना सांगायचे
बोलके आहेत हे डोळे तुझे

केवढी दमतेस ओझे वाहुनी
बोलती पायातले गोळे तुझे

सुप्रिया जाधव लाखे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users