निरागस !!!

Submitted by मनाली कुलकर्णी on 17 December, 2021 - 09:08

निरागस !!!
प्रॉब्लेम काहीच नाहीए,

आत्ताही नाहीए तेव्हाही नव्हता,

पण काहीतरी चुकतेय,

किंवा चुकलंय,

ऑफिस च काम संपलं थोडं रिकामा झालो होतो,

सहज म्हणून FB उघडलं,

बायकोच्या म्हणजेच अनु च्या एका मैत्रिणीने मेमोरी टाकली होती,

खूप प्रसन्न वाटत होती अनु,

मोठे मोठे डोळे उत्साह ओसंडून वाहणारे,

ते हसू खूप निरागस होत,

त्याच निरागस हास्यावर मी भुललो होतो ना?

हो ना त्याच वर,

तिने माझ्यात काय पाहिलं पण?

जे पाहिलं ते खरंच होत का?

लग्नानंतर काय अपेक्षा होती तिची,

वेळ?

एकमेकांसोबत? का नाही दिला मी?

घरात आल्यापासून फक्त आणि फक्त तिचे कर्तव्य,

माझ्या बहिणीची लग्न झालेले असूनही नुसती माझ्याच घराचं लक्ष,

त्यात तात्या म्हणजे वडील त्यांनाच दुजोरा देणारे,

पहिले एक वर्ष शांतपणे घ्यायची ती,

नंतर तिची खूप चिडचिड व्हायला लागली होती,

किती वेळा तिने डायरेक्ट सांगितलं मला,

मी मात्र साफ दुर्लक्ष केलं,

नंतर नंतर तिची चिडचिड ही कमी झाली आणि घरातली संसारातली इच्छा पण,

त्यासोबत तिचे हे निरागस हसू,तो उत्साह सगळंच हरवलं मी,

आठवत एकदा ती बोलली होती आई बाबा ना थोडे दिवस तरीगावी जाऊदेत,

इच्छा तरी काय होत्या तिच्या एखादी पाणीपुरी एकत्र किंवा एका डिश मधली भेळ,

ही ही मी दिल नाही,

माझ्या बहिणींना आता मुलं झाली आहेत त्यांच्यात त्या पूर्ण व्यस्थ झाल्या आहेत,

पण हिच्या मात्र इच्छा अजूनही पूर्ण झाल्या नाहीत,

आजही तिचा संसार तिला मिळाला नाहीए,

आई वडिलांच एव्हडं वय झालेय पण अजूनही त्यांचा हेका सुटत नाहीए,

आणि मी आजही माझ्या बायकोला माझं बनवू शकलो नाहीए,

तिला मी घडवलं तर नाही पण जशी होती तसाही राहू दिल नाही,

पण आता मी सुधारणारे तिचा निरागस हसू तिला देण्याचा प्रयत्न मी करणारे.

आणि मला माहितीय ती तशीच मूकपणे मला साथ देणार आहे.....

I Love you अनु!!!

@ किर्ती कुलकर्णी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

एकदा ती बोलली होती आई बाबा ना थोडे दिवस तरी गावी जाऊदेत,.....

>>> शहरात राहणाऱ्या जोडप्याला एक प्लेट पाणीपुरी एकत्र खाता येऊ नये ह्यात *त्याचीच* काहीतरी चूक आहे

छान कथा! आवडली...
पुढील भागाला स्कोप आहे, लिहीत रहा!

रिलेट झाली, coz kinda my story. ३ वर्षांचा तुकड्यातुकड्यातला संसार, त्याचा वेगळा आणि माझा वेगळा.