" समजूत "

Submitted by रश्मिनतेज on 13 December, 2021 - 06:22

जरी नाहीस समोर तू, कायम सोबत असतेस तू ..
एकांत रात्री ही सरतात सहज, कारण स्वप्नांमध्ये असतेस तू !

माझ्या ध्यानी मनी वसतेस तू, सुंदर विभ्रम करतेस तू ..
कल्पांती नेतील प्रेमदूत माझे, मला मोहित करतेस तू !

वाऱ्याच्या झुळूकेबरोबर येतेस तू ,
आरशातही पाहताना दिसतेस तू ..
पण प्राण अडकतो श्वासात,
जेव्हा अवचित कधी दिसतेस तू !

अव्यक्त राहूनही जिंकतेस तू, कधीही कशीही आवडतेस तू ..
कोरडी पडली होती जीभ सांगताना, "मला खूप आवडतेस तू" !

थोडी गडबडलीस तू, तरीही माफी मागत होतीस तू ..
"मला नाही जमणार" सांगताना, मात्र निर्विकार होतीस तू !

खरी आहेस समजदार तू, माझ्या नकळत मला सांभाळतेस तू ..
हळुवार जपल्या हळव्या नात्यांचे, नवे आयाम सांभाळतेस तू !

Group content visibility: 
Use group defaults