चित्रपट कसा वाटला - ५

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2021 - 15:18

चित्रपट कसा वाटला ५ व्या धाग्यात स्वागत

आधीचा धागा ईथे बघू शकता

https://www.maayboli.com/node/74596

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्यांना मुलांबरोबर मूव्ही पहायचे असतात त्यांनी ' विकी & मिस्टरी' सिनेमा पहा. मुळ फ्रेंच आहे, पण इंग्लिशमध्ये पण आहे.

एका छोट्या मुलीची आई गेल्यावर ती बोलणं बंद करते. तिला मानसिक धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी तिचे सर्जन वडील तिला त्यांच्या लहानपणीच्या घरी एका खेड्यात घेऊन येतात. तिथे एक शेतकरी तिला कुत्र्याचं पिल्लु भेट देतो आणि ती परत हसायला बोलायला लागते. नन्तर कळतं की ते पिल्लु कुत्रा नाही तर वुल्फ आहे.

साधीशी कथा आणि अप्रतिम सुंदर फ्रान्समधील खेडं. मला मुव्ही आवडला.

लॉर्ड ऑफ द रिंग्ज चे एक्सटेंडेड कट्स कुठे मिळतील? >> अ‍ॅमेझॉनवर आहेत. शक्यतो 4K version घ्या... Worth every penny. Happy
The Hobbit Trilogy पण मला आवडली, विशेषतः दुसरा भाग. LOTR चा prequel आहे, पण कंपेअर न करता बघितली, प्लस आपली आवडती कॅरेक्टर्स पुन्हा बघतांना मजा येते. Happy

मीरा तो वूल्फ मरतो का शेवटी.. >>>> नाही मरत. टेन्शन मोमेंट्स येतात, पण शेवट छोट्या मुलांना पचेल असा आहे. दुःखी नाही.

काल प्राईमवर पुष्पा पाहिला वीथ सबटायटल्स तेव्हा कुठं पुर्ण पिक्चर समजला.आधी थिएटरमध्ये (तेलुगू) पाहिला तेव्हा फक्त अल्लु अर्जूनच बघून आले होते Wink

मस्त अभिनय केलाय अल्लू ने !
रगील पण दिल का सच्चा .
त्याला श्रेयस तळपदे नी दिलेला आवाज पण मस्त सूट झालाय .
लाकडाच्या मिल मध्ये काम करत असताना अल्लू खुर्चीवर पायावर पाय टाकून चहा मध्ये पाव बुडवून खात असतो , मालक आला तरी सरळ बसत नाही .
मॅनेजर कान उघडणी करतो तर ये अपुन का पैर है , दुसरा वाला भी अपुन का है फिर उसके लुंगी में मिरची कायकु लगी ?
मुझे काम करने के पैसे देता है कि इज्जत देणे के ?

आख्या मुव्ही मध्ये असेच छोटे पण सर्किट डायलॉग Happy

पुष्पा ची इतकी हवा होऊन सुद्धा सुरवातीला दोन तीन दिवस त्याच्या गेट अप मुळे मुव्हीपाहण्याची ईच्छा होत नव्ह्ती , पण त्या डॅशिंग हिरो ने जंगलातील गावट्या पावट्या पण रगील पुष्पा मस्त उठवलाय .

डोन्ट लुक अप .
आज उद्या नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन सुरळीत झाले की बघणार आहे.

विकी अॅण्ड हर मिस्टरी खूपच गोड सिनेमा आहे. मिस्टरी कसला गोड आहे!! >>>> कुठे पाहिला ते लिहीत जा रे ...

मल्याळम
1.Kumbulangi nights (चार भावांची कथा)
2.Kettyolaanu Ente Malakha - (पती पत्नीच्या नात्याची हळूवार उलगडणारी वेगळीच कथा)
3.Trance -
4.Emmanuel (हलकाफुलका मामुट्टी आणि फहाद फासील चा सिनेमा)
5.Kuruthi (सस्पेन्स, थ्रीलर, खिळवून ठेवणारे)
6.Cold case (मर्डर मिस्ट्री)
7.Home ( ज्ये.ना, गैजेट्स आणि नाती, निसर्ग यांची सुंदर गुंफण )
8.joji ( सस्पेन्स, थ्रीलर )
9.Android kujjapan 5.1 (रोबो एज अ इमोशनल एडिक्शन.मस्त)
10.aanum pennum (तीन जनरेशनच्या स्त्रीयांच्या तीन वेगळ्या कथा एकाच विषयाभोवती असलेल्या)
11.drishym 2
12.priest
13.malik ( थ्रीलर फहाद फासील जबरदस्त एक्टींग)
14.Helen ( फ्रीजर रूममध्ये अडकलेल्या युवतीची सर्वयावल कथा)
15.Artist
16.c u soon ( पूर्ण पिक्चर ऑनलाइन फॉरमॅट मधे)
17.Erida (सस्पेन्स, थ्रीलर, मर्डर)
18.kala (भयानक रक्तपात, थ्रीलर सिनेमा, मेसेज ओरिएन्टेड)
19.Arrakariyam (सुरुवात संथ, पुढे उलगडत जाते कथा)
20.koshiyam ayyapam ( दोन व्यक्तीमत्वांची जबरदस्त जुगलबंदी)
21.joseph (मर्डर मिस्ट्री)
22.abhasam
23.Lucifier

तमिळ
1.asuran
2.jai bheem
3.karnan
4.oru kuppai kathai ( एका कचरा गोळा करणार्याची स्पर्शून जाणारी कथा )
5.baaram (ऑनर किलींग)
6.periyerum perumal (थ्रीलींग,crime)
7.soorarai poturu ( hindi- udaan)
8.Theeran
9.Bigil
10.Duruvangla pathinaru (इनवेस्टीगेशन)
11.sarpatta parambarai
12.udanpirrappe (कौटुंबिक)
13.kodiyan oruvan ( सामाजिक)
14.Ratchasi (शैक्षणिक)
16.Puthum pudhu kalai (लॉकडाऊनमधे घडलेल्या पाच कथा)
17.Anbe sivam (आवडलेला सुंदर सिनेमा, जुनाच आहे)

कन्नड
1.Dia (ट्रैजेडी लव स्टोरी, फुल्ल मार्क्स )
2.Birbal ( मर्डर इनवेस्टीगेशन)
3.Sitharam binoy case no.18 (सीरीयल किलींग इनवेस्टीगेशन)
4.Nanna prakara (इनवेस्टीगेशन)
5.ikkat (लॉकडाऊन पार्श्वभूमीवर, हलकाफुलका धमाल विनोदी सिनेमा)
6.love mocktail ( हलकाफुलका तरीही इमोशनल करणारा लवस्टोरीपट)

तेलुगू
1. Evaru (सस्पेन्स, थ्रीलर)
2.Tuck jagadish (कौटुंबिक)
3.Hit (इनवेस्टीगेशन)
3.Agent sai shriniwasa athreya (डिटेक्टीव्ह)
4.vakeel Saab (पि़क हिंदी चा रिमेक)
5.Gang leader ( हलकाफुलका नानीचा सिनेमा)
6.Brochevarevarura
7.paagal (लव स्टोरी)
8.Narappa (असुरन चा रिमेक)
9.30 rojulu premichanadama ela (दोन जन्मांची लवस्टोरी, जुना मराठी वर्षा उसगावकर, अशोक सराफचा मराठी सिनेमा होता आत्मा इंटरचेंजवाला,त्या टाईप,हलकाफुलका)
10.care of kancherpalem (चार लवस्टोरीज पैरलली, मस्त)
11.A (ad infinitum) (सस्पेन्स, टाईम ट्रैवल नाही म्हणता येणार पण तसंच काहिसे)
12.Arvinda sametha veer raghawa (ऐक्शन,इमोशनल)

मागच्या वर्षांत प्राईमवर बघितलेले सिनेमांची यादी
आठवेल तशी लिहून काढली.

इंग्रजी
Dont breath
​get out
​unhinged
​kidnap
​the call
​source code
​the tomorrow war
​elysium
​shutter island
​inception
​in time
​forest gump
The terminal
​curious case of Benjamin button
​cast away
​hillas have an eyes
​conjuring 1,2
​annabele,creation,comes home
​nun
​jungle cruise
​wonder women 1984
​mad max furrry road

पुष्पा ठीक आहे
जंगल आणि म्युजिक मस्त आहे

पण सुरुवातीला रक्तचंदनापासून सुरुवात होते , मध्येच चंदन गायब होते आणि शेवटी फक्त रक्त उरते

Proud

बॅक ग्राउंड आणि शेवटचे सॉंग चक्क मधुकंस रागात आहे, असे वाटते,

सेकंड पार्ट चालेल असे वाटत नाही
शेवटी आलेला इनिस्पेक्त्तर बुद्धिमान कमी आणि विनोदी जास्त वाटतो, त्याच्या जीवावर सेकंड पार्ट असेल तर मुश्किल आहे

शेवटी आलेला इनिस्पेक्त्तर बुद्धिमान कमी आणि विनोदी जास्त वाटतो, >>>>>> त्याची ती व्हिलनगीरीची स्टाईल आहे.
त्याचे मल्याळम वर लिस्टलेले, कुंबांलागी नाईट्स, जोजी, ट्रान्स, इमान्युल,आरटिस्ट, मलिक सिनेमे पाहिलेत.
मला आवडते त्याची एनर्जेटिक ऐक्टिंग.
मलिक मध्ये तर पंचवीशीचा तरूण ते पन्नाशीचा गैंगस्टर भारी एक्टींग केलीए.
#हे माझे मत बरं का. Happy

'डोन्ट लुक अप' नेटफ्लिक्स वर बघितला, धमाल आहे. मेरिल स्ट्रिप, लिओ, जेनिफर लॉरेन्स, केट ब्लँचेट अशी तगडी स्टारकास्ट आहे . वास्तववादी, विनोदी, गंभीर सगळेच आहे.

मृ सगळ्या यादीतून टॉप ३ दे ना... एवढे सिनेमे नाही बघून होणार पण निदान महत्त्वाचे... (फार डोक्याला शॉट असे वैचारिक किंवा भुताचे नको).

हे सगळे प्राईमवर आहेत ना मृ ?
होम व शटर आयलंड लक्षात होता. सध्या एवेंजर मुव्ही मेरेथॉन चाललय.

नवनीत गाईड ची सवय जात नाही हा! Lol Wink
बेस्ट लिस्ट. धन्यवाद. भारतीय इतर भाषेतले सिनेमे बघितले जात नाहीत, आता बघतो.

अरे तिने ७० सिनेमे दिले आहेत. म्हणजे जवळ जवळ २०० तास ... ५ युनिट्चा एखादा कोर्स करावा एवढं मटेरियल भस्सकन दिल्यावर..... .

Lol अमितव
हो सगळे प्राईमवर आहेत.

सी, इक्कत,कन्नड - हलकाफुलका हसून हसून पुरेवाट होईल.
आन्नुम पेन्नुम- 3 शॉर्ट स्टोरीज.डोक्याला नो शॉर्ट
. Puthum pudhu kalai हा पण बघू शकते सिंपल आहे.

Don't Look Up धमाल आहे. प्लॅटिनम स्पॉन्सर डोनरला थेट नॅशनल सिक्युरीटी ब्रिफिंग मधे प्रवेश Happy

नेटवरची हवा बघून काल "पुष्पा" थोडासा बघितला (तेलुगू - विथ सबटायटल्स). जेमतेम २०-२५ मिनीटे बघितला आहे पण इतका एंगेजिंग वाटला नाही. भाषेची अडचण वगैरे धरूनही. त्याची कामावरची गुर्मी बघून लावारिस मधला अमिताभ आठवतो.

बाय द वे, साउथ च्या हीरोंना इतर शहरांत अचानक प्रचंड आणि व्होकल फॅनबेस मिळालेला दिसत असेल तर त्याचे कारण इथे सापडेल. RRR च्या निर्मात्याने जवळजवळ २-३ कोटी खर्च नुसता असले पब्लिक विविध शहरात फिरवायला केलेला आहे Happy

Don't Look Up (नेटफ्लिक्स) आवडला. कॅरेक्टर्स कुणाला मिमिक करतात हे एकदा लक्षात आले की धमाल येते. शेवटही वेगळाच, ( आवडला असे म्हणू शकत नाही ) शेवटच्या काही मिनिटांतले आपापल्या कॅरेक्टर ग्राफप्रमाणे प्रत्येकाचे वर्तन नक्कीच विचार करायला लावते. मुलांनी अजून एक movie end version सुचविले. Happy पुढील पिढी आपल्या भविष्याविषयी सजग आहे, हे पाहून बरे वाटले.

Pages