पुन्हां एकदा हरवायचंय तुझ्यात...

Submitted by सुर्या--- on 8 December, 2021 - 23:37

पुन्हां एकदा हरवायचंय तुझ्यात, तुझे हसु होऊन...

माझ्या स्वप्नांना पहायचंय तुझ्यात, तुझे स्वप्न होऊन...

हातात हात घेऊन आपण, दूर दूर जाऊ...

क्षितिजाच्याही पलीकडले, आभाळ आपण पाहु...

इंद्रसभेचे प्रेक्षकही, मंत्रमुग्ध होतील...

काळोखाला दूर सारुन, चंद्र तारे होऊ...

पुन्हां एकदा हरवायचंय तुझ्यात, तुझे रुप होऊन...

आरश्यासवे रमायचंय तुझ्यात, तुझे प्रारुप होऊन...

तू न्याहाळशील स्वतःलाच, वारंवार क्षणात...

तुझेच रुप साठवशील डोळ्यांत, आणि माझ्या मनांत ...

लाजशील आणिक पुन्हा वळून, पाहशील क्षणिक...

प्रतिबिंबात चमकतील तुझ्याच, सौन्दर्याचे माणिक ...

पुन्हा एकदा हरवायचंय तुझ्यात, तुझे प्रेम होऊन...

माझे आयुष्य जगायचंय तुझ्यात, तुझे प्रेम होऊन...

तु समजशील मला, तु खूप खुळा आहे...

खरचं आहे दुनियेसाठी, मी खुळखुळाच आहे...

तु ही खेळ या मनाशी, तासनतास आवडीनेच...

मलाही आवडेल, खेळणं होऊन हसेन सवडीनेच...

Group content visibility: 
Use group defaults