भेटतो जो कुणी आपुला वाटतो

Submitted by द्वैत on 26 November, 2021 - 10:04

भेटतो जो कुणी आपुला वाटतो

भेटतो जो कुणी आपुला वाटतो
का तरी मी मला एकटा वाटतो

बांधली ही कुणी सावल्यांची घरे
हा सुखाचा नवा सापळा वाटतो

हा भला वाटतो हा बुरा वाटतो
चेहरा चेहरा आरसा वाटतो

अंगणी थांबला चांदण्यांचा थवा
आठवांचा जुन्या सोहळा वाटतो

ह्या ठिकाणी कसा मी रमू लागलो
काळजाचा तुझ्या कोपरा वाटतो

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

द्वैत खूप भारी आहे ही गझल.
सरळ साधी इतकी की तुम्ही वैभव जोशी यांचे Alt account आहात की काय असं वाटलं Proud

हा भला वाटतो हा बुरा वाटतो
चेहरा चेहरा आरसा वाटतो

---> हरेक चेहरा जर का आरसा वाटत असेल तर मग भला बुरा असा काही प्रश्नच उद्भवत नाही ना? सानी मिसरा उत्तम आहे. पण शेर तितकासा कळला नाही हा :\