सारीपाट

Submitted by मी_आर्या on 24 November, 2021 - 04:48

kanha.jpg
मी: हे काय चाललय तुझं ? का गाल फुगवून बसला आहेस? रुसूबाई! ४ दिवस झाले पाहतेय.
तो: नाहीतर काय? आजकाल इन्ग्नोर करतेस तु मला. . रोज कामावर जातांना देवांना नमस्कार करतेस तेव्हा माझ्याकडे बघतही नाही, कि पुर्वीसारखं "चल कान्हा, माझ्याबरोबर..." असेही म्हणत नाहीस.
मी: अरे किती गडबडीत नमस्कार करते देवांना माहित आहे ना. तुला दिसतेच की माझी सकाळची घाई. अन सगळ्या देवांना केला म्हणजे तुलाही पोचला की. "... केशवं प्रतिगच्छति" म्हटलंच आहे ना!
तो: पण ते मनापासून नसत ना, किती विचार डोक्यात असतात? मी असतो का तेव्हा मनात? फक्त संध्याकाळी एकदा माझ्यासमोर विष्णुसहस्त्रनाम म्हटलं, दूध दिले की झालं का तुझ काम?
मी : अरे मनात आहेच ना तू! पण डोक्यात नाना विचार असतात. ऑफिसात पोचल्यावर काय काय कामे करायची लिस्ट असते. घरातून निघतांना ट्रॅफिकची चिंता, रस्त्यातले खड्डे, पसरलेली खडी , १२ किमी अंतर तुडवायचे आहे हे सगळं मनात असत.
तो: मनात असलो तरी कुठेतरी एका कोपर्यात गुपचूप बसलेला असतो. आणि हे सगळं ट्रॅफिकचे माझ्यावर सोपव ना तू. तू का काळजी करतेस! एकदा माझ्या हातात गाडीचे सुकाणू दे.. मी अलगद पोचवतो तुला बघ. आणि हा अनुभव आहे तुला. तरीही दर वेळी विसरतेस.
मी: हो रे राजा... पण कामांच्या लिस्टचे काय?
तो: नाहीतरी तू करतेसच काय.. सगळी कामे मी करतो तुझी. घरातली, बाहेरची ...
मी: ए, अरे ! काहीही काय बरळतोस. सकाळी ६ ला उठल्यापासून ते रात्री ११ पर्यंत हात रिकामा नसतोय माझा. अन मी करतो म्हणे!
तो: परत 'मी' 'मी'? वेडाबाई.. आठव की! तुझ्या हातून सगळं करणारा मीच. तू नुसती कठपुतळी. चराचरावर माझी सत्ता,,झाडाचे पानही हलते माझ्यामुळे. तर तुला कठपुतळी सारखे नाचवणार नाही का! सकाळी चपात्या लाटतेस तेव्हा हात तुझे, पण त्यामागे शक्ती माझी. एवढेच काय.. ऑफिसात बदाबदा ईमेलामेली खेळतेस तेव्हा टाईपणारे हात तुझे, मेंदु तुझा ... पण हे तुला सुचवणारे कोण?
मी: ए हॅ ! सुचवणारे कोण म्हणे! तुझी उडी फक्त संस्कृत भाषेपर्यंत. तुला काय कळतंय इंग्रजी! तुझी गोष्ट द्वापारयुगातली. जग पाहिले का किती बदललय? ४लाख, चौषष्ठ हजार वर्षे उलटुन गेलीत महाराज.
तो: आकडे नको फेकुस हा, आकडे! . त्या आकड्यांच्या पलिकडे आहे मी. अन मला वाटलंच तू अशी शंका काढणार.
मी; वाटलं काय? तुला काय कळतंय , ....
तो: तुझ्या मनात काही येण्याआधी मला कळतंय. तू आता काय बोलणार, लिहिणार, टाईपणार हे मला कळतंय. भाषेचा जिथे उगम होतो तिथे मी आहेच. त्यामुळे हे संस्कृत, हे फ्रेन्च , हे स्पॅनिश अस द्वैतातले बोलु नकोस.
मी: ऑ
तो: तो हॅरी पॉटर सिनेमाच्या पहिल्या भागातला बुद्धिबळाचा पट आठवतो का? जस्ट इमॅजिन.. तसे हे जग म्हणजे आमच्या सारीपाटाचा विस्तिर्ण पट अस डोळ्यासमोर आण.
मी: बरं, पुढे?
तो: त्याच्या एका बाजुला मी अन एका बाजुला 'प्रकृती' बसलोय अस समज.. आणि तुम्ही सगळे इन्क्ल्युडींग तरुवेली, प्राणी पक्षी , सजीव निर्जिव म्हणजे आमच्या सोंगट्या.
मी: काहीतरीच तुझ!
तो: गंमत बघ आता! मी ही तुझी सोंगटी हलवली... हे बघ तु निघालीस ऑफिसला गाडीवर. ही मधे वळणे, सिग्नल.. बघ ती गाडी आडवी आली. तु मनातल्या मनात शिव्या घालत करकचुन ब्रेक लावलास... आता परत निघालीस, मागचा गाडीवाला पुढे जाउ नये म्हणुन जीव खाउन पुढे निघालीस....! आता घरात बघ, तुझं पोरगं तुझा पाय घराबाहेर पडल्याबरोबर टिव्हीचा रिमोट घेउन बसलेय बघ. या तुझ्या भावाची सोंगटी मी उचलुन ऑस्ट्रेलिया खंडात पाठवली बघ!

मी: बास बास्स... कळलं बर! म्म्हणजे थोडक्यात, आम्ही नुसते रेल्वेत बसायचे... गार्ड तुच, ड्रायव्हर तुच! तुझ्या मनात आलं तीथे तु आमची पटरी बदलणार अन आमची गाडी दुसर्या ट्रॅकवर टाकणार! म्रग जर सगळं तुच करतो आहेस, तर हातावर हात धरुन बसाय्चे का आम्ही? 'ठेविले अनंते ...' म्हणत..
तो: अस कुठे म्हटले मी, प्रयत्न करा की तुम्ही. बाकी त्याचे फळ माझ्यावर सोपवा. माझ्या इच्छेनुसारच घडणार.. तुम्ही कितीही उड्या मारा.
मी: हॅ, म्हण्जे तु सांगशील तसे नाचायचे आम्ही. अन "मी केल, मी केलं," म्हणाय्चे नाही. जे घडेल त्याला क्षणोक्षणी तुला आठवत... 'तुझी इच्छा, तुझी इच्छा' घोकत रहायचं.
तो: ऑफकोर्स! Lol कळलं आता?

माटी को पुतरा कैसे नचत है ।।
देखै देखै सुनै बोलै दउरिओ फिरत है ।। १ ।। रहाउ ।।
जब कछु पावै तब गरब करत है ।।
माया गई तब रोवन लगत है ।। १ ।।
मन बच क्रम रस कसहि लुभाना ।।
बिनसि गया जाय कहुँ समाना ।।२।।
कहि रविदास बाजी जग भाई ।।
बाजीगर सउ मोहे प्रीत बन आई ।।३।।६।

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy
छान लिहिलस, असा संवाद चालू राहिला तरी पुरेल; "त्यात्या"शीच नव्हे त इतरांशीही!

यातलं >>>प्रयत्न करा की तुम्ही. बाकी त्याचे फळ माझ्यावर सोपवा.<<<हे जरा अजून सविस्तर लिहिलस तर? म्हणजे तुम्ही जसे प्रयत्न कराल त्यावर कोणतं फळ द्यायचं हे "तो" ठरवेल असं? म्हणजे जरा तरी प्रयत्नवाद चालू राहिल!

लिहित रहा, संवाद साधत रहा!

बाकी तात्विक मुद्यावर आपण दोन टोकावर आहोत हे तुला माहिती आहेच Wink