सगळेच वाडे चिरेबंदी

Submitted by 'सिद्धि' on 21 November, 2021 - 12:12

सगळेच वाडे चिरेबंदी,
पलंग-सोफ्यावर मोर बसले.

सार्या फळ्या लाकडाच्या,
झडपे शिवाय तावदान कसले.

स्वयंपाक घर संगमरवरी,
बंद तिजोरी, खुला देव्हारा वगैरे वगैरे चोचले.

कष्ट काढून, कर्ज ओढून
माडीवर मांड्यांचे ढीग रचले.

पंख फुटले, पाखरे उडाली,
पुर्वज जाऊन फोटोत बसले.

दर्या किणारी रिकामी माडी
आणि माणसांशिवाय घरचं फसले.

----------------------------------------
'' मनाचिये गुंती ''

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पंख फुटले, पाखरे उडाली,
पुर्वज जाऊन फोटोत बसले.>>>>> छान आहे. आवडली कविता. मला गझल व कवितेच्या आशयाशीच घेणे देणे असते, बाकी वृत्त, काफिया सोफिया, यमक यात काही कळत नाही.