तुझ्या घरातले अनारसे

Submitted by चैतन्य रासकर on 19 November, 2021 - 07:35

तुझ्या घरातले अनारसे
कधी खायला मिळतील?

माझ्या घरातले लाडू
आता कधीही फुटतील!!

तुझ्या त्या गोड शंकरपाळ्या
मला चहा बरोबर चालतील

आमच्या चिवड्यांचे डबे
आता रिकामेच राहतील

तुझे ते चिरोटे (२)
कायम लक्षात राहतील

माझ्या त्या कडबोळ्या
वातड होऊन जातील

तुझ्या या फराळाला
घरातले ही 'दात' देतील

उन्हात टेरेसवर वाळवून
वर्षभर पुरवून खातील...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.
सुरुवातीला वाटलं की सासूबाईंकडून जावयाला अनारसे येणं आहे, त्याबद्दल कविता आहे की काय? (कोणे एकेकाळी मला ३३ अनारसे मिळाले होते, असे अंधुकसे आठवते).

पण मग हे वाचून
<< उन्हात टेरेसवर वाळवून
वर्षभर पुरवून खातील... >>
कळलं की दिवाळीच्या फराळाबद्दल आहे. Lol