इथेच स्वर्ग आहे,
इथेच नर्क आहे !
पाप- पुण्य, कर्म- बिर्म..
फक्त तर्क आहे !!
.....................
चल दूर कुठेतरी जाऊ...
गोंधळापासूनी दूर !
जाऊन तिथे बांधू मग,
अपुल्या स्वप्नांचे घर !!
.....................
कसे व्यक्त व्हावे कळेना मनाला..
कसा दाखवू कृष्ण मी पाहिलेला?
तया प्राप्त होण्यास आतुर आहे !!
खऱ्या लोचनी मी खरे स्वप्न पाहे !!
.....................
लिहीतच आहे तिच्यावर,
जेव्हापासून तिला पाहिलंय...
तरीही अजून बरच काही
लिहायचं राहिलंय !!
.....................
दिवे सुखांचे कोण विझवते एकांताच्या प्रहरी?
जरा हासता.. उरी टांगत्या दुःखांच्या तलवारी !
.....................
सुखावणारे अनुभवही असतात कैक गाठीशी !
परी काव्यातून सहसा माझे दुःख बोलके असते...
अनुभव मांडून झाल्यावर मन मनास काढून घेते !
म्हणून सुखांना मुकावयाची भीती मनाला सलते !!
.....................
जिथे जिथे तुझा | सुखावतो आत्मा |
तिथे परमात्मा | वसतसे ||
.....................
कल्पनाशक्ती मनाची ढगांवरती स्वार होती !
कधी काळी माझीयाही लेखणीला धार होती !"
.....................
निळाईधुक्याच्या पहाटेस होती,
किनाऱ्यास लागून एकांतहोडी..
तिथे चंद्र हळुवार मंदावलेला,
जळाच्या कुशीमंदिरी प्राण सोडी !!
.....................
लोकं बदलत नाहीत...
फक्त मुखवटे गळून पडतात !
.....................
मी नसताना जीव तुझाही जळतो ना?
माझ्यासम हा विरह तुलाही छळतो ना?
.....................
सुरभवनी उत्सव भरला, नंदनवनी मंडप सजला..
चंदनगंधित पावन धरती, कोमल सुमने अंगावरती..
सुंदर गायन गंधर्वांचे, मोहक नर्तन अप्सरांचे..
अमरावतीत अमृतओला, आनंदे घन कोसळला !!
.....................
बुद्धीची शुद्धी केल्याने,
समृद्धीत वृद्धी होते !!
.....................
ओशाळले मन | झाले वाळलेले फुल |
आता निर्माल्याची भूल | साहवेना ||
ओथंबले मन | झाले पावसाचे येणे |
परी चांदण्याचे जाणे | पाहवेना ||
.....................
सारेच मजला विसरलेत आता
जरा चौकशीही करेना कुणी..
कसलेच काही न वाटे मनाला
छळतात केवळ तुझ्या आठवणी..
.....................
खऱ्यामध्ये लेखणी माझी
अशी काही रुळावी..
मुखांतून नाही.. दाद मला
डोळ्यांतून मिळावी..
.....................
पोरी आभाळाचं काम
त्याचं त्याला करूदे ना..
तू कशाला पाडतेस
असा डोळ्यांतून पाऊस?
.....................
मुखातूनी सत्य आहे, चांगलेसे कृत्य आहे ;
सदाचार नित्य आहे, नाव आदित्य आहे !
.....................
अवघे सामर्थ्य माझ्या लेखणीत यावे,
सर्व काही एका ओळीत व्यक्त व्हावे !
.....................
जो तो सांगताहे | ज्याची त्याची व्यथा |
ज्याची त्याची कथा | आगळाली ||
.....................
काही खूप जुनं आहे...
काही खूप जुनं आहे... सांभाळून घ्या !
@_आदित्य_, सुरेख!
@_आदित्य_, सुरेख!
सुंदर लिस्ट...
सुंदर लिस्ट...
जबरदस्त आहेत....
1, 4, 8, 9, 18
हे विशेष आवडले...
Thanks !! @शिवांश
Thanks !! @शिवांश
Thank you @'अवलिया'
Thank you @'अवलिया'