Submitted by विनोद इखणकर - श... on 15 November, 2021 - 10:59
शीर्षक :- शिकवण
हित तुमचे सांगत आहे
चांगले राहणे मागत आहे
द्या वचन एक ते सारे
मोबाईल तुम्ही सोडत आहे
खेळ खेळा मैदानी तुम्ही
कारण खेळात सारे घडत आहे
जपा संस्कृती अन परंपरा देशाची
हेच सारे बोलत आहे
मोठ्यांचा आपमान करत आहे
लहान सारे वागत आहे
जुनं ते सोनं असते
कुणीतरी असे सांगत आहे
गाठा ध्येय,पार पाडा कर्तव्ये
गुरूजण तुमचे सुचवत आहे
मेहनत घ्या ,कर्ते व्हा
तेव्हाच नावाचा डंका वाजत आहे
ज्ञान घेणे ज्ञान देत जाणे
अजूनही काही अज्ञानात आहे
म्हणूनच म्हणतो मुलांनो
प्रेमाचा सल्ला देत आहे
उंच भरारी घ्या पाखरांनो
जिंकणाऱ्याच उद्या किंमत आहे
✍️ विनोद नंदू इखणकर
नाशिक(शब्दप्रेम)
७३५०९७०२०१
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा