Submitted by _आदित्य_ on 13 November, 2021 - 11:35
अरे पाखरांनो.. नका दूर जाऊ,
नका झेप घेऊ अनंताकडे !!
इथे माय तुमची सुगंधास बिलगून
गिरवीत आहे फुलांचे धडे !
तिला सावरा, आवरा भोवरा तो..
तिने जो मनाच्या तळी ठेवला !
दिसावे, कळावे तरी खोल जावे !
तिच्या सावलीचा असा मामला !!
नदीला कधी भार झाला जळाचा?
तिच्या काजळाचा तुम्हाला टिळा !
अरे दग्धजांनो ! नका पाप लावू..
तिला.. सोसल्या ज्या मुलीने कळा !!
पिलांनो जरा आठवा, बालवेळी
तुम्हा कोवळे पंख दिधले कुणी !?
कुणी पाळणा झुलवीला सांजवेळी?
तुम्हाला जगाया शिकविले कुणी !?
घडीने घडी काळ आयुष्य नेतो..
असे रामदासा जरी वाटते,
अरे त्या घडीचे किती दुःख मोठे !
जिला माऊलीची चिता पेटते !!
.........................................
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
@_आदित्य_ सर, उत्तम...
@_आदित्य_ सर, उत्तम...
Thank you @अक्षय समेळ..
Thank you @अक्षय समेळ..
आणी सर वगैरे म्हणू नका.. आदित्यच म्हणा..
मी वय आणी कर्म
दोन्हींनी लहान आहे अजून !
छान ...
छान ...
शांता शेळकेंची अशाच आशयाची सुंदर कविता आहे...थोडासा फरक वाटतो...त्यांना पाखरं दूर गेल्यावर काय दिसतं ते आहे.
छान लिहिता... शुभेच्छा...
Thanks !! @दत्तात्रय साळुंके.
Thanks !! @दत्तात्रय साळुंके..
@_आदित्य_, ठीक आहे...
@_आदित्य_, ठीक आहे...
Thanks @शिवांश..
हा.. @शिवांश..
खूप छान
खूप छान