राजा आणि बोलक माकड।

Submitted by ashokkabade67@g... on 13 November, 2021 - 07:07

आजीच्या गोष्टीत असतना तस एक आटपाट नगर होत या नगरात सर्व धर्माचे प्रांताचे लोक गुण्या गोविंदाने रहात होते .हे आटपाट नगर काही काळापुर्वी पारतंत्र्यात होत पण तेथील जनता मात्र स्वातंत्र्यप्रिय होती म्हणून ती स्वांतत्र्यासाठी प्राणाची पर्वा न करता लढली आणि जवळपास पंचाहत्तर वर्षीपुर्वी या नगराला स्वांतत्र्य मिळाले होते देश आधिच परकीय सत्तेने लुटून नेला होता पण सुजिन प्रजा आणि विकासाचा ध्यास घेतलेले राजे यामुळे लवकरच नगर सुफलाम झाले याकाळात या नगराला परकीय आक्रमणालाही तोंड द्यावे लागले पण आधिच्या युद्धातुन अनुभव घेतलेल्या नगराने शत्रुला नुसती धुळच चारली असे नव्हेतर आक्रमक नगराचे तुकडेही केले पण या नगरात राजा हा नेहमीच जनतेतून निवडायची प्रथा असल्याने सदैव एकच राजा असे मात्र नव्हते पण तत्कालीन नेते देशाच्या विकासासाठी कटीबद्ध असायचे मग हे नगर जगात महान शक्ती म्हणून उदयास आले ।
काळ जात होता जनताही बदलत होतु अशाच काळात कधिही अस्तित्वात नसलेल्या स्टेशनवर कधिकाळी चहा विकणारा माणूस पुढे आला ,आला म्हणन्यापेक्षा काही सत्ता हव्यासु लोंकाच्या गटानेत्याला पुढे आणले असंतुष्ट जनतेला अनेक मोठी स्वप्न दाखवली आणि (आजजरी या राजाला जनता वैतागली असली तरी)जनतेनेही याला राजगादीवर बसवले पण हा राजा फक्त स्तुतीप्रिय होता आणि त्याने काही स्तुतीपाठक भाटही आपल्या पदरी ठेवले होते व त्यांची तो विषेश काळजीही घेत असे वेळोवेळी या भाटांच्या पदरात काहीना काही पडत असे ।असा हा राजा एकदा पर्यटनासाठी गेला असता त्याला एक बोलके माकड एका माणसाकडे आढळले ते माकड फक्त आपल्याच मालक कसा चांगला व ईतर कसे वाईट हे जनतेला सांगत होत बहुतेक हेच त्याच काम असाव अस हे माकड आपल्या पदरी असाव अस राजाला वाटल आणि राजासोबत असलेल्या स्तुतीपाठकांनाही त्याचे महत्व लक्षात आले आणि त्या माकडाला आपल्या गोटात आणन्याचे प्रयत्न सुरु झाले माकडहीआपल्या मालकाला वैतागल होतच आणि राजासोबत असल्याने मिळणारे फायदे लक्षात आल्याने माकडाने स्तुतीपाठक बनण्याची तयारु केली आणि माकड राजाच्या गोटात सामील झाले पण त्याचवेळी राजाला मुळमालकाने सुचना केली की हे बोलके असले तरीही माकडच आहे तुमचु स्तुती करतांनाच कधीकाय बरळेल आणि आपल नाक कापल जाईल याची शाश्वती नाही याने मलाही अनेकवेळा अडचणीत आणून जनतेसमोर माझ नाक कापलय तेंव्हा याच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा पण राजा माकडाने केलेल्य स्तुतीने ईतका भारावला होता की तो ही सुचनाच विसरुन गेला ।काळ जात होता स्तुतीप्रिय राजाला हे स्तुतीपाठक माकड खुपच आवडल पण राजाने जनतेसाठी काहीच केलेल नसल्यान राजाला वाटले आता आपण जनतेला भुलवण्यासाठी स्वातंत्र्याचा अम्रुत महोत्सव साजरा करावा आणि राजाने तसे जाहीर केले मग राजाला माकडाची आठवण झाली त्याने केलेल्या स्तुतीची जाणीव झाली आणि राजाने माकडाचा सन्मान करण्यासाठी त्याला पद्म पुरस्काराने सन्मानित केले या राजसन्माने माकड ईतके पुलकित झाले की आपण राजाची स्तुति करतांना काय बोलतो हेच त्याला कळले नाही माकड म्हणाले 1947 साली स्वातंत्र्य भिकेत मिळाले खरे स्वातंत्र्य तर 2014 साली मिळाले आणि देश स्वतंत्र झाला फण माकड हेच विसरले की राजानेच स्वातंत्र्याचा75 वा वाढदिवस अम्रुत महोत्सव म्हणून साजरा करावा असे जाहीर केले काही काळतर राजपक्षीय लोक आवाक झाले व यावर आता आपण कोमातच गेलेले बरे असे वाटुन त्यांनी या माकडाच्या वक्तव्यावर भाष्य करणे टाळत ते कोमात च गेले या विषयावर महान दिग्गज नेते ,देशभक्त संघ नेतेही कोमातच आहेत कारण ज्या सावरकरांना ते स्वातंत्र्य सेनानी घोषित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत ते या माकडाच्या बरळण्यामुळे सावरकर 2014 च्या खुप आधीच स्वर्गवासी झाले होते मग त्यांनी 2014 साली मिळालेल्या या स्वांतत्र्य संग्रामात भाग कधी घेतला होता असा प्रश्न विरोधक विचारु शकत होते त्यामुळे संघही कोमातच गेला पण राजाला त्याच्या विसराळुपणाची शिक्षा मात्र निश्चितच मिळाली राजासकट साऱ्या साथीदारांचे नाक जनमाणसात छाटत या माकडाने साऱ्यांना खाली पहायला लावले ।
तात्पर्य ःस्तुतीपाठकांपासुन लांब रहा ,नाहीतर नाकच कापले जाण्याची शक्यता असते ।

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कंगना ,उर्मिला मातोंडकर , नगमा , सेनेचा राऊत हि सगळी हुप्पा हुर्या गॅंग वाटतात !
यांच्या तोंडावर ताबाच नाही .

बाकी कबाडे सरांनी नेहमीप्रमाणे भुंकणाऱ्या श्र्वानांच्या शेपटीवर पाय देणारा लेख लिहिलंय त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तितकं कमीच..!!

आभारी आहे डिजे पण मी या विषयावर आपल्याकडुन अपेक्षा केली होती व नंतर लिहायचे नाहीच अस ठरवल होत पण आज तीन केलेले ट्विट वाचून रहावल नाही खर तर मोदीभक्तांनीच यावर आवाज उठवायला हवा होता कारणमोदीजींनी देशाला अम्रुत महोत्सव साजरा करण्याचा संदेश दिलाय आणि सावरकरांना स्वातंत्र्य सेनानी घोषित करण्यासाठी संघ व भाजप जे प्रयत्न करत आहेत त्या प्रयत्नालाही धक्काच पोहोचला की कारण 2०14 च्या कितितरी आधीच सावरकर स्वर्गवासी झालेत मग जनतेलाही प्रश्न पडेलचकी की हा माणूस स्वातंत्र्य लढ्यात केंव्हा लढला तेंव्हा साऱ्यांनिच निषेध करायला हवा होता

अखंड भारत कुठे मिळाला? तो ज्या दिवशी मिळेल तो स्वातंत्र्य दिवस समजला जाईल. राणीसाहेब आगे बढो..

बाकी कबाडे सरांनी नेहमीप्रमाणे भुंकणाऱ्या श्र्वानांच्या शेपटीवर पाय देणारा लेख लिहिलंय त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तितकं कमीच..!! >>>>>>>>>>>>>>>>
/\ आपल्या पायांचे दर्शन घ्यावे म्हणतो !
आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःच योग्य मूल्यमापन केलंत ! Happy

वक्तव्याचा निषेध.
देशाच्या स्वातंत्र लढ्यांत लाखो लोकांनी सर्वस्वाचा त्याग केला, अनेकांना तुरुंगवास, हाल अपेष्टा किंवा प्राणांस मुकावे लागले त्या असंख्य स्वातंत्र सेनानींचा अपमान करणारे वक्तव्य आहे. या वक्तव्याला देशद्रोह नसेल म्हणायचे तर कशाला?

माकड म्हणून हसू नका. अत्यंत सुनियोजित, विचारपूर्वक केलेलं‌ वक्तव्य आहे ते.
जे आपल्याला बोलायचं आहे पण उघडपणे नाही, ते आपल्याच लोकांकडून वदवून घ्यायचं. जनमत तसं फिरवायचं.
https://www.facebook.com/100000762720324/posts/4404773036224744/?app=fbl

वाचा

ashokkabade67@g... ,
तुम्ही राजकारणातहि सत्याची, तर्काची अपेक्षा करता? का?
तसे काही नसते. मत मिळण्यासाठी जे बरळावे लागेल ते बरळायचे. एकदा मत मिळाल्यावर सत्ता मिळाली की कोण विचारतो इतरांना?
तर राजकारणाचे हे असे आहे.
आताशा इतर क्षेत्रातहि सत्यासत्यतेची पर्वा करत नाहीत, कारण सगळे राजकारणी दृष्टीकरणातून पहायचे. म्हणजे मग आपल्याला हव्या त्या रन्गाचा चष्मा लावून पाहिले की हव्या त्या रन्गाचे जग दिसते.

सपा चा एक माकड म्हणतो जिना ला भारताचा पहिला पंतप्रधान बनवायला हवं होते , म्हणजे फाळणी टळली असती .
खरं म्हणजे गांधीजींनी पुढील धोका ओळखला आणि नियोजनबद्धरित्या फाळणी घडवून आणली !
नाहीतर सामाजीक सलोखा संग्रहालयात देखील मिळाला नसता .

अरे बाबा माठपणा साठी तुमचा राहुल जगप्रसिद्ध आहे , इतरांना माठ बोलून गुलामांचा आणि राहुल चा माठ पणा कमी होईल का ? Happy
आणि गांधींना गोडसे ने का मारले ? तर असे प्रश्न खूप आहेत !
इंदिरा ला शिखांनी का मारले ?
राजीव ला एल टी टी ई ने का मारले ?
संभाजी महाराजांना औरंग्या ने का मारले ?
या घटनांत काळ उलटून गेल्या नंतर योग्य कारण सापडेल का ?

अनाजी पणतुकडी विचारधारा.. हे एकच कारण आहे या सर्वांमागे..! असेल ते विटवा अन नसेल ते भेटवा या हव्यासापायी आपल्याच घरात घाण करणारे, आपल्याच माणसांना त्रास देणारे, आपल्याच राजाला राज्याभिषेकास आडकाठी करणारे, आपल्याच महाराजांविरुद्ध कट-कारस्थाने करुन ठार करणारे, आपल्याच पोशिंद्याला विष घालणारे, आपल्याच समाजसुधारकांना गोळ्या घालणारे लोक भारतात आहेत त्यामुळे या घटना घडतात.

अशा अनाजी पंतुकडी विचारधारेला अनुसरणार्‍या समाजविघातकी नतद्रष्टांना ओळखून त्यांना समाजापासून वेचुन वेगळे करणे, त्यांची वेगळी व्यवस्था लाऊन देणे हाच भारताच्या सार्वभौमत्वाच्या अन लोककल्याणाचा एकमेव पर्याय उरला आहे.