म्युच्युअल फंड्सच्या पोर्टफोलिओचे विश्लेषण

Submitted by अतरंगी on 8 November, 2021 - 10:14

या म्युच्युअल फंड्स मध्ये दडलंय तरी काय?

६५३ म्युच्युअल फंड्सच्या पोर्टफोलिओचे विश्लेषण:

मी काही कामानिमित्त वेगवेगळ्या म्युच्युअल फंड्स चे पोर्ट फोलिओ एकत्र केले होते. ते अनायसेच एकत्र झाले होते तर त्यात सहज म्हणून अनेक प्रकारच्या बेरजा केल्या. त्यात वेग्वेगळी आकडेवारी मिळाली, काही गोष्टींबद्दल आधी पासूनच मनात एक अंदाज ठोकताळा होता, त्याला एक फिक्स्ड आकडा जोडला गेला.

इतके सर्व म्युच्युअल फंड हाउसेस, त्यांचे एवढे वेगवेगळे फंड्स, प्रत्येक फंडमध्ये  एवढे सारे स्टॉक... सगळे डाउनलोड करणे, एकत्र करणे हा फारच मोठा टास्क होता. हे सगळे मी मे महिन्यात केले होते. बरेच दिवस यावर लिहावे असे मनात होते, शेवटी या दिवाळीत जरा निवांत वेळ मिळाला.

Data Highlights:-इक्विटी आणि हायब्रीड विभागातील ६५३ ओपन एंडेड म्युच्यूअल फंडस

Total AUM:-१६,३३,३३६ कोटी   

Equity:- १३,४४,१९८ कोटी 

Excluded from the  analysis:- Debt Holdings, Cash, call Money, TREPS, Current Assets, Derivative positions, REPO & Reverse repo Instruments, REIT holdings. 

भारतात आजमितीला ४००० पेक्षा जास्त  स्टॉक लिस्टेड आहेत. म्युच्युअल फंड्स च्या मते यातील  जवळ जवळ ८०%  स्टॉक गुंतवणुकी साठी योग्य नाहीत. ८०% स्टॉक मध्ये एकाही म्युच्युअल फंडची गुंतवणूक नाही. म्युच्युअल फंडसची जी काही गुंतवणूक आहे ती मुख्यतः  निफ्टी ५०० स्टॉक मध्ये आणि थोडीफार मॅक्रो कॅप मध्ये आहे.   

टॉप १० स्टॉक मध्ये जवळजवळ २८% गुंतवणूक आहे. टॉप २५ स्टॉक्स मधेच ५०% गुंतवणूक आहे. टॉप टेन मधील सहा स्टॉक banking  and finance मधील आहेत. सर्वात जास्त गुंतणूक हि अर्थातच HDFCBANK मध्ये आहे. सर्वात जास्त म्हणजे नक्की किती? तर तळातले जवळ जवळ ४९५ स्टॉक मध्ये जेवढी गुंतवणूक आहे तेवढी एकट्या HDFCBANK मध्ये आहे. संपूर्ण गुंतवणुकीच्या ५% गुंतवणूक एकट्या HDFCBANK मध्ये आहे.
प्रत्येक सेक्टर मधील टॉप १० स्टॉक्स.

Screenshot 2021-11-08 at 6.47.17 PM.png

मार्केट कॅप प्रमाणे बघायचे झाल्यास, साधारण ६७% लार्ज कॅप मध्ये, २१% मिड कॅप मध्ये आणि ११% स्मॉल कॅप मध्ये  अशी ढोबळ मानाने विभागणी येते. लार्ज कॅप मधील टॉप टेन स्टॉक मध्ये  ४४%  गुंतवणूक आहे, मिड कॅप मध्ये २२% आणि स्मॉल कॅप मध्ये १४%. 
म्हणजेच १०० लार्ज कॅप स्टॉक्स मधे ६७%, १५० मिड कॅप स्टॉक्स मधे २१% तर ५५० स्मॉल कॅप स्टॉक्स मधे ११ % गुंतवणूक आहे.

सेक्टर प्रमाणे पाहायचे झाल्यास अर्थातच बँकिंग आणि फायनान्स च्या १०५ स्टॉक्स मधे मध्ये सर्वात जास्त म्हणजे २६% गुंतवणूक आहे. त्या खालोखाल कन्स्युमर गुड्स आणि  IT  सेक्टर मधे साधारण ११% प्रत्येकी आहेत. या  तिन्ही सेक्टर मधेच जवळ जवळ ४६% गुंतवणूक आहे. सर्वात कमी गुंतवणूक Textiles, Media & entertainment, utility, paper या सेक्टर्स मधे आहे.  

माझ्याकडे मागच्या दशकातील निफ्टी पेक्षा जास्त रिटर्न दिलेल्या स्टॉक्स चा डेटापण होताच. सहज म्हणून त्यातील कोणत्या स्टॉक्स मधे किती गुंतवणूक आहे ते पण तपासून पाहिले.

ज्या स्टॉक्सनी चांगले रिटर्न दिले त्यातले फक्त १०% लार्ज कॅप आहेत, १३ % मिड्कॅप आहेत आणि ७७% स्मॉल कॅप आहेत. हे जे स्मॉल कॅप आहेत त्यातल्या जवळ जवळ ५०% स्टॉक्स मधे एकाही फंडची गुंतवणूक नाही.
या स्टॉक्स मधे जवळ जवळ सगळ्या फंड्सच्या AUM मधील ५४% AUM या मोजक्या स्टॉक्स मधे गुंतवलेला आहे.

लार्ज कॅप मधील ५३% स्टॉक्सनी चांगले रिटर्न्स दिले आहेत. मिड कॅप मधील ४५% तर स्मॉल कॅप मधील फक्त ८% स्टॉक्स चांगले रिटर्न देणार्‍या यादीत आहेत.

हे सगळं समोर आल्यावर माझ्यातला Index Investing supporter परत जागा झाला. Happy

२५० लार्ज आणि मिड कॅप मधे स्टॉक्स मधे ८९% गुंतवणूक आहे. त्यातील फक्त ५०% च स्टॉक्स चांगला परतावा देऊ शकले आहेत. म्हणजे सरळ सरळ ४०% AUM अशा स्टॉक्स मधे आहे ज्यांनी निफ्टी पेक्षा कमी रिटर्न्स दिले आहेत, असे म्हणता येईल का? स्मॉल कॅप चा विचार केला तर म्युच्युअल फंडनी गुंतवणूक केलेल्या स्टॉक्स पैकी फक्त २५% स्मॉल कॅप स्टॉक्स निफ्टी पेक्शा जास्त परतावा देऊ शकले आहेत.

म्युच्युअल फंड्स कडे मुळातच पर्याय कमी आहेत. त्यांच्याकडे येणार्‍या फंड्सच्या प्रमाणात त्यांना गुंतवणूक करता येतील असे स्टॉक्सच कमी आहेत. त्यांना स्टॉक चा भाव फार वर खाली न करता एंट्री एक्झिट करता यायला हवी. जे फक्त काहीच स्टॉक्स मधे शक्य आहे. त्यामुळे लार्ज आणि मिडकॅप मधे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायला लागणार. लार्ज कॅप सरासरी बरा परतावा देतात पण त्यांचा परतावा कमी ते मध्यम स्वरूपाचा असतो. एखादा लार्ज कॅप स्टॉक कितीही चांगला असला तरी त्याला पोर्ट्फोलिओ मधे किती वेटेज देता येईल यावर पण मर्यादा आहेत.
जे मल्टीबॅगर आहेत ते प्रामुख्याने स्मॉल कॅप मधे आहेत. तिथे म्युच्युअल फंड्सना गुंतवणूक करताना मर्यादा आहेत. फंड मॅनेजर कितीही चांगला असला तरी एखादा स्टॉक पोर्ट्फोलिओ मधे घेताना हा सगळा विचार करावाच लागणार.

लार्ज कॅप आणि मिड कॅप मधेच जास्त गुंतवणूक करावी लागणार आणि सगळेच्या सगळे लार्ज मिड कॅप निफ्टीपेक्षा जास्त चांगला परतावा देऊ शकतीलच असे नाही. त्यात फंड्सचा जो काही एक दिड टक्का एक्स्पेन्स रेशिओ, त्यांचे transactional charges हे सगळे वजा करुन फंडचे रिटर्न्स मोजल्यास फारसे म्युच्युअल फंड निफ्टी पेक्षा जास्त परतावा देण्याची शक्यता कितपत आहे ????

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंटरेस्टिंग.
किती फंडस् निफ्टीला १-३-५ वर्षांच्या कालावधीत आउटपर्फॉर्म करतात? किती टक्क्यांनी?

आत्ता मार्केट मध्ये उपलब्ध असलेले एकूण फंड्स १०४५. त्यातले ५७१ हे इक्विटी आणि हायब्रीड फंड्स आहेत. थोडावेळ आपण debt, Gold फंड्स बाजूला ठेऊ कारण ते इक्विटी बेस्ड नसतात, आणि index फंड, ETF पण विचारात घेत नाही कारण ते passively managed असतात.
५७१ इक्विटी आणि हायब्रीड फंड्स पैकी ३११ फंड्स चा १० वर्षांपेक्षा अधिकचा डेटा उपलब्ध आहे, म्हणजे ते १० वर्षांपेक्षा जुने आहेत. त्यातील फक्त १३५ फंड्सने निफ्टी ५० पेक्षा जास्त रिटर्न दिलेले आहेत. आणि या ३११ फंडस पैकी फक्त ८ फंड्सने गेल्या १० वर्षात Nifty Alpha Low Volatality ३० आणि Nifty २०० momentum ३० पेक्षा जास्त रिटर्न दिलेले आहेत.*

याच प्रकारे जर ५ वर्षांचा विचार केला तर ४२६ फंड्सचा ५ वर्षांपासून अधिक काळचा डेटा उपलब्ध आहे. या ४२६ फंड्स पैकी फक्त ७३ फंड्स ने Nifty Alpha Low Volatality ३० पेक्षा जास्त आणि फक्त १९ फंड्स ने Nifty २०० momentum ३० पेक्षा जास्त रिटर्न दिलेले आहेत.*>>>>

निफ्टी पेक्षा जास्त रिटर्न देणारे फंड लक्षात नाहीत.

हे मी मागे Index Investing भाग २ च्या धाग्यावर लिहिले होते. मी शक्यतो पाच ते दहा वर्षे कालावधीच पाहतो. शॉर्ट टर्म मधे काही फंड्स निफ्टी पेक्षा जास्त रिटर्न देत असावेत. पण मी दिर्घकालीन गुंतवणूकीच्या दृष्टीने पहात असल्याने ५ वर्षाखालील पर्फॉर्मन्स पाहिले नाहीत.

Value research online वर बघता येईल. किंवा मनी कंट्रोल.
मला फोनमधून पाहता येत नाही.

आधीप्रमाणेच अभ्यासपूर्ण विश्लेषण अतरंगी. एवढा डेटा एकत्र करून अभ्यासणे चिकाटीचे काम आहे.
---
मी मीरा ऍसेट्स च्या टॅक्स सेव्हर फ़ंड मध्ये आणि सोबत कोटक महेंद्र ELSS मध्ये काही गुंतवणूक केली. त्यातील मीरा ऍसेट्सचा पाच वर्षांपूर्वीच सुरू झाला. पाच वर्षांचे अन्युअलाईझ्ड रिटर्न्स २१.६ % आहेत.
१-३-५ अनुक्रमे ५८% - २६.५% - २१.६% (डायरेक्ट ग्रोथ)
आता इथून पुढे बघायला हवे.

So what is the conclusion?>>>>

In long term, beating the broad based index with actively managed mutual funds is difficult !!!!

Beating the smart beta indices will be even more difficult....

https://www.youtube.com/watch?v=RpURkpm9iVM&t=1398s.

The Illusion of Smart Money:- Aswath Damodaran

यात त्यांनी ईंडेक्स फंड आणि actively managed mutual funds यांचा वेगवेगळ्या देशातील डेटा दाखवला आहे.

भारतात त्या मानाने अजुन तरी जरा बरी परिस्थिती आहे.

त्यात फंड्सचा जो काही एक दिड टक्का एक्स्पेन्स रेशिओ, त्यांचे transactional charges हे सगळे वजा करुन फंडचे रिटर्न्स मोजल्यास फारसे म्युच्युअल फंड निफ्टी पेक्षा जास्त परतावा देण्याची शक्यता कितपत आहे ????>> म्हणून मी एम एफ मध्ये नाही पैसे घालत. पोर्ट फोलिओ चॉइसेस बघून डिरेक्ट इक्विटीच .

चांगलेलिहिले आहे.

छान लिहिले आहे.
<< ८०% स्टॉक मध्ये एकाही म्युच्युअल फंडची गुंतवणूक नाही. >>
याचा अर्थ बहुतेक फंड केवळ मेगा कॅप/लार्ज कॅप मध्ये गुंतवणूक करतात. इंडेक्सिंग बकवास आहे.

<< एक दिड टक्का एक्स्पेन्स रेशिओ >> Uhoh
VTSAX expense ratio = 0.04%
म्हणजे भारतातील म्युच्युअल फंडांना अजून बराच पल्ला गाठायचा आहे.

<< डिरेक्ट इक्विटीच >> +१
हा पर्याय त्यामानाने चांगला आहे. दुसरा फायदा म्हणजे कॅपिटल गेन, डिव्हिडंड डिस्ट्रिब्युशनवर आपण ताबा ठेऊ शकतो. (उदा. डिव्हिडंड न देणारा स्टॉक घेणे आणि लॉंग टर्म कॅपिटल गेननुसार विकणे, हा पर्याय असतो).

झिरोदा २० रुपये ब्रोकरेज दाखवत आहे. ४०,००० रुपयांना ५३ रुपये (intraday) किंवा ४७७ (delivery) एकूण खर्च. ४७७ खूप जास्त आहे, पण तो टॅक्समुळे.

{. दुसरा फायदा म्हणजे कॅपिटल गेन, डिव्हिडंड डिस्ट्रिब्युशनवर आपण ताबा ठेऊ शकतो. (उदा. डिव्हिडंड न देणारा स्टॉक घेणे आणि लॉंग टर्म कॅपिटल गेननुसार विकणे, हा पर्याय असतो}
या गोष्टी इक्विटी फंडात अधिक चांगल्या प्रकारे करता येथिल. ग्रोथ ऑप्शन असतो.