"अवेंजर्स" या अमेरिकन सुपरहिरो चित्रपट सिरीजला पुढे नेणाऱ्या 2019 साली आलेल्या "स्पायडरमॅन: फार फ्रॉम होम" या चित्रपटात पीटर पार्कर युरोपमध्ये सहलीवर जातो तेव्हा व्हेनिसमध्ये एका वॉटर मॅनचा हल्ला होतो तेव्हा चेहऱ्याऐवजी जादूचा गोळा असणारा कुणीतरी (मिस्टेरिओ) त्याच्यावर हिरवा गॅस सोडून कंट्रोल करतो. 2011 साली मी लिहिलेल्या जलजीवा कादंबरीत असलेले जलजीवा मला आठवले. या चित्रपटात त्या पाणी मानवांना इलेमेंटल्स म्हटले आहे. माझ्या कादंबरीतील जलजीवा पण असेच आहेत फक्त त्यांची व्युत्पत्ती वेगळ्या पद्धतीने होते. असो. मूळ चित्रपटाकडे वळू.
"अवेंजर्स एन्ड गेम" या चित्रपटात थेनॉस या सुपर व्हिलनमुळे जगातील अर्धी माणसे (अवेंजर्समधल्या अर्ध्या सुपरहिरोसाहित) नष्ट होतात आणि पाच वर्षानंतर त्याच वयात पुन्हा जगात परततात. इतर लोक वयाने मोठे झालेले असतात. "शिल्ड" संस्थेचा मालक निक फ्युरी पण त्यातील एक असतो. परत आल्यावर तो स्पायडरमॅनला शोधतो.
स्पायडरमॅन युरोप सहलीवर मित्रांसोबत असतांना निक फ्युरी आणि त्याची साथीदार त्याला गाठतात. मिस्टेरिओ स्पायडरमॅनला पाच इलेमेंटल्सबद्दल सांगतो. तसेच तो मल्टीव्हर्स या संकल्पनेबद्दलसुद्धा सांगतो. मल्टीव्हर्स म्हणजे पृथ्वीवरचेच पण एकापेक्षा जास्त समांतर असलेले अनेक जग.
तर हे इलेमेंटल्स या मल्टीव्हर्समध्ये सर्वांना त्रास देऊन धुमाकूळ घालत असतात. त्यांना कंट्रोल करायला निक, मिस्टेरिओ यांना स्पायडरमॅनची मदत हवी असते पण स्पायडरमॅन सहलीच्या मूड मध्ये असतो. त्याला आवडणाऱ्या मुलीला म्हणजे एमजेला त्याला प्रपोज करायचे असते. आता अग्नीमानव हल्ला करणार असतो. त्याचा मुकाबला करायचा असतो. व्हेनिस, ऑस्ट्रिया, प्राग अशा देशांत आपल्याला हा चित्रपट घेऊन जातो. अग्नी मानव प्राग मध्ये येतो पण मिस्टेरिओ त्याला नष्ट करतो. स्पायडरमॅनपण मदत करतो. पण...
नष्ट होण्याआधी (मरण्याआधी) आयरन मॅन (टोनी स्टार्क) ने निक फ्युरी सोबत स्पायडरमॅनसाठी हाय टेक चष्मा (जो सॅटेलाईट सहित मोबाईल, कॉम्प्युटर हॅक वगैरे करू शकतो) आणि एक आणखी एक नवा "काळा हाय टेक सूट" (स्पायडरमॅनचा पोशाख) देतो.
मागच्याच एका स्पायडरमॅन चित्रपटात (स्पायडरमॅन: होमकमिंग) टोनी स्टार्कने आधीच त्याला हायटेक बनवलेले असते. नॅनो टेक्नॉलॉजीने क्षणात शरीरभर पसरणारा पोशाख त्याला मिळतो तसेच पाठीवर यांत्रिक कोळी गरजेनुसार निर्माण होऊन स्पायडरमॅन त्याद्वारे कुठेही चिटकू शकतो. जसे आपल्या महाभारतातील सुर्यपूत्र कर्णला वेळेवर छातीवर सुपर कवच तयार होऊन शत्रूच्या बाणापासून त्याचे रक्षण करते, तसेच.
पण थांबा...
पुढे अनेक ट्विस्ट आहेत.
मिस्टेरिओ नेमका कोण असतो?
एमजेच्या हाती एक डिव्हाईस लागते त्यातून स्पायडरमॅनला कोणते रहस्य कळते?
मिस्टेरिओची महत्वाकांक्षा काय असते?
मिस्टेरिओ आणि टोनी स्टार्कचे काही कनेक्शन असते का?
पुढे बर्लिन मध्ये स्पायडरमॅन आणि निक फ्युरी "भेटतात" आणि स्पायडरमॅन निकला मिस्टेरिओचे सत्य सांगायला जातो पण...
पुढे काय होते?
पुढे सुरू होतो एक अद्भुत नेत्रदीपक भुलभुलैय्या! स्पेशल इफेक्ट्सचा भुरळ पडणारा चमत्कारिक सोहळा!
नंतरच्या बहुतेक घटना लंडन मध्ये घडतात, लंडन ब्रिजवर...!!
त्यासाठी नक्की हा चित्रपट बघा कारण त्यानंतर पुढे हाय फंडा धमाल चित्रपट "स्पायडरमॅन: नो वे होम" रिलीज होणार आहे. त्यात अनेक युनिव्हर्समधले अनेक स्पायडरमॅन एकत्र येणार आहेत म्हणजे स्पायडरमॅन 1,2,3 तसेच अमेझिंग स्पायडरमॅन 1, 2 ह्या अवेंजर्स सिरीज मध्ये नसलेल्या चित्रपटातील वेगवेगळे स्पायडरमॅन आणि त्यातील व्हिलनपण एकत्र येणार आहेत. म्हणजे ग्रीन गोबलिन, ऑक्टोपस, सँड मॅन वगैरे! तेव्हा तयार राहा!!
- निमिष सोनार, पुणे
व्हेनिस, ऑस्ट्रिया, प्राग अशा
व्हेनिस, ऑस्ट्रिया, प्राग अशा देशांत >>>>> व्हेनिस, प्राग हे देश नाहीत ओ.
माफ करा पण, परिक्षण पण सो सो च आहे.
मी ह्यातला एकच बघितला , 250
मी ह्यातला एकच बघितला , 250 रु शिणीमाचे आणि 150 पॉपकॉर्नचे
400 रु
बाकीचे 25,30 भाग न बघून 10000 रु वाचवल्याबद्दल स्वतःचे आभार मानले
निमिष, मी संपुर्ण मार्व्हल
निमिष, मी संपुर्ण मार्व्हल सिरीजचा चाहता आहे. मला हे टॉम हॉलंडचे नविन तिनही स्पायडरमॅन मुव्हीज आवडले.
या ३ नविन स्पायडरमॅन मुव्हिज मधे स्पायडरमॅनला मार्व्हल युनिव्हर्सच्या कॅरॅक्टर्स बरोबर मिसळवले आहे. याआधी स्पायडरमॅन हा वेगळा व सोलो सुपरहिरो होता. पण सोनी स्टुडिओ व मार्व्हल स्टुडिओ मधे २०१५ मधे जो करार झाला त्या करारानुसार स्पायडरमॅन मार्व्हल युनिव्हर्सचा भाग बनला.( म्हणुन या ३ नविन स्पायडरमॅन मुव्हीज यायच्या आधी टॉम हॉलंडच्या स्पायडरमॅनला मार्व्हल स्टुडिओजने त्यांच्या कॅप्टन अमेरिका:सिव्हिल वॉर या मार्व्हल स्टुडिओज/ मार्व्हल युनिव्हर्सच्या १४ व्या सिनेमात इंट्रोड्युस केले..
आता तु जे स्पायडरमॅन: फार फ्रॉम होम या टॉम हॉलंडच्या दुसर्या स्पायडरमॅनचे जे परिक्षण केले आहेस ते मला समजले पण ज्यांना मार्व्हल युनिव्हर्स व त्या प्रचंड गुंतागुंतीच्या कॅरेक्टर्स व स्टोरी लाइनबद्दल व आधीच्या १७ चित्रपटांबद्दल माहीती नाही त्यांना तुझ्या परिक्षणाने नीट फारसे काही कळणार नाही!
( निक फ्युरी कोण? टोनी स्टार्क कोण ई. ई.)
मार्व्हलचे काही मुव्हीज फारच बंडल आहेत पण बहुतेक मुव्हीज व कॅरेक्टर्स मला खुप आवडतात! टोनी स्टार्क उर्फ आयर्न मॅन इज माय टॉप फेव्हरेट!
कॅप्टन अमेरिका, स्पायडरमॅन, ब्लॅक विडो,डॉक्टर स्ट्रेंज व निक फ्युरी हे त्यामागोमाग आवडणारे! पण टोनी स्टार्क उर्फ आर्यन मॅन इज द बेस्ट!( मार्टिन डाउनी ज्युनिअरने काय रंगवले आहे हे कॅरेक्टर! हॅट्स ऑफ!)
आणी हो, “स्पायडरमॅन, होमकमींग
आणी हो, “स्पायडरमॅन, होमकमींग” चे तु शब्दशः मराठीत अनुवादन केले आहेस. त्याचा अनुवाद “ घरचा“ असा होउ शकत नाही
अमेरिकन हायस्कुल ( व कॉलेजेस मधे) मधे “होमकमींग” विक हा एक अनोखा व गाजावाजा होणारा प्रकार असतो. त्यात प्रत्येक हायस्कुल मधे “ होमकमींग किंग“ व “ होमकमींग क्विन“ निवडले जातात. या मुव्हीतही होमकमींग शब्दात तो अर्थ गर्भित आहे.झालच तर या ३नविन स्पायडरमॅन मुव्हिज मधे या पहिल्या मुव्हीमधे स्पायडरमॅन “ मार्व्हल युनिव्हर्स” मधे प्रवेश करतो. होमकमींग चा अर्थ “ वेलकम होम टु द मार्व्हल युनिव्हर्स!” असाही काढता येउ शकतो!
मला हे तिनही मुव्हिज आवडले तरी त्यातल्या झंडेया या ट्रान्सजेंडर सारख्या दिसणार्या अॅक्ट्रेसला घेण्याचे प्रयोजन कळले नाही! तिनही मुव्हीजमधे ती( का तो?) एकदम बाप्यासारखी दिसते( का दिसतो?)
ओ हंत काका आमच्या आवडत्या
ओ हंत काका आमच्या आवडत्या झेंडेला काहून शिव्या देतात. तुम्ही बहुतेक युफोरिया किंवा तिच्या नवीन येणाऱ्या पिक्चरचे ट्रेलर पाहिले नाही म्हणून अशा बाता करता