गंधप्रदेश..

Submitted by _आदित्य_ on 8 November, 2021 - 00:28

तुझ्या मनाच्या गंधप्रदेशी
ठिबकत हिरवे पाणी..
भाव केशरी विरघळून
शब्दांत, उधळती गाणी..

दरवळती सुख चोहीकडे
आनंदफुले हसणारी..
जांभळी निळी काव्यपाखरे
घेती उंच भरारी..

आठवनगरी दूर वा जवळ,
ऋतुमानावर ठरते..
त्या प्रांतातील श्यामल संध्या
सरूनही का उरते?

तुला जाणीवा होताना ये
इथे सागरा उसळी..
गंधप्रदेशी चराचरावर
चंद्र तुझेपण उजळी..

............

Group content visibility: 
Use group defaults