बदली आणि बरच काही....

Submitted by कविता९८ on 7 November, 2021 - 09:21

२०२० संपताना आमच्या सोसायटी मधील काही ठराविक मेंबर्स नी याच सोसायटी मधील एक डोळ्याची मांजर कोको आणि तिची पिल्ले यांना relocate केले.
आणि यात आम्ही वेड्यासारखे कोको ला शोधत होतो.
दुसऱ्या दिवशी आमच्या एका शेजाऱ्यांनी मला कॉल केला हे सांगायला की सोसायटी मधील रिनोवेशन काम बघणारे जगदीश सर यांनी ओळख काढून एका एनजीओ ला कोको आणि तिच्या पिल्लांना न्यायला सांगितले, आता तुम्हाला काय त्यांना खायाला घालायला नको कारण एनजीओ त्यांना बरोबर सांभाळणार.
या नंतर मी एसीपी सुधीर सर यांना कॉल केला. यांनतर बॉम्बे animal राइट्स वाल्यांच्या मदतीने आम्हाला समजल की आमच्याच सोसायटी मधील लोकांनी हे सर्व केलं आणि यावर आम्ही लीगल ऍक्शन घेऊ शकतो.
यानंतर एका मागोमाग एक घटना घडत गेल्या.
मी पोलीस कंप्लेंट करू नये म्हणून दबाव टाकण्यात आला. आणि शेवटी फेब्रुवारी मध्ये माझ्या वडिलांची बदली मध्य प्रदेश मध्ये करण्यात आली.
आता ही बदली झाली तेव्हा काही महिन्यांसाठी आहे म्हणून सांगितलं गेलेलं.
परंतु आता समजल की या कायम स्वरुपी आहेत.
जिथे बदली झाली ते गाव एरिया मधे येतं. तिथे कुटुंब घेऊन राहणे कठीण आहे. सध्या वडील तिथे रूम रेंट वर घेऊन राहत आहेत. तिथून ऑफिस डेली २००-३०० ऑटो भाडे जाते.
या सर्वात मला ही गोष्ट खाते की मी या ऑफिस ला घाबरून तक्रार केली नाही.
आम्ही फक्त भटक्या प्राण्यांना न्याय मिळावा म्हणून प्रयत्न करत होतो.
आता आम्हाला हा रूम खाली करण्यास सांगितले आहे. आमच्या नंतर सोसायटी मधील जे प्राणी इथलेच लोक घेऊन आले होते त्यांचं काय होणार आणि ते किती सेफ असतील देव जाणे.
तुम्हा लोकांना जर जमत नव्हत तर तेव्हा या प्राण्यांना सोसायटी मध्ये घेऊन खायला देण्यास का सुरू केले? आणि यांनी बंद केल्यावर त्यांची होणारी हालत बघवत नव्हती म्हणून आम्ही फीडींग सुरू केले तर याचा पण त्रास??
यातील 2 dogs तर कित्येक वर्षे इथे आहेत.
हे ऑफिस प्रतिष्ठित असल्याने यांच्या सोबत वाद देखील घालू शकत नाही.
परंतु कायदा सांगतो की कोणीही अशा प्राण्यांना त्यांच्या जागेवरून हलवू शकत नाही.
डोकं बधीर होत होते विचार करून म्हणून माबो वर लिहायचा विचार केला बस.
_/\_

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

प्राण्यांच्या संवेदना त्यांनाच कळतात जे त्यांच्या सान्निध्यात जास्त वेळ घालवतात, त्यांच्याशी खेळतात, बागडतात. आणि हे प्राणी सुद्धा प्रेमासाठी तडफडत असतात. कोणी प्रेमाने त्यांना जवळ घ्या, बघा किती जीव काढतील तुमच्यासाठी. त्यांना होणाऱ्या यातना, भुक, दुराव्यातून येणारे डिप्रेशन ते कुणालाही सांगू शकत नाहीत. पण जसे तुमचे लहान मुलं असते, तसेच हे प्राणी देखील. खरंच वाईट वाटत असं ऐकून / पाहुन. आपापल्या क्षमतेनुसार मदत करत राहायला हवे हाच मनुष्यधर्म...

(मला मांजरे प्रचंड आवडतात, तरीही)

खरं तर सोसायटि वाल्यांनी एनजीओ ला तरी दिले हे त्यतल्या त्यात बरे. (काही लोक विष घालतात किंवा पिशवीत घालून फिश मार्केट ला सोडतात.)आमच्या सोसायटीतही असेच निर्णय घेतले गेले असते.पण हे खटकलं की प्राणी प्रेमींची आपुलकी, खाऊ घालणं ते गृहस्थ डोळ्यांनी पाहत असतील तर परस्पर असा निर्णय घ्यायला नको होता. या प्राण्यांची ओनरशिप कोण किती वेळ घेत होतं त्यावर आहे. कदाचित ही मांजरं कुठेतरी घाण करत असतील, कोणाच्या तरी दारात मेलेली कबुतरं उंदीर टाकत असतील.आणि काही प्रश्न असतील जे खाऊ घालणारे पूर्ण वेळ सांभाळत नसतील.

मांजरावरुन तक्रारीमुळे बदली हे त्यांच्याकडून फारच जास्त आहे. मधला मार्ग निघाला असता. असं करायला नको होतं.

मी स्वतः कोणत्या ओळखीच्या मांजराला एन जी ओ कडे सोडणार नाही. पण त्या मांजरीशी ज्यांचे भावनिक लागेबांधे नाहीत ते काही न समजता असे निर्णय घेऊ शकतात.

(हे लिहील्यावर आधीचे लेख वाचले. कोको चे फोटो पाहिले आणि खूप वाईट वाटलं. कोको तुम्हाला परत मिळो आणि बदलीही टळो.)

त्यांनी एनजीओ च्या नावाखाली तिला आणि पिल्लांना एका दुसऱ्या एरिया मध्ये सोडले होते.
आणि त्यात देखील पिल्लांना वेगळे व कोको ला वेगळे..
त्यातील फक्त एक पिल्लू जगले..
कोको या नंतर पुन्हा सोसायटी मध्ये येण्यास टाळू लागली.
बदली already झाली आहे.
आम्हाला हा रूम खाली करण्यास सांगितले आहे.
या गोष्टीचे जास्त वाईट वाटतं की त्यांनी स्वतः तिला आधी खायला देण्यास सुरुवात केली.
त्यांना आधीच समजवल होत की ही मांजर आहे, हीचे नसबंदी ऑपरेशन होणे जरा गरजेचे आहे, नाहीतर ही इथेच पिल्लांना जन्म घालत राहणार. ती पिल्ले मग त्यांची पिल्ले अस सत्र चालत राहणार. पण तेव्हा कोणी ऐकलं नाही. ती प्रेग्नेंट झाल्यावर मग तिला जेवण देणे बंद केले त्या लोकांनी..
मला फक्त एक गोष्ट खात राहते की तेव्हा हिम्मत करून या लोकांवर FIR केली असती तर कदाचित आता गोष्ट वेगळी असती.
जिथे वॉचमन ची पोस्टच नाही तिथे माझ्या वडिलांना पाठवणे खरच गरजेचे होते का??
ज्या जागेवर सुविधाच नाहीत तिथे कस राहणार??
एक महिन्या आधी तिथे एका कर्मचारी हार्ट अटॅकने गेला , यात मेडिकल मदत मिळाली नाही लवकर.
ट्रान्स्फर होत राहतात पण अशा जागेवर जिथे गरजच नाही, जिथे सोयी नाहीत, तिथे पाठवणे किती योग्य ?

यात अजून एक म्हणजे अशा अजून एका कर्मचारी ला तिथे ट्रान्स्फर केले. कारण काय तर त्याचे बॉस सोबत पटत नव्हते. पण त्याने राजकीय ओळख वापरुन पुन्हा मुंबईत बदली करून घेतली.
यावरूनच समजल की किती महत्व होत या बदलीला.
या आठवड्यात आम्ही इथून निघून जाऊ.. यांनतर इथे लोकांनी सोसायटीमध्ये जे प्राणी आणून ठेवले त्यांचं काय होईल देव जाणे...
दोन dogs आणि एक बोका..(ज्याच्यावर दिवाळीत इथल्याच एका छोट्या मुलाने फटाके फोडून त्याला जखमी केले आहे आणि त्यावर ट्रीटमेंट चालू आहे.)

याशिवाय माझे आई वडील एरिया मध्ये लोकल फिडर म्हणून भटक्या प्राण्यांना जेवण द्यायचे ते वेगळे....

देवाने जन्माला घातलाय तर जगणं मरणं ही पुर्वनियोजित समजून चालायचं. आपण निमित्तमात्र. हात-पाय, बुद्धी, ईच्छा असुनही कुठेतरी अडखळणारंच. त्यांचं भविष्य काही वेगळं असेल. वाईट स्वप्नं समजून जिथे जाल तिथे तुमचं कार्य चालू ठेवा. इथली बदली थांबवण्यासाठी प्रयत्न केले तर बघा.

देवभुबाबा काही फायदा नाही..
कारण आधी बदली कोणाची तरी दुसऱ्याची होणार होती पण मीटिंग मध्ये अचानक माझ्या वडलांचे नाव पुढे केले गेले.
मी तक्रार करू नये यासाठी मुंबई ब्रांच ची डायरेक्टर होती तिने पप्पांना ऑफिस मध्ये बोलवून धमकी दिली.
आणि भांडवलकर नामक एका ऑफिसर सोबत मी कॉल वर बोलली असता त्याने सुद्धा मला धमकी वजा सूचना दिली.
त्यामुळे रिक्वेस्ट करून उपयोग शून्य.

वडील आता जिथे आहेत त्या भोपाळ मधील भौरी गावात गावकरी घराबाहेर एक टोपल ठेवतात, ज्यात ते गायी कुत्रे यांसाठी जेवण ठेवतात.
त्यामुळे तिथे प्राण्यांच्या विरोधात असे कोण नाही. तेवढाच काय तो फरक...

म्हणजे त्यांना कोणा आवडत्या माणसाला योग्य ठिकाणी आणायचे होते, मांजर तक्रार हे फक्त निमित्त म्हणून वापरले असावे.या ना त्या मार्गाने ते झालेच असते.
त्या गावी कुटुंबा सहित का जाता येत नाही?

नक्की प्रॉब्लेम काय आहे ते कळले नाही. मांजरीला उचलून नेले हा प्रॉब्लेम की दूर ठिकाणी बदली झाली हा प्रॉब्लेम आहे?

जगात माणूस त्या कुत्र्या मांजरांच्या निर्विवाद वर आहे. त्याचं हीत आधी बघायचं हे शिका. सोसायटी जी तुमच्या मालकीची नाही तिकडे तुमची भूतदया केराच्या टोपलीत जाणार यात काही वाद नाही. तुमच्या घरी काय हवी ती पाळा की कुत्री मांजरी.

कविता: तुम्हाला मांजराचा लळा लागला होता म्हणून हे ऐकून वाईट वाटले. आणि मांजरांना खाऊ घातले म्हणून दुर्गम ठिकाणी बदली हे तर समजण्याच्या पलिकडे आहे. बदलीच्या विषयी तुम्हाला वन ओवर लेवलवर तक्रार नाही का करता येणार? किंवा सरकारी ऑफिस असेल तर कर्मचार्यांच्या युनिअन असतात. त्यांना मधे घालता येईल.

परीसरातल्या लोकांनी एवढी टोकाची ऍक्शन घेतली तर तुमच्या प्राणीप्रेमाचा त्यांना कितपत त्रास होत होता? कधी या विषयावर वाद वगैरे झाले होते का? तुम्हाला कदाचित जाणवले नसेल पण ज्या लोकांना पाळीव प्राणी आवडत नाहीत त्यांना सोसायटीच्या परीसरात प्राण्यांना खाऊ घातलेले वगैरे नाही आवडत.

सोसायटीचा आणि नोकरीतल्या बदलीचा काही संबंध कळला नाही.
जिथे नोकरी करतात त्या कंपनीची वसाहत आहे का?

सोसायटीचा आणि नोकरीतल्या बदलीचा काही संबंध कळला नाही.>>>> हो हे मलाही समजलं नाही. बरेच डिटेल्स व्हेग आहेत, त्यामुळे लेख विस्कळीत वाटतो आणि मुद्दा कळत नाही.

अमितव यांच्या प्रतिसादाशी सहमत. मी स्वतः डॉग ओनर असुन मला रस्त्यावरच्या कुत्र्या मांजरांवर आणि मुख्यतः कबुतरांवर प्रेम करणाऱ्या माणसांची सायकॉलॉजी कळत नाही.

सोसायटीतील लोकांना मांजरांचा, कुत्र्यांचा काही त्रास होत होता का? त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल आपण बोलून पाहिलं का/
माझ्या जुन्या घराच्या परिसरात मांजरांचा काही त्रास नाही परंतु भटक्या कुत्र्यांचा मोठा nuisance आहे. रात्रीबेरात्री टोळी करून फिरत असतात. टूव्हीलरवाल्यांच्या मागे लागतात. लहान मुलांना पहाटेचा क्लास असेल तर सावधपणे बाहेर पडावं लागतं. सोबत कोणीतरी मोठं माणूस असावं लागतं. कुत्री रात्रीबेरात्री कोरसमध्ये जोरजोरात भुंकत असतात. झोप डिस्टरब होते.
आमच्या गल्लीतल्या काही लोकांनी एकत्र येऊन स्थानिक नेत्यांकडे हा मॅटर नेला. त्यांनी सांगितलं की कुत्र्यांना मारणं तर सोडाच, relocate करणं हाही कायद्याने गुन्हा आहे आणि त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही. त्रास होत असेल तर तुम्ही स्वतःच दुसरीकडे रिलोकेट व्हा असा सल्ला दिला. कुत्र्यांची sterilization करण्याची जबाबदारी पालिकेने एनजीओकडे दिली आहे. पण काहीही accountability दोन्हीकडे नाही. त्यांची संख्या वाढतेच आहे. ठरवलं तर सगळं होतं पण याना काही करायची इच्छाच नाही. बजेट केलेला पैसा कुठे जात असेल आपण कल्पना करू शकतो.
आमच्या गल्लीत पाळीव कुत्रीही आहेत. ती कुत्री कायम लीशवर असतात. अपरात्री भुंकत नाहीत. मालक सगळी जबाबदारी घेतात.
भटक्या कुत्र्यांना खायला घालणारे काही feeders रोज आमच्या एरियात येतात. हे त्या भटक्या कुत्र्यांपेक्षा मोठा nuisance आहेत. स्वतः दुसरीकडे राहतात. त्यामुळे त्यांना कुत्र्यांचा काहीच त्रास नाही आणि ते कसलीही जबाबदारी घेत नाहीत. त्यांना काही सांगायला गेलं तर पोलीस तक्रार करायची धमकी देतात. कुत्र्यांना खायला चिकन मटन आणतात. बीफ बॅनवरून विव्हळत असतात. म्हणजे कोंबड्या-बकरे-गायी मारा पण कुत्र्यांना मात्र रिलोकेटही करायचं नाही.
येड्यांचा बाजार!
तुम्ही वर animal rights, भटक्या कुत्र्यांना न्याय, लीगल action वगैरे लिहिलं आहे. तसे काही राईटस सामान्य माणसांना पण आहेत का हो?

ही सोसायटी govt स्टाफ क्वार्टर मध्ये येते.
आणि हे प्राणी आमचे नाहीत ..
सोसायटी च्याच सेक्रेटरी व इतर मेंबर्सनी खूप आधी भूतदया दाखवत त्यांना बिल्डिंग मध्ये आणले.
वरचे जे ऑफिसर आहेत त्यांचा देखील या रेलोकेट केस मध्ये हात होता.
याची तक्रार PFA PEOPLE FOR ANIMALS मधे केलेली होती.
तुम्हाला नाही जमत तर प्राणी आणू नका नाहीतर घरात पाळून भूतदया दाखवा.
आणणार मग काही दिवस भूतदया जागी ठेवून जेवण देणार मग बंद करणार.
त्यांचे हाल बघवत नव्हते म्हणून आईने त्यांना जेवण देण्यास सुरू केले आणि ही बाब त्या ऑफिस मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितली होती.
मी जर fir केली असती तर ऑफिस चे नाव खराब झाले असते असे मत होते वाटतं.
कोणी भूतदया दाखवावी कोणी नाही ज्याचा त्याचा प्रश्न.
यांनी आणलेल्या प्राण्यांना माझे आई वडील शांत पणे जेवण देत होते, ते झाले की ती जागा झाडू मारून स्वच्छ करत होते.

एनजीओ प्राण्यांची नेमकी कशी काळजी घेते हे माहित नाही, पण प्राण्यांसाठी सोसायटी मधील लोकांच्या धरसोड प्रवृत्तीच्या भूतदयेवर विसंबून राहण्यापेक्षा एनजीओ हे लाँग टर्म आणि चांगले सोल्युशन नाही का?

कोणताच एनजीओ अस प्राण्यांना सांभाळत नाही.
जर तुमच्या ओळखीचे असतील तर प्लिज कळवा.
या लोकांनी आमच्या सोबत काही चर्चा केली नाही. काय त्रास होत होता सांगितले नाही .
सरळ नुकत्या जन्मलेल्या पिल्लांना वेगळ्या आणि त्यांच्या एक डोळा असलेल्या आईला वेगळ्या एरिया मध्ये सोडले. आणि एनजीओ चे खोटे नाव घेऊन सांगितलं की एनजीओ वाले घेऊन गेले.
हे सर्व PFA आणि बॉम्बे ANIMAL RIGHTS वाल्यांनी जेव्हा या लोकांना विचारले तेव्हा यांनी त्या लोकांना घाबरून खर सांगितलं.
याचे कॉल रेकॉर्डिंग PFA TEAM आणि Bombay Animal Rights यांच्या कडे आहेत.
त्यांनी मला FIR नोंद करायचा सल्ला दिला पण मी काही करायच्या आधीच आम्हाला पप्पांच्या ऑफिस मधून धमकी वजा सूचना मिळाल्या.
वडिलांना होणारा त्रास बघून मी माघार घेतली.
जर मी तक्रार केली असती तर कदाचित चित्र वेगळे असते. अस वाटत राहतं होत म्हणून मी धागा लिहिला.
कारण मला वाटलं होत की हा विभाग त्यासाठीच आहे.

बाकी जर कोणाला animal rights वैगरे वर चर्चा करायची असेल तर तुम्ही त्यातील तज्ञ अधिकारी आहेत त्यांच्या सोबत बोलू शकता.
किंवा मुंबईतील एसीपी सुधीर कुडाळकर यांच्या सोबत बोलू शकता. कारण हे सर प्राण्यांसाठी खूप काम करत आहेत.

माफ करा, विषयांतर करतोय. पण सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे काही नियम आहेत. माझ्या माहितीनुसार बदल्यांचे अधिकार विभाग प्रमुख/प्रशासकीय विभागाला असतात. तुमच्या बाबांची बदली राज्याबाहेर झाली म्हणजे ते केंद्र शासनाचे वा केंद्र शासनाच्या अधिनस्त संस्थेचे कर्मचारी असावेत. त्यांची नियमबाह्य बदली झाली असेल तर न्यायालयात दाद मागता येईल का ते तपासा.

<< कोणी भूतदया दाखवावी कोणी नाही ज्याचा त्याचा प्रश्न.
यांनी आणलेल्या प्राण्यांना माझे आई वडील शांत पणे जेवण देत होते, ते झाले की ती जागा झाडू मारून स्वच्छ करत होते. >>
अगदीच चुकचुकल्यासारखे वाटत असेल तर ३-४ मांजरी आणि भटकी कुत्री पाठवून देऊ का?

उपाशी बोका, तुमचे तुम्ही तुमच्याकडेच ठेवा..

वीरू सर सकाळी यावर काही ओळखीच्या लोकांशी बोलून पाहेन. जर पुरावे म्हणून कॉल रेकॉर्डिंग चालत असतील तर बरं पडेल भविष्यात.
माहितीसाठी धन्यवाद.

मी अनु, तो पूर्ण गाव एरिया आहे. जिथे आधी शुद्ध हिंदी सोडून लोक इतर भाषा बोलायला ही बघत नाही. पाण्याची सोय नाही, प्रवास करण्या साठी सुविधा नाही,जवळ कोणती मेडिकल सोय नाही, आणि भोपाळ वायू दुर्घटना झाल्यापासून ज्या लोकांना सवय नाही ते तिथे राहू शकत नाही. कारण माझ्या वडिलांना वातावरण मुळे नाकातून रक्त येणे, डोके जड होणे या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

बाकी ज्यांना भूतदया बद्दल बोलायचे आहे.
हे प्राणी आमच्या मालकीचे नाहीत.
सोसायटी वाले त्यांना घेऊन आले. काही आठवडे खाण्यास घातले नंतर वाऱ्यावर सोडून दिले.
ही सोसायटी आमच्या मालकीची नाही हे आम्हालाही माहीत आहे. परंतु या सर्व गोष्टींची माहिती आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवली होती. यावर त्यांनी हे सुद्धा सांगितले की पिल्ले मोठी झाली की त्यांना आम्ही परेल मध्ये नेऊन नसबंदी करण्यास तुम्हाला मदत करू. पण नेमके याच वेळी सोसायटी मेंबर्स नी एका एनजीओचे नाव पुढे करून त्या एनजीओ ने पिल्ले आणि मांजर नेले असे खोटे सांगितले.
पिल्ले व त्यांची आई यांना वेग वेगळ्या एरिया मध्ये सोडले. ज्यात 3 पिल्ले दगावले.
जेव्हा pfa अँड बॉम्बे
एॅनिमल राईट्स नी या लोकांना विचारले तेव्हा कुठे खर समजलं. पण तोपर्यंत उशीर झाला होता. शेवटी 3 पिल्ले गेलीच..

आमचा वन रूम किचन पण दोन वर्षांपूर्वी याच लोकांनी आणलेल्या मांजरीच्या पिल्लाना माझा भाऊ वाचवून घरी घेऊन आला तेव्हा माझे आई वडील त्यांना जमेल तसे त्या पिल्लांना सांभाळू लागले.
आम्हाला तर प्राणी सांभाळण्याबद्दल तेव्हा काही अनुभव ही नव्हता.

मी याहून जास्त समजवू शकत नाही. माझ्या कडे इतर काही मायबोली करांप्रमाणे पेशंस नाही आणि तेवढी ताकद ही नाही सध्या.
कोणाला प्राणी प्रेम , भूत दया , त्यांचे हक्क तुमचे हक्क जे प्रश्न असतील ते तुम्ही Pfa team किंवा Bombay Animal Rights यांना संपर्क करून विचारू शकता. ते तुमच्या शंकाचे निरासन करतील. त्याच्या बद्दल गूगल वर सर्च केल्यास तुम्हाला संपर्क करण्यास नंबर सापडतील.

मी माझे मन मोकळे करण्यासाठी हा धागा काढला परंतु मला खरच नाही वाटतं की यापुढे मी लिहू शकते काही.
कोणाला माझी विचारसरणी चुकीची वाटतं असेल किंवा इतर काही तर माफी..
प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. यावर उपाय नाही. ज्यांनी सल्ले दिले त्यांचे आभार.

अत्यंत दुर्दैवी घटना. मुळात दोन प्रश्न आहेत, जे एकात एक गुंतले आहेत.

१. लेखिकेने भटके प्राणी आणलेले नाहीत, ते इतरांनी तेथे आणून त्यांची नीट देखभाल केलेली नाही. शिवाय त्यांना तिथे आणून लोकांनी पुढे त्यांची उपासमार, ताटातूट, मृत्यूस कारणीभूत ठरणे - इत्यादी कृत्ये केली आहेत. त्यांच्या कृत्यांपैकी काही तर सरळसरळ नियमबाह्य व कायद्याने गुन्हा ह्या सदरात मोडतात. लेखिकेने सजग नागरिक व प्राणीप्रेमी भूमिका (नियमांतर्गत राहून - असेच दिसते आहे) घेतली आहे. परंतु ही भूमिका अनेकांच्या रोषास कारणीभूत ठरली असून त्याची फळे दुर्दैवाने लेखिका व परिवारास भोगावी लागत आहेत.
२. वरील रोष हा ही एक वेळ चर्चेने शांत करता आला असता. परंतु त्या लोकांनी अधिकारांचा गैरवापर करून लेखिकेच्या वडिलांची बदली करवून घेतली आहे, असे सकृतदर्शनी दिसते. ह्याबद्दल काही कायदेशीर इलाज करता येईल का, ते माहित नाही. परंतु धाकदपटशाहीने सामान्य नागरिकांचे जीवन सहज पाहिजे तसे ताब्यात घेता येते - ही अतिशय चिंतेची बाब आहे.

मुद्दा क्र १ हा प्राण्यांवरील अन्यायाबाबत आहे, तर क्र २ हा लेखिका आणि त्यांच्या कुटुंबावर झालेला अन्याय आहे. मला वाटते की आत्ता क्र १ पेक्षा क्र २ जास्त गांभीर्याने घेऊन त्याबद्दल काही कायदेशीर मदत मिळू शकेल का, किंवा तक्रार करता येईल का हे पहावे.

मला धागा नीटसा कळला नव्हता. आत्ता हरचंद पालव यांची पोस्ट वाचून बराच उलगडा झाला.
कविता, तुम्हाला घट्ट मिठी!
हपा यांच्या मताशी सहमत आहे. तुमच्या वडिलांना बदली मिळेल यासाठी काय करावे लागेल ते पहा.
बाकी या धाग्यावरचे प्रतिसाद वाचून वाईट वाटलं. भटक्या कुत्र्यामुळे माझ्या डोळ्यासमोर माझ्या मैत्रिणीचा अपघात झाला होता त्यामुळे तो त्रास मी समजू शकते. पण या ठिकाणी कविता यांनी मांडलेला प्रश्न समजून न घेता त्यांना उलट प्रतिप्रश्न करणे हे फारच असंवेदनशीलपणाचे आणि अप्रस्तुत वाटले.

जवळ कोणती मेडिकल सोय नाही, आणि भोपाळ वायू दुर्घटना झाल्यापासून ज्या लोकांना सवय नाही ते तिथे राहू शकत नाही. कारण माझ्या वडिलांना वातावरण मुळे नाकातून रक्त येणे, डोके जड होणे या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.>>> मग डॅाक्टरांकडून योग्य ती कागदपत्रे घेऊन हे कारण देऊन बदली रद्द किंवा चांगल्या जागी होते का बघा.

सध्या जिथे नेमणूक आहे तिथल्या साहेबांना नम्र विनंती करून जास्त चांगल्या ठिकाणी बदली मिळाली तर बघा. कोर्ट कचेरी मध्ये तुम्हाला त्रास व्हायची शक्यता जास्त आहे.

Pages