या मुलींना सपोर्ट कधी मिळणार?

Submitted by ऋन्मेऽऽष on 31 October, 2021 - 18:25

डाबर कंपनीने आपल्या ब्यूटी प्रॉडक्टची जाहीरात बनवली.
खालील लिंकवर बघू शकता.

https://youtu.be/-yu4_BIPkXU

यात दोन मुली आपापसात करवा चौथ करताना दाखवल्या आहेत. म्हणजेच हा एक समलिंगी विवाह आहे. दोन बायका चाळणी घेऊन जर त्यातून आधी चंद्र आणि मग एकमेकींना बघत असतील तर वाद उदभवणारच होता. आणि झालेही तसेच. त्यावर कंपनीनेही लगेच माफी मागत जाहीरात मागे घेतली.

मला काही हे पटले नाही. जर तुम्ही काहीतरी नवा पण योग्य विचार मांडत असाल तर तुम्हाला आपल्याच विचारांना पाठिंबा द्यायची हिंमत का होत नाही. जर ईतक्या लगेच जाहिरात मागे घ्यायची होती तर मग तो ब्रॉड माईंडेड असल्याचा आव तरी का आणला? थोडक्यात धंद्याची गणिते, बसली तर बसली, फसली तर फसली. माफी मागितली आणि पुन्हा एक स्टेप मागे घेतली. पण हि जाहिरात बनवताना ज्या लोकांच्या खरेच भावना गुंतल्या असतील वा ज्या लोकांना ही जाहीरात बघून एक आशा निर्माण झाली असेल, त्यांना मात्र हा वाद बघून आणि ईतक्या सहजपणे जाहीरात मागेही घेतली हे बघून फार वाईट वाटले असेल. त्यांचा धीर आणखी खचला असेल.

आपण या आधी फॅब ईंडियाच्या जश्न ए रिवाज जाहीरातीवरून झालेला वाद पाहिला. त्या आधी तनिष्कनेही असा वाद अनुभवला आहे. ज्यात लोकांना आपल्या धार्मिक संस्कृतीवर घाला रुचला नाही. खरे तर हे धर्मभेद माणसांनीच बनवले आहेत. तिथे नियमही माणसांचेच आहेत. त्यामुळे त्यात काय योग्य आणि काय अयोग्य हे देखील माणसांच्याच त्या त्या जातीधर्माच्या समूहाने एकत्र येऊन ठरवले जाते. अर्थात तिथेही एकमत होत नाही. त्यामुळे मग असे वाद ऊदभवतात.

पण जे कल निसर्गाने बनवले आहेत त्यावर माणसांनी आपले नियम का लादावेत?

शीर्षकात मुलींना लिहिले आहे पण हे समलिंगी आकर्षण आणि त्यातून निर्माण होणारे संबंध मुलांबाबतही लागू आहेच.
कायदे कितीही मानवता जोपासणारे बनवा आजही या भावनेला एक विकृतीच समजली जाते. आपल्या अमुकतमुक धर्मात आणि ऊच्च संस्कृतीत याला मान्यता नाही असे दावे केले जातात.

साधारण दोनेक वर्षांपूर्वीची गोष्ट. आमच्या ऑफिसमध्येही हा विषय निघाला होता. आठ दहा जणं होतो. सारेच ईंजिनिअर. ज्यात निम्या बायका. पण एकानेही समलिंगी संबंधाना पाठिंबा दर्शवला नाही. काहींनी तोंडच उघडले नाही, तर काहींनी विरोध दर्शवायलाच उघडले.
आपल्या मुलांबाबत असे झाले तर त्यांचा तो कल लहानपणीच ओळखून कसा तो नियंत्रणात ठेवायचा, कसे आपल्या मुलांना आवर घालायचा हिच सर्वांना चिंता होती.

मी म्हटले, जर त्या फिलिंग्स आतूनच नैसर्गिकरीत्या उत्पन्न झाल्या असतील तर तुम्ही कश्या बदलणार?
तर मलाच उलटे विचारले की मग काय मुलांना सपोर्ट करायचा का? तू तरी करशील का?

मी म्हणालो हो, नक्कीच. किंबहुना तेव्हाच तर मुलांना घरच्या सपोर्टची गरज सर्वाधिक असेल. तेव्हाच हात मागे घ्यायचा का..
पण सोबत हे देखील म्हटले की देवाकडे प्रार्थना हिच राहील की असे समलिंगी सेक्शुअल ओरीएंटेशन माझ्या मुलांच्या नशीबी नको येऊ दे. बिचाऱ्यांचे या समाजात जगणे अवघड होईल. जिथे जाहीरातीत दाखवणेही लोकांना संस्कृतीची विटंबना वाटते. तिथे प्रत्यक्षात त्यांचे काय हाल होतील...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख.
ह्या ज्या जाहिराती आहेत त्या टिव्हीवर प्रसारित होताएत का? आमच्या कडे टिव्ही चैनल्स नाहियेत.

त्या खऱ्या मुली आहेत का?
समलैंगिकता / लैंगिक व्यभिचाराचे स्वातंत्र्य / विबासं / पती पत्नी नात्यातील स्पेस या विषयावर अनेकदा चर्चा झालेल्या आहेत. त्या एका वर्तुळापुरत्या राहतात. खाली झिरपत नाहीत. याचा अर्थ त्यांचे जीवनमरणाचे प्रश्न वेगळे आहेत. आधी पोट कि आधी सोट अशी ग्रामीण म्हण आहे.
जीवनमान जसजसे उंचावत जाते तसे प्रश्न बदलतात. आपले प्रश्न सुटले तर लोक इतरांच्या प्रश्नांचा विचार करतात.
कितीही करेक्ट असले तरी हातावर पोट असलेल्या वर्गाला यात रस नाही.

कितीही करेक्ट असले तरी हातावर पोट असलेल्या वर्गाला यात रस नाही.>>++++१११११

फिलिंग्स वगैरे थोड्या वेळापुरतं ठीक आहे परंतु फीलिंग्स मुळे आयुष्यभर पोट भरत नाही.. साथ मिळात नाही.. कुटुंब असल्याचा फायदा मिळत नाही. हे सर्व मिळवण्यासाठी मग मेळा शोधून तिथं खितपत पडावं लागू शकतं अन्यथा ससेहोलपट सहन करत आयुष्य कंठावं लागू शकतं असं माझं वैयक्तिक मत. त्यापेक्षा जवळचा कुणी या मार्गाला जाऊ पहात असेल तर त्याला फीलिंग पेक्षाही भरपूर काही आहे ज्यामुळे आयुष्य सुखा-समाधानात जगता येतं हे पटवून द्यावं.

लिंगासापेक्षता किंवा विरुद्ध लिंगी देहाभावनिक आकर्षण नसणे ही मनोरुग्णावस्था नाही, जी काऊन्सिलिंग अथवा सल्ल्याने बरी होऊ शकेल. समलिंगी व्यक्तीला मनोरुग्ण समजणे ही एक फार मोठी चूक आणि अज्ञान आहे.

मनोरुग्ण नसतील ही...हो..मेडिकल सायन्स ही तसं मान्य करत...पण डिप्रेशन anxiety हे ही या लोकांमध्ये कॉमन असते

डिप्रेशन anxiety हे ही या लोकांमध्ये कॉमन असते>>>

ते सद्य सामाजिक परिस्थितीमुळे असावे. नैराश्य येणे हे काही समलैंगिक असण्याचे बाय डिफॉल्ट प्रॉडक्ट नाही.
ट्रान्स लोकांना मात्र ट्रांसिशन आधी आणि नंतरसुद्धा बऱ्याचदा नैराश्याचा सामना करावा लागतो. पण तसे असूनही ट्रांसिशन मदत करते असाच त्यांचा अनुभव असतो.

त्यांनी जाहिरात बनवून माफी मागून मागे घेणे हे जास्त दुःखद आहे. आपल्या मुद्द्यामागे दटून उभे राहण्याचा दम नसेल तर असल्या जाहिराती बनवतच जाऊ नका. एकूणच काही क्षणांसाठी चमकून बाजूला होणे असा प्लॅन असावा डाबर वाल्यांचा.

तालीबानी राजवटीकडे आपली वैचारिक वाटचाल सुरु झाली आहे याचे हे एक अजून उदाहरण. सर्वच धर्मातल्या कट्टरपंथीय लोकांचा समलिंगी संबंधांना कडाडून विरोध आहे, याला अपवाद कोणताही धर्म नाही. मानवतावादी दृष्टीकोनातूनही त्यांच्या प्रश्नांकडे बघितले जात नाही.

नुकतीच अफगाण मधे तालीबानी राजवट आली आहे. कालच स्त्रीयांना शिक्षण घेण्यात आडकाढी येणार नाही, मानवता वादी दृष्टीकोन पण यावर त्यांचे प्रवक्ते बोलले,....
"... on LGBT rights, the Taliban said that their intended support for human rights did not include gay rights.... "

Gender spectrum is not binary. निसर्गात अनेक प्रकारचे रंग आहेत, त्या सर्व रंगांचा आपण स्विकार करायला हवा.

हिरा - सहमत...

<< मनोरुग्ण नसतील ही...हो..मेडिकल सायन्स ही तसं मान्य करत...पण डिप्रेशन anxiety हे ही या लोकांमध्ये कॉमन असते >>
------- डिप्रेशन anxiety हे कुणाच्याही वाटेला येण्याची शक्यता आहे. जर समाजाने अत्यंत वाईट पद्धतीन वागविले असेल तर डिप्रेशन anxiety चे प्रमाण वाढणार का कमी होणार ?

<< एकूणच काही क्षणांसाठी चमकून बाजूला होणे असा प्लॅन असावा डाबर वाल्यांचा. >>
----- आता फुकटची जाहिरात होत आहे तसे करण्याचा उद्योग तर नव्हता ना?

लेख लिहिताना रुन्मेश ने खूपच जश्न ए विचार केलेला दिसतोय .

दिवाळीच्या मुहूर्तावर फॅब इंडिया च जश्न ए शमशान झालेले असताना डांबर ने दिवाळी निमित्तच्या जाहिरातीत समलैंगिकतेचा विषय मांडून उडत्या बाणा समोर येण्याची हौस जिरवून घेतली .
कोणतीही जाहिरात आऊट करण्याअगोदर त्या त्या कंपन्यांच्या HOD ला दाखवत असावेत असे मला वाटते . मग या जाहिराती बघताना शांत पाण्यात दगड मारल्यावर उमटणाऱ्या तरंगणा सामोरे जावे लागण्याची कल्पना त्यांना आली कशी नाही ?
उदय यांनी तालिबान चा उल्लेख केला हे स्वागतार्हच आहे .
भारतात मुख्यतः हिंदू आणि मुस्लिम धर्मात लोकसंख्या विभागली गेली असताना फक्त ही हिंदू धर्मियांना शिकवणी देण्याचा प्रयत्न लिबरल डावे आणि कंपन्या करतात याची चीड येते .
जनजागृती या कंपन्या करत असतील तर आनंदच आहे पण एकाच धर्माची का ?
गेल्या पाच दहा वर्षांत एका ही कंपनी ने मुस्लिमांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न का केला नाही ?
का चार्ली हेब्दो होण्याची भीती वाटते ?

<< जनजागृती या कंपन्या करत असतील तर आनंदच आहे पण एकाच धर्माची का ?
गेल्या पाच दहा वर्षांत एका ही कंपनी ने मुस्लिमांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न का केला नाही ?
का चार्ली हेब्दो होण्याची भीती वाटते ? >>

------ आपल्या धर्मात जनजागृती /सुधारणा करणार्‍यांचे चार्ली हेब्डो झालेले आहे... Sad
१९४८ मधे महात्मा गांधी यांना मारले... नरेंद्र दाभोलकर, गौरी लंकेश, पानसारे, कलबुर्गी.... अनेक नावे आहेत. सरकार कुणाचेही असले तरी मुख्य आरोपी मोकाटच.

कंपन्या स्वत: चा फायदा बघणार , जनजागृती साठी केले असण्याची शक्यता नाही. किंवा पोलरायझेशन करण्यासाठी या कंपनीवर दिल्लीवरुन मोठा दबाव आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता नाहीतरी ५ ग्रॅम चरसचा विषय बोथट झाला आहे आणि आर्यन घरी परतला आहे....

३ - १/२ आठवडे त्या क्रुझ धाडीने गाजविले, आता काही तरी नवे टास्क हवे ना Happy

गेल्या पाच दहा वर्षांत एका ही कंपनी ने मुस्लिमांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न का केला नाही ?
का चार्ली हेब्दो होण्याची भीती वाटते ? >>>>>>>>>>>
दोन ओव्या या बद्दल पण गा की !

>>>गेल्या पाच दहा वर्षांत एका ही कंपनी ने मुस्लिमांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न का केला नाही ?

जनजागृती तनिष्कने करायचा प्रयत्न केलेला. मुस्लिम घरात हिंदू सुनेला तिचा धर्म पाळायला प्रोत्साहन दिले अशी झैरात होती.

नक्की कोण बॉंबलले त्या झैरातीवर ????

संपूर्ण पोस्टशी सहमत आहे.

Submitted by सामो on 31 October, 2021 - 19:46
>>> +११११११११
ऋन्मेष तुमचे विचार नेहमीच आवडतात. पण या लेखाने तुम्ही किती चांगले पालक आहात हे (अजून एकदा)जाणवले. तुमची मुले नक्कीच एक समृद्ध नागरिक होतील. कारण त्यांना खूप सपोर्टिव्ह वडील लाभले आहेत.

आता मूळ विषयाबद्दल बोलायचे तर ही ऍड मला आवडली पण ती controversial असणार हे कंपनीला माहीत असणारच. मग मागे कशाला घ्यायची ? दाखवा ना थोडी हिम्मत ! safe खेळायचे तर तेच दाखवा ना जे लोकांची रॅशनल विचार करण्याची बुद्धी नष्ट करते. दृष्टीआड सृष्टी

किती तरी आईबाप समाजाच्या भीतीपायी अशा LGBTQ मुला मुलींची लग्ने लावून देतात. हे दुहेरी मनाविरुद्ध जगणे ह्यात त्या दोन्ही आयुष्याची होरपळ होते.
आणि हा कल जन्मतः असतो. तो लपवू शकतो पण बदलू शकत नाही.
तसेच हे खालच्या थरातील लोकांमध्ये नाही हे कोणी सांगितले? असा काही रिसर्च आहे का ?
मला वाटते अमेरिका सोडली तर अजून कुठेच समलेंगिकांना फारसे नॉर्मल लाइफ जगता येत नाही.

<<मला वाटते अमेरिका सोडली तर अजून कुठेच समलेंगिकांना फारसे नॉर्मल लाइफ जगता येत नाही.>>

-----
अमेरिका जगात २० व्या क्रमांकावर आहे. अमेरिकेच्या उत्तरेला कॅनडा नावाचा देश आहे, पहिल्या क्रमांकावर. Happy
आता हे कुणी ठरविले?
https://www.asherfergusson.com/lgbtq-travel-safety/

हिंदू कुटुंबियांत मुस्लिम मुलीला तिचा धर्म पाळण्याचे स्वातंत्र्य या त्यांनी विचार तरी केला असेल का ?
का पुन्हा चार्ली हेब्दो होण्याची भीती वाटते !
आणि प्रत्येक वादग्रस्त जाहिरातीत फक्त हिंदू धर्मातील रूढी परंपरावर हल्ला का ? एक तरी मुस्लिम धर्मावर करून बघा की !
@कॉमी एन डी टी व्ही ने करोना केसेस बद्दल बातमी देताना मुस्लिम व्यक्ती दाखवला तर कोण बोंबलत होता ते शोधा अगोदर ! त्या वेळी त्यांच्या कैवारी चॅनेल ची आई माई काढायला एक से एक जण सरसावले होते .
बरं नेहमीप्रमाणे अर्धांगवायू वाले तमाम डावे पण गप्प बसले होते ,एकानेही एन डी टी व्ही ची बाजू मांडायचा प्रयत्न केला नाही .
म्हणजे फक्त बातमीत सुद्धा यांना मुस्लिम व्यक्तीचा उल्लेख नकोय आणि गप्पा तर हिंदू समाज सुधारणेच्या हाणायच्या .

नगरवाले एक उदाहरण मुस्लिमांच्या जनजागृतीचे दिले, ते होत नाही असे तुम्ही म्हणत होता म्हणून. आंतरधर्मीय विवाहात आपल्या सुनेला मुस्लिम घरात तिचा धर्म पाळण्याचे स्वातंर्य मिळते हि positive reinforcement आहे. लगेच मुद्दा सोडून इकडेतिकडे पळाला. पुढच्या whataboutrey च्या पारंब्यांमध्ये आपल्याला रस नाही. Happy

अमेरिका जगात २० व्या क्रमांकावर आहे. अमेरिकेच्या उत्तरेला कॅनडा नावाचा देश आहे, पहिल्या क्रमांकावर. Happy
आता हे कुणी ठरविले?
https://www.asherfergusson.com/lgbtq-travel-safety/

धन्यवाद. ह्या लिंक बद्दल. भारतातही आता बरेच जण आऊट येऊन एकत्र राहत आहेत. पण नक्कीच बरेच जण छुपे आहेत. नेक्स्ट gen हे normalize करण्यात बरीच ओपन असावी असे वाटते.

जीवनमान जसजसे उंचावत जाते तसे प्रश्न बदलतात. आपले प्रश्न सुटले तर लोक इतरांच्या प्रश्नांचा विचार करतात.
कितीही करेक्ट असले तरी हातावर पोट असलेल्या वर्गाला यात रस नाही.>>>>>> करेक्ट !!

१९४८ मधे महात्मा गांधी यांना मारले... नरेंद्र दाभोलकर, गौरी लंकेश, पानसारे, कलबुर्गी....
१९४७ मध्ये फाळणीच्या वेळी मारले गेलेले हिंदू काही परत येऊ शकत नाहीत, अब्रू लुटल्या गेलेल्या हिंदू माता-भगिनी आता या जगात नसतील पण तेव्हा पाकिस्तानसारख्या शत्रूराष्ट्राला दिलेले ५५ कोटी रुपये आजच्या दराने माझ्या देशाच्या तिजोरीत जमा झाले की मी स्वतः Gateway Of India किंवा India Gate किंवा तुम्ही सांगाल त्या ठिकाणी नथुराम गोडसे यांचा धिक्कार करून मोहनदास करमचंद गांधी यांचा जयजयकार करेन!

दाभोलकर, गौरी लंकेश, पानसारे, कलबुर्गी... ही सर्व प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. थोडी कळ सोसा, सत्य बाहेर येईलच!

Pages