अगम्य : शेवट

Submitted by सोहनी सोहनी on 28 October, 2021 - 07:59

अगम्य : शेवट

मी कसे तरी दोन दिवस त्या घरात काढले पण मला बाईसाहेबांचं सगळं आठवत होतं, त्यांनी जे सांगितलं त्याचा विचार करून मला खरंच काही कळत नव्हतं कि काय करू? मी एकटा हे सगळं कसं संपवू शकत होतो? मी दोन दिवस खूप विचार केला, मी एकटा हे करू शकणार नव्हतो, मला मदत हवी होती, पण कोण मदत करेल, कोण विश्वास ठेवेन, पोलिसात ह्यांच्या विरुद्ध पुरावे नाही मिळाले तर ते सुटतील आणि सजग होतील, मला ते नको होतो, जर ते इथून हि पळून गेले मग??
जिथे जातील तिथे हि अशीच विकृती चालू करतील, पण हे सत्र मला संपवायचं होतं, काही झालं तरी चालेल पण ते थांबायला हवं होतं.

काय करू?? काय करू ?? विचार करत असताना मी माईला बरं नाहीये, असं सांगून मी एक आठवड्याची सुट्टी घेतली, गोळ्या औषधं घेऊन मी गावी आलो, माझ्या बा'शी चांगले संबंध असणाऱ्या दोन तीन मोठ्या माणसांना भेटलो, सगळं सांगितलं, आधी त्यांना विश्वास नाही बसला पण मी त्यांना प्रकरणाची गंभीरता समजावली, त्यांनी त्यांच्या विश्वासातल्या पाच सहा लोकांना विश्वासात घेऊन ह्या प्रकरणाचा छडा लावायचा प्लॅन केला.

आधी माझ्या ओळखीच्या दवाखान्यातल्या साफसफाई करणाऱ्या माणसाला भेटून त्याच्या कडून माहिती काढून घेतली.
त्याला सगळं सांगितल्यावर त्याने त्याच्या बघण्यात आलेल्या वेगवेगळ्या घटना आणि संदर्भित माणसांची नावं सांगितली. एक महत्वाचं कळलं कि एक माणूस दर महिन्याला नेहमी डॉक्टरांना भेटायला येतो, त्याचं काही काम नसायचं म्हणजे आजारी वैगेरे नाहीये तरीही येतो.

त्याने सांगितलेल्या त्या माणसाला आम्ही गाठलं, तेव्हा कळलं कि त्याला फक्त डॉक्टरांकडून पैसे मिळतात, त्या बदल्यात त्यांना फक्त कुणी मेलेल्या बाळाला जन्म दिला आहे कि नाही ते सांगायची आणि त्या बाळाचा देह कुठे पुरला जातोय ते सांगायचं.
मला विचार करून खूप किव आली त्या माणसाची, आपण पैस्यासाठी काम करतो कोणाला माहिती देतोय, त्या माहितीमुळे ते लोक पुढे काय करत असतील याचा विचार त्याच्या कधीच डोक्यात आला नसेल???

आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचलो आहोत ते डॉक्टरांना कळलं नाही पाहिजे अशी त्या धमकी दिली, आणि पुढच्या आठवड्यात डॉक्टरांना खोटी बातमी पोहोचवायची अशी योजना केली.
एक दोन गावातील लोकं गोळा केली, त्यांना सगळं समजावलं, आम्ही ठरवलं होतंकि त्यांना जन्माची अद्दल घडवायची.

लगेच पोलिसात द्यायचं नाही, त्यांना रंगेहात पकडायचं आणि चांगला चोप द्यायचा, लोकं तसेही खूप भडकले होते.
एक आठवडा आम्ही सगळा विचार आणि नियोजन करून, त्या खबऱ्या करवी डॉक्टरांना निरोप पोहोचवला.
मात्रा अगदी बरोबर लागली होती, आम्ही जवळ जवळ चाळीस पंचेचाळीस पुरुष आणि सातारा अठरा बाईमाणूस होतो.

डॉक्टरांना खोटं सांगितलेल्या जागेवर ते रात्रीच्या अकरा वाजता पोहोचले आणि मुद्दामून खणून थोडी ओली करून बजावलेल्या जागेवर ते खणायला लागले, तिच्या दुर्दैवाने म्हणा कि आमच्या संधी साठी आईसाहेब पण सोबत आल्या होत्या,
आम्ही दहा बारा माणसं लपून पहार्यावर होतो, त्यांनी खणायला सुरुवात केली आणि आम्ही एकाच हल्ला केला,
त्यांना दोघांना मारत मारत पुढे आणलं, थोड्या वेळात आमची सगळी माणसं गोळा झाली,
बायकांनी आईसाहेबांच्या ताबा घेतला आणि पुरुषांनी डॉक्टरांचा,
सगळे इतके संतापले होते कि कुणी कुणाला पाहत नव्हतं, कोणाचं काही ऐकून न घेता फक्त त्यांना दोघांना मारत होते,
थोड्या वेळाने आम्हीच घाबरलो मेले तर ते?? आम्ही लोकांना आवरायचा प्रयत्न केला पण ते आवाक्या बाहेर गेले होते,
बऱ्याच वेळाने लोकं बाजूला झाले आणि आम्ही पाहिलं त्याने मी उलटीच केली.
त्या दोघांचा पार चेंदामेंदा झाला होता, ओळखू येणार नाही अशी अवस्था झाली होती शरीराची, प्राण तर केव्हाच गमावले होते, पण देहाची अशी विटंबना?? तिकडे काही लोकांनी घर पेटवून दिलं होतं . . .
नंतर गावावर केस झाली, बऱ्याच जणांना अटक झाली, पण दवाखान्यात बरेच संशयजनक पुरावे मिळाल्याने, ठोस असं काही झालं नाही, सगळे सुटले, थोडा त्रास झाला पण कोणाला कारावास वैगेरे नाही झाला.

हे कोणामुळं झालं ??? काय मिळवलं त्यांनी??? सगळं विसरून इतकंच लक्ष्यात ठेवलं कि विकृतीची सुरुवात केली त्यांनी आणि विकृतपणेच त्यांचा अंत झाला. . .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मला माहित नाही कथेचा शेवट कसा झालाय ते, पण जे ऐकलं तेच लिहण्याचा प्रयत्न केला, खरं कि खोटं माहित नाही पण आठवली कि भीती वाटते, पण इथे लिहून आता मी ती गोष्ट मनातून काढून टाकते आहे.

असो तुम्हाला आवडली नसेल, तुमच्या अपेक्षांवर माझं लेखन उतरलं नसेल तर किंवा माझ्या चुका झाल्या असतील तर मनापासून सोर्री. . .
पण मी पुढे लिहण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. . .

पहिल्या काही भागात खूप उत्सुकता ताणली होती (जरा कंटाळा यायला लागला होता इथपर्यंत). आणि मग मागच्या दोन भागात अचानक सगळं संपलं. तुमच्या कथांमधे हा पॅटर्न येऊ लागला आहे असं मला वाटतय. असे झाल्यामुळे कथा परिणामकारक होत नाही. सुरुवात, मध्य आणि शेवटामधे समतोल ठेवल्यास तुमच्या कथा खूप छान रंगतील. पुढील कथा लिहिताना त्याचा विचार करावा ही विनंती.
पु.ले.शु.

शेवट जमला आहे.
पण थोडा गुंडाळला गेला आहे असे वाटते.

सगळ्यांचे खूप आभार..
@ चौकट राजा, सर
तुम्ही बरोबर म्हणालात, मला स्वतःलाच ते स्पष्ट जाणवत आहे, माझ्या दोन्ही कथा तुम्ही म्हणालात तशात झाल्या आहेत.
नवीन जॉब, आणि नवीन लग्न त्यामुळे लेखनास पुरेसा वेळ देता येत नाहीये, त्यात वाचन कमी झालं आहे.
म्हणून थोडं थांबायचा विचार केला आहे, पुरेसं वाचन करून, नव्याने लिखाण करेन.