सांजभय

Submitted by _आदित्य_ on 24 October, 2021 - 01:21

आठवणींच्या सांजभयाने.. मीही निजलो नाही !
दुःख वाहुनी नेईन ! ऐशी.. श्रावण देतो ग्वाही !

अनोळखी हा देह वाटतो ! कोण असे कट रचते?
मुंगीच्या शिरी पहाड देणे.. बरे तुला हे रुचते !

गुप्त सुरांच्या व्याकुळ सदनी निघून जावे वाटे !
चालू बघता, विचारभरले.. मनास फुटती फाटे !

जिथे तिथे मज हुंगत येते सांजधुके स्मरणांचे !
शांत करी मी अमृत पाजून त्यांना मग शब्दांचे !

सरस्वतीच्या वीणेतील मी.. एकट स्वर कुचकामी !
रोज निनादत असतो वेडा, रामरंगल्या धामी !!

................

Group content visibility: 
Use group defaults